रविवार, १९ जून, २०१६

⛈⛈⛈⛈⛈
रानातल्या पाखरा
आळवूनी तु पावसा .!
तुझा कोरड्या घशाची
कीव येईल का पावसा ?.!!

गोठ्यातुनी हंबरडा
गायी वासराचा वाढला.!
कुणी धाडला सांगावा
कुठं पाऊस अडला !!

कान्होबाच्या डोंगरी
जंगलाचे दैवताला.!
लागे पावसाचे ध्यान
ढग आकाशी थांबला.!!

अतिरेकी माणसानी
प्रदुषणे दुष्ट वाढवले.!
स्वतःच्या पोटासाठी
धोंडे पायावर घातले.!!

करा निर्धार मनाचा
वृक्ष लावा एक तरी.!
पर्वणी पावसाळ्याची
आता करू सर्वत्र पंढरी.!!
✍🏻 गजानन पवार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा