''बदल''
निसर्ग बदलावा तसी
माणसे हल्ली बदलाया लागली.!
एका ताटातले खाणारे हात
समयी वाट ही बदलाया लागली.!!
माणसे खेळ भारी खेळतात
चांगला पारंगत ही जमते .!
भरवतात मुखात घास ,
जीभ मात्र दातांने चावते.!!
खुशाल चेंडू उडवती लोक
शंखध्वनी पिटवती डंका.!
मीच माझा 'खास' तालावर
उचलून धरतात ठेका.!!
दोषारोप दुसर्यावर
शिंतोडे उडवत सुटला.!
जो तो आपल्या गर्वाने
मरणाला आहे विसरला.!!
भावनेचा पुर वाहू लागे
भावनिक बनतात लोक.!
वैराग्य संपताच येथून
धुम दुर पळतात लोक.!!
माहित असूनही काही
डोळे झाकून पहाताना.!
फास गळ्या सभोवतीचा
दिसतो का अवळताना.!!
रेशमी गाठी जरतारी
जीव झाला भुंग्या परी.!
कित्येकदा मोहपाशी गेले
कित्येक भेटून जातील दुरी.!
एक दिवस अचानक
सर्व दिसेल डोळ्याला.!
तेच डोळे होतील पारखे
अश्रूंचा भाव मोजायला.!!
अश्रूंचा भाव मोजायला..!!!
_____ गगजानन पाटील पवार
निसर्ग बदलावा तसी
माणसे हल्ली बदलाया लागली.!
एका ताटातले खाणारे हात
समयी वाट ही बदलाया लागली.!!
माणसे खेळ भारी खेळतात
चांगला पारंगत ही जमते .!
भरवतात मुखात घास ,
जीभ मात्र दातांने चावते.!!
खुशाल चेंडू उडवती लोक
शंखध्वनी पिटवती डंका.!
मीच माझा 'खास' तालावर
उचलून धरतात ठेका.!!
दोषारोप दुसर्यावर
शिंतोडे उडवत सुटला.!
जो तो आपल्या गर्वाने
मरणाला आहे विसरला.!!
भावनेचा पुर वाहू लागे
भावनिक बनतात लोक.!
वैराग्य संपताच येथून
धुम दुर पळतात लोक.!!
माहित असूनही काही
डोळे झाकून पहाताना.!
फास गळ्या सभोवतीचा
दिसतो का अवळताना.!!
रेशमी गाठी जरतारी
जीव झाला भुंग्या परी.!
कित्येकदा मोहपाशी गेले
कित्येक भेटून जातील दुरी.!
एक दिवस अचानक
सर्व दिसेल डोळ्याला.!
तेच डोळे होतील पारखे
अश्रूंचा भाव मोजायला.!!
अश्रूंचा भाव मोजायला..!!!
_____ गगजानन पाटील पवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा