पावसाळल्या मनाचा
छडा मज लागत नाही
धरता हात मिठीत सये
शहारलेअंग थरथरत राही
धुंद झाले लोचने
धुंद झाल्या भावना
कल्पनेच्या तारकाने
छेडले का माझे मना ?
बंधने तोडताना प्रिय
बघते जग पून्हा पून्हा
सांग कधी कोठे झाला
हातून माझ्या गुन्हा
अथांग सागरा तळाशी
स्वप्न सखोल बघताना
गहिवरल्या कंठातूनी
श्वास का?घेता फुटेना
--- गगजानन पाटील पवार
छडा मज लागत नाही
धरता हात मिठीत सये
शहारलेअंग थरथरत राही
धुंद झाले लोचने
धुंद झाल्या भावना
कल्पनेच्या तारकाने
छेडले का माझे मना ?
बंधने तोडताना प्रिय
बघते जग पून्हा पून्हा
सांग कधी कोठे झाला
हातून माझ्या गुन्हा
अथांग सागरा तळाशी
स्वप्न सखोल बघताना
गहिवरल्या कंठातूनी
श्वास का?घेता फुटेना
--- गगजानन पाटील पवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा