रविवार, १ मे, २०१६

📚 साहित्य दर्पण Whatsapp ग्रुप 📰🖊
     द्वारा आयोजित

🗽 साहित्य दरबार 🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- 3रा -- तिसरा🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - 01 मे 2016
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
==================
📝 विषय:- " श्रमप्रतिष्ठा तथा श्रमाचे महत्व "
==================
💥 संकल्पना :→आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
**************************
💥 संयोजक --श्री ना .सा. येवतीकर सर
************************
💥 परीक्षक - प्रा. नितिन दारमोड सर , धर्माबाद
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥 ग्राफिक्स - मारुती खुडे माहुर
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.
💥 लेखाखाली आपले पूर्ण नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.

💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..

💥 या स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक 02 मे रोजी सायंकाळी 7:00Pm वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
http://nasayeotikar.blogspot.com/2016/04/sahity-darbar-bhag-3-01052016-2-05-2016.html
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧

 श्रमप्रतिष्ठा -श्रमाचे महत्व

(साहित्य दर्पण स्पर्धेसाठी)
*************************

1 मे जागतिक कामगार िदन
1मे महाराषट्र िदन या ि नमीत्त
 चळवळीत बलिदान केलेल्या सर्व हुतात्म्यास अभिवादन!आपणा सर्वाना शुभेच्छा!
     अमेरिकेत सर्वप्रथम कामगार संघटनानी आठ तासानचा दिवस असावा ही मागणी केली. त्यासाठी जी चळवळ ऊभी राहिली व् जगभर् पसरली त्यामुळे कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला.श्रमिकांचे महत्व जगाने मान्य केले.
  खरे तर श्रम दोन प्रकार चे म्ह नता येतील .शारीरिक श्रम व् मानसिक /बौद्धिक श्रम. शारीरि क श्रमात अंग मेहनत बौद्धिक श्रमात मन बुद्धिचा भरपूर वापर करावा लागतो.
      श्रम किंवा काम कधीही लहान -मोठे ,हलके-भारी कमी प्र तीचे -उच्च प्रतीचे असे असू शकत नाही. काम हे काम असते त्या त्या ठिकाणी त्याचे महत्व असते.उदाहरण द्यायचे तर चतुर्थ कर्मचार्यांचे पहा. जर ते संपावर गेले तर शहरांची अवस्था कशी होते.दोन दिवसात दुर्गंधी!इतर वेळी आपण रस्ता झाड़णाऱ्याकडे तुच्छतेने बघतो.पण अश्या वेळी त्यांच्या कामाचे महत्व आपणास कळते.श्रमाचे महत्व कळते.श्रमाला पर्याय नाही. श्रम हीच पूजा!या न्यायाने सर्वानी आपआपले काम करणे गरजेचे.याबद्दल शिक्षणमहर्षि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे उदाहरण अतिशय उत्तम व् मोलाचे आहे .कर्मविरानी शाळा व् महाविद्यालये काढून महाराष्ट्रात शिक्षण प्रसार केला. शिक्षणाची ज्ञान गंगा घराघरात पोहचवताना श्रमाचे महत्व मुलांच्या मनावर बिम्बवले.ते प्र त्यक्ष अनुभवातुन!' कमवा व् शिका' या योजनेतून मुले संस्थेत नेमुन दिलेली कामे करतात व मिळालेल्या पैशातून फीस व् इतर खर्च भागवतात .पुढे जीवनात त्याना कोणत्याही कामाची लाज वाटत नाही.श्रमप्रतिष्ठा हे आपले संविधानातील दहा गाभाभूत मूल्यांपैकी एक मूल्य आहे.
         राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वतःची कामे स्वतः करीत. श्रमाचे महत्व शारीरिक श्रम कर णाऱ्याना विचारा रात्री झोप कशी शांत लागते!श्रीमन्त अलीशान घरात मुलायम गादीवर झोपेसाठी तळमळत असतात! हॉस्पिटल मधे फेऱ्या जास्त कोणाच्या ?कष्टाचे शरीर मजबूत असते. बौद्धिक श्रम ही मोलाचे. आज संगणकावर अठरा अठरा तास काम करुन अभियंत्यानी भारताचे नाव जगात उंचावले आहे.आजच्या तरुणानी कष्ट करुन विजयाचे झेंडे सर्व दूर व सर्व क्षेत्रात उंच फड़कावले आहेत .म्हणूनच म्हणावेसे वाटते श्रमाला पर्याय नाही!
       आज मात्र समाज्यात 'white coller job' म्हणजे पांढरपेशी नोकरी सर्वाना हवी असते .आरामशीर काम पाहिजे कष्ट नको.अशी मानसिकता वाढ लेली दिसते.शिक्षण घेतले मग शेतात (स्वतःच्या)काम कसे करू लोक काय म्हणतील ?असा विचार करतात.बेकार म्हणून वा वरणे पसंद करतात.पण मिळेल ते काम स्विकारीत नाहीत.ही चिंतेची बाब आहे असे मला वाटते.काळ्या आईशी नाळ तूट ता उपयोगी नाही. आपल्या शेतिप्रधान देशाला न झेपणारी न पर्वडणारी गोष्ट आहे. म्हणून म्ह णते बांधवानो, उठा कष्ट करा ताठ मानेने उभे रहा. कष्टाची लाज वाटू देऊ नका. घामा चा वास शंभर डीओच्या नकली सेंट पेक्षा मौल्यवान असतो. त्यातच तुमची श्रीमन्ति दडलेली आहे.त्यातच तुमची व् पर्यायाने देशाची प्रगति व् सन्मान आहे.

         * जय महाराष्ट्र *
प्रा सौ शांता ठुबे (19)
अहमदनगर
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧

 "श्रमप्रतिष्ठा तथा श्रमाचे महत्व"
     
माणसाला उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी श्रम करावेच लागतात. यात फरक आहे तो,कोणाला कमी तर कोणाला अधिक श्रम करावे लागतात. हे श्रम कोणाचे शारीरिक तर कोणाचे बौध्दिक असतात. बौध्दिक श्रमाला आपल्याकडे वरचा दर्जा आहे कारण त्याना विद्वान समजल्या जाते आणि शारीरिक श्रमातही फरक केल्या जातो. त्यावरुन कामाचा दर्जा ठरविला जातो. खरंतर श्रम हे श्रमच आहेत. त्यात उच्च नीच असा कुठलाही भेद नाही. आपल्याकडे तर श्रमामध्ये स्त्री पुरुष असा सुध्दा भेद केला जातो. स्त्रियांची कामे पुरुष करु लागला तर त्याला हसणे आणि पुरुषाचे काम स्त्री करत असेल तर तिला धाडसी समजणे,हा श्रमभेद चूक आहे.
     श्रम कोणतेही असो त्यात उच्च नीच भेद न करता ते श्रध्देने,प्रामाणिकपणे करणे म्हणजे श्रमप्रतिष्ठा होय. श्रमाला खरी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली ती, महात्मा गांधी,गाडगे बाबा,श्रमर्षी बाबा आमटे या थोर विभूतीनी!महात्मा गांधीनी अस्वच्छ काम करणाऱ्यासोबत अस्वच्छ काम केले,गाडगेबाबा आधी गावातील घाण साफ करायचे नंतर किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील घाण साफ करायचे,श्रमर्षी उपाधी लागलेले बाबा आमटेनी तर श्रमाला उच्च दर्जाची प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. काम कोणते?हे महत्त्वाचे नसून त्याचा उद्देश महत्वाचा असतो. प्रामाणिकपणे केलेल्या कामाला आपोआपच प्रतिष्ठा प्राप्त होत असते.
     आजची आपली शिक्षणव्यवस्था ही वांझ आहे. शिक्षणातून माणसांच्या हाताला काहीही काम मिळत नाही. सरकारच्या नापास न करण्याच्या धोरणाने विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल आस्था उरली नाही. कसेबसे पास होत चाललेल्या पिढीला शिक्षण घेतल्यामुळे शेतात किंवा मजुरीची कामे करण्याची लाज वाटू लागली आहे. त्यामुळे आजची पिढी ही आळशी बनत चालली आहे.श्रम न करता शॉर्टकट मार्गाने पैसा मिळविण्याची स्वप्न ही पिढी पहात आहे.त्यामुळे या पिढीमध्ये श्रमाला महत्व उरले नाही.
          म्हणून समाज असो अथवा शाळा येथे आधी मोठ्या माणसांनी स्वतः काम करुन लोकांपुढे आदर्श ठेवला पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्याना शालेय जीवनातच श्रमप्रतिष्ठा शिकविली पाहिजे. यासाठी शालेय स्तरावर स्काउट-गाईड च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा रुजविली पाहिजे.
    अशा श्रमातूनच देशाची प्रगती साधता येणार आहे. यासाठी श्रमामध्ये उच्चनीच,स्त्रीपुरुष असा भेद न करता प्रत्येक कामाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी,हीच या कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा!
     -संगीता देशमुख,वसमत@14
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 " श्रमाचे महत्व "

