रविवार, ५ जून, २०१६

साहित्य दरबार
''जागतिक पर्यावरण दिनानिमित्त''
♧पर्यावरण आणि आपण♧
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी
पक्षी ही सुस्वरे आळविती
संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या काळी झाडाचे महत्त्व सांगितले आहे परंतु आज जी निसर्ग ,पर्यावरण हानी झाली आहे ही कधीच भरून निघणार नाही असे वाटते कारण आपल्याला वृक्षाची सावली आवडते त्याखाली विश्रांती घ्यायला आवडते येवढेच नाही तर रोपटे लावायला ही आवडते परंतु त्याची जोपासना करायला त्याला पाणी घालायला वेळच नाही.
आज माणसाने आपल्याच हाताने पायावर धोंडा पाडून घेतला आहे याची किंमत भोगायला लागत आहे,
आज महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाचे दुष्ट चक्र चालले केवळ पर्यावरणास हानी पोहोचली हे एकमेव कारण आहे
पक्षांचा चिवचिवाट बंद झाला , आज कावळ्या सारखे पक्षी दुर्मीळ झाले, पावसाळ्याची चाहूल लागली हे सांगणारी कोकिळा कुठेच दिसत नाही किवा चातक पक्षी जो आपल्या मंजुळ आवाजाने निसर्गाशी हितगुज साधायचा तो आवाज आज कुठेही ऐकायला नाही ,शेतकऱ्याला 'पेरते व्हा पेरतेव्हा ' सांगत सुटणारा पक्षी राहीला नाही किती बदल केला आहे आज माणसाने जेथे जंगलातील प्राणी वन्यजीव रहात तेथे आज मानवाने आपल्या साठी वस्ती केली आहे परंतु त्या प्राण्याने कुठे रहायचे जेथे प्राण्यांची हजारो मध्ये गणना केली जायची ते आज नामशेष होत आहेत म्हणजेच पर्यायाने पर्यावरणाची हानी घडत चालली , औद्योगिकरण ,कारखाने त्याच्यामधून पडणारा धुर शहरीकरणाचा वाढलेला व्यास सर्वच काही भयानक वास्तव आहे
शेती मधील रासायनिकाचा वापर यामुळे आरोग्यावर होणारा दुष्परिणाम कीटकनाशक यामुळे चांगले आणि वाईट परीणाम आज ग्रामीण भागात कीटकनाशकामुळे मधमाशी दुर्मीळ झाली आणि दुसरी गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आज जमिनीवर सातशे ते हजार फूट खोल पर्यंत जे इंधन बोर पाडल्या जातात पाणी लागले तर वापरायला तयार परंतु केवढा गहन विषय आहे की शरीरावर थोडासा घाव झाला तरी तो वर्षभर भरून निघत नाही मग तेंव्हा का विचार आपल्या मनात येत नाही की पृथ्वी सुद्धा आपली माता
''समुद्रवस्ने देवी
पर्वत स्थन मंडले
विष्णु पत्नी नमस्तुभे
पदस्पर्श क्षमस्वमैः''
 आहे तीला कीती वेदना होत असेल यावर मी म्हणेन जेथे जे रिकामे बोरं गेले आहेत तेथे पावसाळ्यात जे वाहून जाणारे पाणी आहे ते वळवून जर त्याठिकाणी जिरवून नियोजन केले तर जी आज पाचशे फूट खाली गेलेली पाण्याची पातळी थोडी फार तरी वर यायला मदत होईल पर्यायी निसर्ग आणि पर्यावरण ही जोपासले जाईल...
^^^^^^^^^^^^^
दे मित्रा हातात हात
देईल साथ जन्माची.!
पर्यावरणीय भर झोळी,
सेवा घडेल निसर्गाची.!!
♧♧♧♧♧♧♧♧♧
साहित्य दर्पण
* पर्यावरण आणि मानवी जीवन*
✍🏻____ गजानन पवार
हिंगोली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा