रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

गोंधळ रंगला । रेणुका मातेचा
भाविक भक्तांचा ।आई पुढे ॥१॥

नव दिन रात्रि । करती आरती
गोड गीत गाती । शुद्ध भावे ॥२॥

चाले घरोघरी । पुजेचा ग थाट
कुंकू मळवट । भाळी शोभे ॥३॥

हळद पिवळी । सुगंधी अक्षदा
स्वर्गीय आनंदा । नेत्रा भासे ॥४॥

मोगरा गुलाब । शेवंती फुलली
माऊली डोलली । प्रेम सुखे ॥५॥

त्रिभुवनी उभी । बालकांची आई
धावतची येई । संकटाते ॥६॥

धन्य करी भक्ती । भोळा भाव ज्याचा
विश्वास त्यांचा । पायी वेगे ॥७॥

करावे रक्षण । माता भगिनींचे
द्वार मंदिराचे । उघडावे ॥८॥

मातले असुर । भूमि झाला भार
घेई अवतार । जगदंबे ॥९॥

G.patil








शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

    जन्म कृषकांचा
आवरी आवरी पावसा
तुझ्या ढगांची गर्जना..!
सुगी उभी शेतामध्ये
नको मोडू पाठ कणा..!!

सोयाबीन कुजत रानात
घालमेल जीवा लागली..!
धरणी आईचे उदरात
झोळी पाण्याने भरली..!!

भरून धान्ये शिदोरी
नको हेळसांड मांडू..!
तूच वाली खरा कृषकांचा
तुझे वीना कोणा भांडू..!!

गजबजलेल्या शिवारी
कृपादृष्टी तुझी राहू दे..!
सावली धरावी मायेची
सुख डोळ्यांनी पाहू दे..!!

जन्म गवत पात्यावरी
बळीराजांचे लेकरांना...!
अंतरी भाबडे शब्दांकन
मरणा आलिंगन हसताना..!!




















शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

          गुपित
पावसाच्या मनात गुपित
दडले तरी काय आहे...!
जिकडे तिकडे सुसाट
वारा झुंजार वाहतो आहे...!!

छोट्या छोट्या ढगांचा
मागोवा आता लागत नाही..!
क्षणभर विश्रांती घेऊन
टिप टिप बरसत राही..!!

हिरव्या हिरव्या रंगाच्या
रांगोळी सजून बसती..!
सोनपिवळे पर्णपातेही,
धान्य सहित पक्व होती...!!

किर्र किंकाळी मध्यान्ह राति
बेडकाचे आवाज सजली..!
गोदा गंगा तरोवर वाहत
सागराचे भेटी धावली...!!

कुणा पावसाचा वाटे हेवा
कोण्या जिवाशी छेडणारा..!
मनोमन सांभाळत रहावे,
संथ शितल पाऊस धारा..!!
गजानन पाटील









बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

पाना फुलातून गाजतो
तुझाच देवा तो हुंकार..!
तुझीच विश्व लीला असे,
म्हणून प्रगटे तो ॐकार..!!
            गजानन पवार

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

💀💀💀💀💀
     *अंधश्रध्दा*
ठग बसला उशापाशी
काळ्या वस्त्रात कावळा..!
लिंबू कापले अंगावरी
लावी हळदी कुंक भाळा..!!

चोर खोटारडा मनाचा
माखून रिंगण रेघोट्या..!
बाई बघून करतो चाळे,
सोडी राखूंड्याच्या बुट्या..!!

नित्य दारूची दरवळ
उग्र अंगा घाण वास..!
गळा लागलीया मासा,
मागे बोकडाचे मांस..!!

करणी म्हणे भानामती
घेई झाडाची झडती..!
कोंबड्यांच्या पंखात,
अडकली याची मती..!!

कुठे सांगे द्रव्ये भांडार
भिंती खिंडार पाडले..!
सोने दागिन्याचे पायी,
मुलं शेजा-याचे मारले..!!

पाडू सांगे पैशाचा पाऊस
मुंजा,भुते,वैताळ मुठीत..!
वा-याने झोपडी मोडली,
धुर गांजाचा निघे घरात..!!

भोंदूगिरीचे मुळ खोदून काढा
अंधश्रध्दा निर्मूलन करा ..!
पट्टी काढून डोळ्यावरची,
भोंदूड्या नाका मिरचीपुड भरा ..!

🖊 गजानन पाटील पवार
👹👽👹👻👹🤖👹

बुधवार, २० जुलै, २०१६

गुरू पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

🌷गुरू पोर्णिमेच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा 🌷
आठवण मज
गुरू राया आली
तुमची साऊली
डोळा दिसे ॥१॥

कृपेचा प्रसाद
वाटती शिदोरी
गुरूनाथे शिरी
ठेवी हात ॥२॥

सुंदर सगुण
रूपा लागे ध्यान
पाहूनी नयन
भरू लागे ॥३॥

मायेचा ओलावा
कंवाळू पाझर
नामाचा उच्चार
जीवनात ॥४॥

नाम मंत्र सोपे
भजनात दंग
भरलाय रंग
अंतरंगी ॥५॥

आवडीने भावे
गुरूशी भजावे
पैलतीरी न्यावे
मायबापा ॥६॥

तुमचे प्रसादे
जीवा आली गोडी
हृदयाते जोडी
गुरू रूपा ॥७॥

माऊली मायाळू
सद्गुरू श्रीरामा
सर्व सुख धामा
पायापासी ॥८॥

नाम ओठी राहो
अहोरात्र मुखा
आम्हा पाठीराखा
भक्ताचिया ॥९॥

श्रीरामा श्रीरामा
हाक पडो कानी
धन्य त्यांची वाणी
होई शुद्ध ॥१०॥

लाभ झाला आता
झालीया दर्शन
जोडी शब्द धन
वेड्या मुखी ॥११॥
✍गजानन पवार
🌺🌷🌺🌷🌺🌷🌺

संत महिमा

🌷🌷🌷🌷🌷
*संत महिमा*
कृपावंत दाता
सागर कृपेचा
स्कंद आनंदाचा
नामभक्ती॥१॥

मज पामराला
भक्तीमार्ग दावा
दगडा घडवा
तीर्थाटन॥२॥

कोण पुणे साठा
पुर्वीची पुण्याई
गुरूरूपे आई
भेटी लागे॥३॥

जीवन परीस
लोहा केले स्वर्ण
भव व्याधि जीर्ण
नामगोडी॥४॥

ठेवून मस्तकी
हात आशिर्वाद
आळवू गोविंद
आवडीने॥५॥

साक्षात्कार झाला
हनुमंता गाता
उरली न चिंता
संसारात॥६॥

तुळशीचे माळा
करोनिया गोळा
लावूनिया टिळा
गोपीचंद॥७॥

फासा करोनिया
स्वर्ण रुपी दोरा
भजनाचा नारा
रात्रंदिन॥८॥

बहू तप केले
झाले भगवंत
नामधारी संत
जगा माजी॥९॥

गुरू आत्मा रामा
उधार करावा
लेकराला ठेवा
पायापाशी॥१०॥

चुकले माकले
क्षमेचा याचक
लेकरू बालक
गज्आन्द॥११॥
✍🏻 *g.p*
 http/gppawar.blogspot.in

बुधवार, ६ जुलै, २०१६

ओटी

काळ्या आईच्या ओटी
घाई बीजे अंकुरण्याची
पडेल पाऊस नक्षत्राचा
आकाशी वर्दी ढगांची

रूईझुई वाहतो वाही
हितगुज पक्षा संगती
दंग झाला कामामध्ये
कृषक अनवाणी शेती

पावसाच्या सरी पडता
भिजून नहाते वसुंधरा
झोंबूण उठतो अंगाला
सुखावता गार वारा

ओल्याचिंब माती संग
स्वप्न हिरव दाटले
मनोनयन वाढला कोंब
अश्रू सुखाचे वाढले

हिरव्या गर्द वेलीवर
राघूमैनेचा जोड डोलदार
शालू नेसल्या धरणीला
पाहू लागती डोळे भर
"""" गगजानन पवार












शनिवार, २ जुलै, २०१६

🌱दैवत 🌱
आईवडील दैवत जगी
त्याने घडविली गाथा.!
थांब थांब विठ्ठला जरा ,
चरणांवरी ठेऊ दे माथा.!!
बाप भोळाशंकर हरी
आई करुणेचा सागर.!
पिळा देऊन पोटाला
दिली कष्टाची भाकर.!!
झळ उन्हाची झोंबता
झोळी पदराची केली.!
चटका बसता पायाला
तळहातावरी झेली.!!
आईबाप खरी पुजा
वाटे जीवनाचे सार.!
जीर्ण झालेल्या शरीरा
वेड्या तुझाच आधार.!!
आईवडीलांचे पायाशी
सर्व तीर्थाची लोळणी.!
हेळसांड मांडून त्यांची
नको करू रे फाळणी.!!
✍🏻______ गजानन पवार

🌹🌹🙏🏻🌹🌹

शुक्रवार, १ जुलै, २०१६


🌷वृक्षारोपण🌷
करूया संगोपन
वृक्षारोपणाचं धन
लावूया एक वृक्ष
त्यांने मिळे समाधान

आली आली पर्वणी
निसर्गाची हाक कानी
वा-यासंगे डोलते
रोपटे गोजिरवाणी

रोपटे लावूनीया
बाळा परी जपावे
हितगुज मनातील
झाडा पाखरा सांगावे

आनंदाने धरती
फुलांनी सजली
हिरव्या पातळात
वनराई दाटली
✏️गजानन पवार

गुरुवार, ३० जून, २०१६

वारी

डोलू लागले मन
जीवा हुरहुर
चालता वारीत
देवा दुर पंढरपूर

वारीत चालता
गेला क्षीण भाग
माऊली रूप दिसे
जळून जाई राग

वारीचा आनंद
स्वर्ग सुख फिके
लहान ,थोर येथे ,
डोई पायावर टेके

संताचा मेळावा
वारीचा सोहळा
तुझ्या नावाचा देवा
लागला रं लळा

शेतात पिकल
दुकानी विकल
वारीस जाण्यास
मन माझं लागल

पंढरपूरी विठोबा
उत्सव रंगला
टाळ,मृदंग,वीना
वारकरी दंगला

माऊली माऊली
मृदंगध्वनी बोलतो
भक्ता संगे तल्लीन
विठ्ठल नाचतो
^gp