बटण दाबले की चुटकी सरशी काम करण्याची आज सर्वांना सवय लागलेली आहे. अश्या काळात काम करणारी माणसे दिसली की त्यांच्या विषयी प्रत्येकाच्या मनात सहानुभूती निर्माण होते यांत शंका नाही. काळ बदलला तसे माणसे ही बदलली आणि त्या बदलानुरुप राहू आणि वागू लागली. संत रामदास स्वामी यांनी केल्याने होत आहे रे आधी केलेंचि पाहिजे असे सांगितले आहे त्यानुसार आपण हातपाय हलविले नाही तर आपणांस आपले निश्चित ध्येय मिळविता येणार नाही. पूर्वी काम करणाऱ्या लोकांची संख्या भरपूर होती. त्यामूळे काम करणाऱ्या माणसाला समाजात तेवढा मान सन्मान सुध्दा मिळत होता. परंतु हळूहळू काम करणाऱ्या माणसाची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहे. काम करणे आज बऱ्याच लोकाना कमीपणाचे वाटत आहे. ऐतखाऊ प्रवृत्ती बळावत चालली आहे. दे रे हरी पलंगावरी वृत्तीची माणसे पावलोपावली भेटत आहेत. त्यामूळे माणसांची पोट गोलगुटम होताना दिसत आहे. याची विविध कारणे आपणांस दिसून येतात. सर्वात पहिल्यांदा म्हणजे सुख सुविधा आणि चैन यासारख्या बाबीची सवय आत्ता सर्वाना जडली. पूर्वी श्रम करण्याशिवाय पर्याय नव्हता. आज त्यांस पर्याय निर्माण झाल्यामुळे कष्ट आपोआप कमी झाले. उदाहरण बघायचे तर पूर्वी बायका सकाळी पहाटे 04:00 वाजता उठून जात्यावर दळण दळायाचे तर आज गिरणी मुळे ते काम सोपे झाले म्हणजे त्यांचे कष्ट कमी झाले. असेच काही पाणी भरण्याकरीता झाले आहे. विहिरीची जागा नळ किंवा बोअरवेल ने घेतल्यामुळे पाणी भरण्याकरीता होणारा श्रम कमी झालाय. पुरुषांच्या कामाविषयी सांगायचे झाल्यास पूर्वी लोकं कोस दोन कोस सहज चालत जायचे अजिबात कश्याचीच वाट पाहत नव्हते. परंतु आज विविध वाहनांमुळे लोकांचे चालणेच बंदच झाले. त्यामूळे शारीरिक काम कमी झाले. आज जे विविध काम करणारी मंडळी दिसून त्यांच्याविषयी आपण नक्कीच आदरभाव ठेवावा आणि ही शिकवण आपल्या मुलांना करून देणे अत्यंत आवश्यक आहे, असे वाटते. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे
" आधी कष्ट मग फळ,
कष्टविना सर्व निष्फळ " हे ही लक्षात असावे.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧

