रविवार, १९ जून, २०१६

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
¤▪¤▪¤।।'बाप'।।¤▪¤▪¤

बाप माझा कष्टकरी 
कर्तव्यासी नाही हाटला।
किती करावी जरी सेवा 
नाही उपकार त्यांचा फिटला ।।

भोळा भाबड्या मनाचा 
चंद्राची जशी शितल माया।
सदैव शांतिप्रिय असलेला 
भासे मज वटवृक्षाची छाया।।

खेळविला मज हातावरी
जसे फुलकमळ पाण्यात।
हात धरून घट्ट हाती  
नाही डोळा आनंदू मावत ।।

शेतात राबला बैलावानी
केले रक्ताचे त्यांनी पाणी ।
माझ्या मुखाकडे पाहून 
हास्य गायली गोड गाणी ।।

जीविका रथीभाग्य जीवनाची 
माझ्या साठी वाहून त्यांनी।
सुख भेटायला मजलागी 
घेतली झोप नाही ज्यानी ।।

गौरवाचा पुतळा जगी 
शोभे नाथविश्व हृदयातून ।
भल्यासाठी उभा रात्रंदिन 
केले जीवन माझे सोन।।

थकली हाडे भावविवश 
कर्तव्यबोध घेऊन खास।
आयुष्यभर जेणे बाळासाठी 
केला परमात्माचा ध्यास ।।
""""""""""""""""""""""""""'"Ķ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा