शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

    जन्म कृषकांचा
आवरी आवरी पावसा
तुझ्या ढगांची गर्जना..!
सुगी उभी शेतामध्ये
नको मोडू पाठ कणा..!!

सोयाबीन कुजत रानात
घालमेल जीवा लागली..!
धरणी आईचे उदरात
झोळी पाण्याने भरली..!!

भरून धान्ये शिदोरी
नको हेळसांड मांडू..!
तूच वाली खरा कृषकांचा
तुझे वीना कोणा भांडू..!!

गजबजलेल्या शिवारी
कृपादृष्टी तुझी राहू दे..!
सावली धरावी मायेची
सुख डोळ्यांनी पाहू दे..!!

जन्म गवत पात्यावरी
बळीराजांचे लेकरांना...!
अंतरी भाबडे शब्दांकन
मरणा आलिंगन हसताना..!!




















शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

          गुपित
पावसाच्या मनात गुपित
दडले तरी काय आहे...!
जिकडे तिकडे सुसाट
वारा झुंजार वाहतो आहे...!!

छोट्या छोट्या ढगांचा
मागोवा आता लागत नाही..!
क्षणभर विश्रांती घेऊन
टिप टिप बरसत राही..!!

हिरव्या हिरव्या रंगाच्या
रांगोळी सजून बसती..!
सोनपिवळे पर्णपातेही,
धान्य सहित पक्व होती...!!

किर्र किंकाळी मध्यान्ह राति
बेडकाचे आवाज सजली..!
गोदा गंगा तरोवर वाहत
सागराचे भेटी धावली...!!

कुणा पावसाचा वाटे हेवा
कोण्या जिवाशी छेडणारा..!
मनोमन सांभाळत रहावे,
संथ शितल पाऊस धारा..!!
गजानन पाटील