 श्रम
"जिथे श्रमाने गळतो घाम
तिथे नांदतो माझा राम"
    असे बापूजी म्हणत कारण त्यांना खरया अर्थाने श्रमाचे महत्व कळालेले होते.सेवाग्रामला मी प्रत्यक्ष़़ डोळ्याने पाहीलेत ते शौचालय जे बापूजी स्वतः साफ करत असत."बोले तैसा चाले
                 त्याची वंदावी पाऊले" असेच होते बापूजी.जो श्रम करतो तोच स्वाभिमानाने जगू शकतो.काम मग ते कोणत्याही प्रकारचे असो त्याची प्रतिष्ठा सारखीच असते.सुप्रसिद्ध बिल्डर डिएसके अगोदर केवळ फोन पुसायचं काम करायचे.आज ते जगप्रसिद्ध बनले कारण ते श्रमपुजा करतात.एखादा आळशी व्यक्ती करोडपती असला तरी रोडपती बनायला वेळ लागत नाही.
      श्रमजिवी व्यक्तीचे यश पक्के असते.कर्मविर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेत तर विद्यार्थीदशेपासूनच स्वावलंबनाचे धडे दिले जातात ते यासाठीच."कमवा व शिका" हे तर त्यांचे ब्रिदच आहे.गांधीजी सुतकताई करून हाच तर धडा शिकवत असत.
     अभ्यासक्रमात कार्यानुभव हा विषय सुरू केला तो देखिल यासाठीच.शिवणकाम,बागकाम,मातीकाम,कागदकाम इ.बाबी त्यात प्रकर्षाने नमूद असतात.एक श्रमजिवी व्यक्ती दुर्लक्षित होवू नये म्हणून 1 मे हा दिवस "कामगार दिवस" म्हणून साजरा केला जातो.श्रमपुजक लोक आहेत म्हणूनच श्रिमंत लोक एेशोआरामात जगू शकतात.आज श्रमाचे काम करणारयाला जगात ताठ मानाने जगता येत आहे कारण हेच लोक आळशी लोकांच्या कुबड्या बनल्यात.एक दिवस जरी कामवाली व्यक्ती उपलब्ध नसेल तर उच्चभ्रू लोक अपंग होतात.गरीब लोक श्रिमंत घरात काम करून तंदूरूस्त रहातात व श्रिमंत लोक खाल्लेले पचविण्यासाठी जिममधे जावून घाम गाळतात.किती बरे हा विरोधाभास.विनोदाचा भाग सोडला तरी श्रम करणे हा कमीपणा समजू नये कारण मोत्याच्या हारापेक्षा श्रमाचा घाम अधिक मौल्यवान ठरतो.
       जाता जाता एवढेच सांगेन की "ज्या हातावर चट्टे व घट्टे तेच हात सुंदर"......
........जयश्री पाटील.
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧

श्रमप्रतिष्ठा
-----------------------
प्रथमत: महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा
-----------------------
भारत हा बहुतांशी खेड्याचा देश आहे म्हणजे शेतीप्रधान देश आहे. शेती म्हटले की श्रम, कष्ट, मेहनत आली सर्वाना आपआपल्या प्रकारे मेहनत करून उदरनिर्वाह भागवायचा आहे म्हणून कष्टाशिवाय पर्याय नाही.
प्रत्येक यशामागे,संपत्तीमागे,उच्चस्थानामागे,नावलौकिकामागे कष्ट आहे, श्रम आहे, मेहनत आहे म्हणुनच कष्ट कसे करावे हे आपन मुग्याकडून शिकावे. श्रमामुळेच आपणास प्रतिष्ठा प्राप्त होते हे आपण विसरू नये. असे म्हणतात "कडी से कडी जोड ते जाओ तो जंजीर बनती है
मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बनती है"
त्यामुळे मेहनतीशिवाय पर्याय नाही
श्रमास आपल्याकडे फार महत्व प्राप्त झाले आहे कारण बैठे काम करणारे लोक मधुमेह,रक्तदाब,सांधेदुखी,लठ्ठपणा या रोगानी ग्रासले आहेत आणि आजही आमचे खेड्यातील श्रमजीवी70-80वर्षाचे आजोबा ठणठणीत निरोगी जीवन जगत आहेत. अजुन पर्यत श्रमजीवी खेड्यात मधुमेह,रक्तदाब,सांधेदुखी लठ्ठपणा पोहचला नाही कारण त्यांच्या दिवस श्रमाने उगवतो व श्रमानेच मावलतो म्हणुनच या धकाधकीच्या जीवनातुन बुद्धजीवी लोकाना आपला जीव निरोगी ठेवायचा असेल तर सकाळची ताजी हवा,भरभर चालणे,योगासने यासारखे शाररिक श्रम करून श्रमप्रतिष्ठा प्रात करा व आजचे श्रमप्रतिष्ठा हे सदर यशस्वी बनवा
शेवटी एकच म्हणेण,
"मेहनत तनाची असावी
महेनत मनाची असावी
मेहनत करणा-याला
समाजाची लाज नसावी
-----------------------
कल्पना जगदाळे@8बीड
-----------------------
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧

 ------ श्रम प्रतिष्ठा किंवा श्रमाचे महत्व------
      श्रम प्रतिष्ठा म्हणजे कुठले ही शारीरिक  कष्टाचे काम,हलके, कमी महत्वाचे न मानता ते उत्साहाने मनापासुन करणे,असे काम करणाऱ्या श्रमिका बद्दल आदर बाळगणे,त्यांचा मान राखुन त्यांच्या  कामात सहभागी होणे म्हणजेच श्रम प्रतिष्ठा होय.
                     जीवनात काही मिळवायचे असेल तर शारीरिक व बौध्दिक कष्टाची  तयारी असावी लागते.श्रमाचे काम म्हणजे हलके काम अशी भावना असणे योग्य नाही.कोणत्याही कामाची लाज वाटता कामा नये कारण तसे असते तर रात्रंदिवस शेतात घाम गाळणारा शेतकरी , त्याला लाज वाटली असती तर आपली अन्नान्न दशा झाली असती.
                           प्रत्येक श्रमाचे काम सारख्याच दर्जाचे अशी भावना म्हणजेच श्रम प्रतिष्ठा होय.उद्याचा भारत शाळेतुन घडतो आहे म्हणुन महाराष्ट्र  शासनाने मुल्यशिक्षण हा विषय जुन1997 पासुन अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे.म्हणून  शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर काही श्रमाची कामे केली तर श्रमप्रतिष्ठा त्यांच्या  मनात निर्माण होईल यात शंकाच नाही.
                            निसर्ग ! माणसाला बरेच काही शिकवणारा गुरु आहे अळीने कोषातच गुरफटून राहायचे म्हटले तर,आळस केला तर फुलपाखरु तयार होईल ?
            तशीच अवस्था श्रम न करणाऱ्या  माणसांची  असते.श्रम न केल्यास उज्वल भवितव्याचे फुलपाखरु आनंदाने बागडू शकेल का ? जीवनात यशस्वी होण्यासाठी  श्रम म्हणजे कष्ट करण्याची खुप गरज आहे.  
                     God helps those,who help themselves.
                      श्रमाचे महत्व न जाणणारे विद्यार्थी  एकाच  बाकावर बसत असले तरी भविष्यात खुपदा विषम पातळीवर दिसतात असे का ? उत्तर साधं आहे , जो श्रम करतो तो ध्येयाजवळ जातो.म्हणजेच व्यक्तीच्या सार्वांगिण विकासासाठी एकाच गोष्टींची आवश्यकता असते ते म्हणजे श्रम.
                     जय किसान म्हणता म्हणता डोळ्यात तेल घालून देशाच संरक्षण करणाऱ्या  जवानाला विसरुन चालणार नाही,बर्फाळ,डोंगराळ प्रदेशात,वाळवंटी  प्रदेशात तो अहोरात्र तन मन धन अर्पुण देशाच रक्षण करीत असतो, सतत प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देत सजग राहिलेला असतो म्हणुनच आपण शांत झोप घेऊ शकतो. हे त्याने केलेले श्रमच नाहीत का ?    देशाचा आद्यौगिक विकास हा जवान,किसान,आणि कारखान्यातील  कामगार २४तास श्रम करतात म्हणुनच होतो.
                           श्रम ! मग ते शारीरिक असोत वा बौध्दिक महत्वाचेच कारण शेतकऱ्यांचा घाम, कामगारांचा घाम बुध्दीवंताच्या विचारांचा घाम पण हा सुखाचा,प्रगतीचा मुलमंत्र आहे.
                         दुसऱ्या  महायुद्धात  बेचिराख झालेला जर्मनी  किंवा अणुस्फोटात घायाळ झालेला जपान पुन्हा उभा राहिला,तंत्रज्ञानात अग्रेसर झाला तो त्यानी केलेल्या अपार श्रमामुळेच.एवढे श्रमाचे महत्व आहे डाँ. बाबासाहेब आंबेडकरानी अपार कष्ट घेतले म्हणून  ते सुप्रसिध्द घटनाकार झाले व त्यांनी  तयार केलेल्या संविधानामुळे माणसाला माणूस म्हणून जगणे शक्य झाले ते त्यांनी केलेल्या श्रमामुळेच.
                           श्रम न करणारा माणूस दगडासारखा असतो.माणसाला कळायला हवं ध्येय हे साधनेत म्हणजे श्रमात असते म्हणूनच म्हणतात " जेथे राबती हात तेथे हरी" आळसाने कार्य होउ शकत नाहि प्रगती म्हणजे घाम हवा, हा घामच माणसाचा राम आहे . आराम हराम आहे.
                           सौ .सानप मीना , बीड
  @7   9423715865 (स्पर्धेसाठी)
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧

 दर्पण-साहित्य दरबार आयोजित- स्पर्धा-भाग ३ रा
०१.०५.२०१६ – विषय- श्रमप्रतिष्ठा तथा श्रमाचे महत्व
प्रेषक – कुंदा पित्रे-शिवाजी पार्क,दादर, मुंबई. मो.९३२४७४२७०६
श्रम म्हणजे कष्ट ! हे कष्ट लहानपणापसुन अंगवळणी पडायला पाहिजेत मुले ही टीपकागदाप्रमाणे असतात.घरातील,कुटुंबातील,समाजातील आजुबाजुला वावरणा-या माणसांचे ती मुले अनुकरण करीत असतात.याला अपवादही आहेत.कि,काही लोक देवे ठेविल तैसे रहावे या वृत्तिचे असतात.आयुष्यात श्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही.मोठेपण कशात असते तर जिद्द,कष्ट,परिश्रम ! हे ज्याला कळते तो या त्रिसंज्ञेचा भक्कम आधार घेतो व एकलव्याप्रमाणे आपल्या जीवनाचे फलित साध्य करतो.त्याच्या नजरेसमोर एकच ध्येय कि, बस्स कुठेही,कधीही,नेकीने आपण कार्यरत राहिलो कि, विजयश्री आपल्या गळ्यात आपणहून माळ घालते.अर्थात त्यासाठी तशी परिस्थिती असावी लागते.संधी मिळावी लागते. आजुबाजुचे लोक तुमच्या गुणांवर विश्वास ठेवणारे असले पाहिजेत व सर्वात शेवटी नशीब हा फॅक्टर असतोच.!
आज महाराष्ट्रात कितीतरी खेडेगांवात कलाकार,उद्योगशील व्यक्ति खितपत पडलेल्या दिसतात. त्यांना पुढे आणण्याचे काम सरकारने केले पाहिजे.निरनिराळ्या संध्या उपलब्ध करुन दिल्या तर त्या खेडूतांचे जिणं सुकर होईल.अर्थात मुंबईत विणक-यानी विणलेल्या वस्त्रांचे प्रदर्शन,घरगुती बनविलेले खाद्यपदार्थ,मातीची भांडी यांची प्रदर्शने भरतात.परंतु यांतुन
ख-या कालाकाराला वा गृहिणीला कितीपत मदत होत असेल हा प्रश्न गहन आहे.म्हणजे मला म्हणायचे आहे की, या लोकांनी केलेल्या परिश्रमाचे चीज होते काय ? असो.
पण आपल्या देशात एक ध्येय ठरवुन,कठोर परिश्रम करुन उद्योगाचा,समाजसेवेचा,धार्मिकतेचा,राजकियतेचा पसारा मांडून असिधारा व्रत घेतलेल्या व्यक्ती म्हणजे – टाटा,बिर्ला, धिरुभाई अंबानीसारखे उद्योजक, लेप्रसीच्या लोकांचे पुनर्वसन कराणारे बाबा आमटे,-स्त्रियांसाठी लढणारे राजा राम मोहन राय, कर्वे, रानडे, डॉ,आनंदीबाई जोशीचे यजमान त्यांना साथ देणा-या आनंदीबाई ! समाजाने कितीही त्रास दिला तरी निद्रिस्त समाजाला आपल्या अभंगातून ईश्वर भक्तीमार्ग शिकविणारे ज्ञानेश्वर माउली,तुकाराम,मीराबाई अशी कितीतरी संत मंडळी ! आज महाराष्ट्र् दिनी शिवबाना विसरुन कसे बरे चालेल.!सतत घोड्यावर बसुन मराठ्यासाठी मुलुखगीरी करुन,मुस्लीम सत्ता,व घरगुती कारवाया यांना जिगरबाजीने टक्कर देणारे आपले महाराष्टाचे दैवत शिवाजी महाराज,
मेरी झाँसी नही दूंगी म्हणणरी राणी लक्ष्मीबाई, इंग्रजाना स्वराज्य हा माझा जन्मसिध्द आहे हे ठणकाऊन सांगणारे टिळक,भगतसिंग सारखे हुतात्मे,या व अशा कितीतरी लोकांचे परिश्रम आठवले कि, आपण आपोआपच नतमस्तक होतो.
आजची पिढी कोठे चालली आहे.? आजची तरुणाई टी,व्ही.सिनेमा,आता मोबाईल याच्या भोव-यात सापडलेय कां ? तिच्यात आलस्यत्व आलेय कां? महागडे शिक्षण,वाढती महागाई,बेकारी,सरकारचे बदलणारे कायदे (डान्सबार,तुरुंगातील बडी मंडळी इत्यादि) यातून निर्माण होणारे नैराश्य,
चोरी,तस्करी,खाबूगिरी,एकतर्फि प्रेम,आत्महत्या हे सगळे कां घडते आहे.इथे घरचे कमी पडताहेत,कि, या तरुणाईसमोर आदर्शच नाहीत कि, जरी ही तरुणाई उत्तुंग व्यक्तिमत्व पहात असून डोळे झाक करतेय.कि,श्रमप्रतिष्ठाच हरवत चालली आहे. ? असंख्य प्रश्नांची भेडोळी आज भारतात भिरभिरत आहेत. याला आळा घालण्याचे काम कुटुंब,शाळा,कम्पलसरी मिलिटरी शिक्षण, सामाजिक संस्था,सरकार यांनी जर येण्या-या पुढील पिढिकडे आत्मयतेने लक्ष दिले,व संध्या उपलब्ध झाल्या तर तरुणाईची मरगळ आपोआप दुर होऊन श्रमाशिवाय तरुणोपाय नाही हे ज्वलंत सत्य त्यांच्या नजरेच्या टप्यात येईल व आपला भारतभूमी सुजलाम्,सुफलाम ख-या अर्थाने होईल. महाराष्ट्र दिनाच्या तरुणाईला व ज्येष्ठांना शुभेच्छा !
जयहिंद ,जय महाराष्ट्र !
प्रेषक—कुंदा पित्रे—शिवाजी पार्क,मुंबई-मो.९३२४७४२७०६
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧

श्रमाचे महत्व
जीवनात श्रम महत्त्वाचे असून सध्या आपली जिवनशेली अत्यंत बॆठी झाली आहे. श्रमाचे मुल्य कमी झाले आहे. साधे लाईट अथवा पंख्याचे बटन सुद्धा बेडवरून संचालित करावे वाटत आहे. तसे नवनवीन शोध पण लावले जात आहेत.
पूर्वी एखादा कि.मी.अतंर चालायला काही वाटत नसे. सध्या बेडरूममधेच शोचालय हवे असते. कष्ट करण्याची थोडीही तयारी नाही ..
पण. निसर्ग माञ त्याची रीत सोडणार नाही त्यामुळे विविध विकार पाठी लागत आहेत.मग माञ morning waik करणे भाग पडते. आपल्या शास्त्रात सुद्धा वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम अनिवार्य केलेला आहे.
तर शरीर तंदुरूस्त ठेवायचे असेल तर श्रमाचे मुल्य अोळखावे लागेल.
   @२१ सुनिल बेंडे
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
।।।।।।। संकलन समाप्त ।।।।।।।।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा