शुक्रवार, २७ मे, २०१६

॥अभंग॥
॥देव भक्ता घरी ॥
उभा राहिला विटेवरी
भक्तांचा सावळा कैवारी ॥धृ॥
जनाबाई संगे ओढले जाते
गोकुळात गवळणीची मस्करी॥१॥

नामदेवा कीर्तनी नाचला हरी
मातीत माखला कुंभारा घरी ॥
सवंगडी सोबती खातो शिदोरी
मडकी फोडून दही दुध चोरी ॥२॥

पुंडलिका साठी उभा राहिला
तुकोबांचे अभंगात रंगला ॥
वारक-याचे हृदयीसंचरला
भगवी पताका आकाशी गगनाला ॥३॥
©✍🏻___ गजानन पवार
॥अभंग॥

॥देव भक्ता घरी ॥

उभा राहिला विटेवरी 
भक्तांचा सावळा कैवारी ॥धृ॥
जनाबाई संगे ओढले जाते
गोकुळात गवळणीची मस्करी॥१॥

नामदेवा कीर्तनी नाचला हरी
मातीत माखला कुंभारा घरी ॥
सवंगडी सोबती खातो शिदोरी
मडकी फोडून दही दुध चोरी ॥२॥

पुंडलिका साठी उभा राहिला
तुकोबांचे अभंगात रंगला ॥
वारक-याचे हृदयीसंचरला
भगवी पताका आकाशी गगनाला ॥३॥
©✍🏻___ गजानन पवार
सद्गुरू श्रीराम स्मरावे मनी
मी अल्प बुद्धी पाषाणी गुरू राया
गुरूराया मस्तक ठेवतो तव पाया....गुरूराया॥धृ॥
नाममंत्र देऊन सोपा
उध्दरीले जनलोका. ...गुरूराया॥१॥
भक्तिमार्ग दाखवून सोपा
सोडविले भवव्याधी भवतापा....गुरूराया॥२॥
अखंड नाम चिंतन गात मुखी
भक्तांसाठी माऊली सखी.....गुरूराया॥३॥
तुम्ही त्रिलोकी नाथ सागर
वेडा भक्त लोळतो चरणांवर....गुरूराया॥४॥
©गजानन पवार






॥कविता॥
वेदनेच्या निखा-या मधुन
जन्म घेते माझी कविता ॥
कधी लक्ष्मीपुष्पाच्या सुगंधी
पाकळ्या मध्ये जन्मते कविता॥१॥

दुःख पार घालते कविता
शब्दांच्या एका लाटे सरशी ॥
फुटती शब्द वेडे सुखाचे
एका हुंदक्या सरशी ॥२॥

कधी शब्दांच्या माळा बनती
कधीच काही कळत नाही ॥
गुंतून गेलो शब्द नगरीत
दिवस की रात्र कळत नाही ॥३॥

जाऊद्या सवयच जडली
शब्दाविना नाही करमत ॥
झोप हरवली व्यैरीन व्यर्थ,
नाही तहान भूक लागत ॥४॥

स्वप्न उरी बाळगून कविता
नविन असतो रोजच ध्यास ॥
चंदनाचे ही मिटते आयुष्य
घासल्याविना नसे सुवास ॥५॥

  • ✍🏻 ----- गजानन पवार 

गुरुवार, २६ मे, २०१६


श्री संत सद्गुरू ब्र परमपूज्य श्रीराम महाराज जांभरूणकर रचित श्री गणपती स्तोत्र

श्री गणपती स्तोत्र

जय जयाजी मंगलमूर्ति ।
नमन असो तुम्हा प्रती ॥
सुबुद्धी द्यावी मज निश्चिती ।
गौरी नंदना॥१॥
प्रत्येक कार्यात नाम तुझेच। घेणे लागे साच॥
सिद्धीस जाय कार्य आपोआप॥
 मायबापा गणेशा॥२॥
ॐकार स्वरूप तुझेच रूप ।
नच भेदाभेद तो अमुप॥
सर्वांभूती भरून उरला साच।
देवा लंबोदरा तुम्ही॥३॥
तुम्हा नमस्कार असो वारंवार।
शिर ठेवून चरणांवर ॥
तुच माझा आधार।
सर्वस्वी गणराय ॥४॥
भाव भक्ती प्रेम विश्वास ।
नामाचा अखंड तो ध्यास॥
कार्य जाय सर्व सिद्धीस।
देवा गौरी नंदना ॥५॥
देवा दिकांनीही तुज पुजिले।
तयालाही यश प्राप्त झाले॥
अपयश नच आले ।
तव कृपेकरोनिया ॥६॥
येता शुक्रवार दिन।
पुजावा गौरी नंदन ॥
शोडषोपचार करून ।
भाविकाने ते विबुध हो ॥७॥
आणिक वृत्त संकष्ट चतुर्थी ।
चंद्राची पुजा करावी ती ॥
वहाण्या दूर्वा आरक्त पुष्पे ती।
आणि दिप तो तुपाचा॥८॥
नैवेद्यास मोदक तो एकशे आठ ।
ओम मम मंत्र हा सुभट॥
जपावा तो अचाट।
टळेल सर्व ही संकट ते सत्य सत्य त्रिवाचा॥९॥
मन करावे स्थिर ।
ध्यानी घ्यावा लंबोदर॥
स्वार सदा तो मुषकावरी।
गौरी नंदन हा॥१०॥
सोंड असे अति छान।
सुर्पाकार जयाचे कर्ण॥
तशी शेंदराची उटी मनोहर।
असे जयाची अंगी सर्व काळ॥११॥
सुवर्ण करगोटा तो कमरेसी।
आणि यज्ञोपवीत निश्चिती॥
पिवळा पितांबर यथार्थ।
असे देवराया तुज॥१२॥
असे विष्णूचा अवतार।
भेदाभेद नच माना तिळभर॥
अद्वैत स्वरूप निरंतर।
नाम जयाचे विघ्नराज ते॥१३॥
इतकीच देवा कृपा करणे।
सर्वास सुबुद्धी देणे॥
आणिक ती सेवा घेणे।
भोळ्या भाविक भक्ताकडूनी॥१४॥
डाव्या सोंड्या गणपती।
असावा भाविक हो पुजे प्रती॥
अपयश नच ये कल्पांती।
ऐसी वाणी व्यास ऋषींची॥१५॥
शुक्रवारी वाहणे गुळ फुटाणे।
सर्वही दुर पळती संसारातील कुटाने॥
ऐसे सांगुन गेले संतजण शहाणे।
आपणालामूनी ते॥१६॥
करा मनोभावे नमस्कार ।
इच्छिले ते पुरवी गौरीकुमार॥
अनुभव घ्या तुम्ही खरोखर ।
ठेऊन विश्वास आपल्या मनी तो॥१७॥
माघ मास सुंदर।
तसा दिन सोमवार॥
तारीख एकविस इसवी सन 2000 ।
असे तिथी उत्तम द्वितीय ती॥१८॥
सहज बुद्धि दिली म्हणून।
हे स्त्रोत्र झालेसे निर्माण॥
गजानन कृपेकरून।
भाविक जन हो॥१९॥
हेच मागणे तुज सर्वकाळ।
तव नाम वदनी असो निश्चळ॥
नाम प्रतावे पळे काळ।
असे महिमान नामाचे॥२०॥
जे लिहीले आपल्या दैवात।
ते ते होय आपणा प्राप्त॥
अखेर स्मरत प्रभू गणनाथा।
ऐसे महिमान नामाचे॥२१॥
इतिश्री गणेश स्तोत्र।
परम अति पवित्र॥
करता करविता गौरीकुमार।
देवाधिदेव प्रभू तो॥२२॥
इति श्री दास गणूचा वेडा राम्याकृत गणेश स्तोत्र संपूर्ण................!!!!!

बुधवार, २५ मे, २०१६

...हायकू एक प्रयास...

पांढरे वस्त्र
नेसून शुभ्र काळे
ढगांचे शस्त्र

चाहूल झाली
निरभ्र अवकाशी
ऋतू बदली

वारे उनाड
रात्रंदिन वाहते
लागते वेड

निसर्ग सखा
प्रमुख निगडीत
तोल जो राखा

पावसाळ्यात
लावू झाड रोपटं
दिपक वात
✍🏻_____ गजानन पवार 

छाया कृपेची

     ॥छाया कृपेची॥
गोडी लागली नाम अमृताची
देवाजीच्या चरण धुळीची..॥धृ॥
मुखी वद्दावे दिनरात्र नाम महिमा
कार्यारंभी आवड हरचिंतनाची॥१॥
द्रुर्गुणासी आणि कुविचारा मारी
करावी वारी तू पंढरपूराची॥
भेटता विठ्ठल सखा श्रीहरी
झोळी सोडावी पापपुण्याची॥२॥
सुख दुःख सांग रख्खुमाईच्या वरा
एकरूप होई आळवणी बोलण्याची॥
मायाळू प्रेमळ संताची सावली
धरतो छत्रछाया कृपादृष्टीची॥३॥
------गगजानन पवार 





मंगळवार, २४ मे, २०१६



दि 24/5/2016 मंगळवार रोजी माझ्या शेतामध्ये दोन सुंदर सापांचा निसर्ग नजारा चित्रिकरण करताना खुप आनंद झाला..
।।नामाचा महिमा।।
अमृतची गोडी
लागली जीवाला
नामे चिंतनी
रंगले हे मन..!!
विठ्ठलची जोडी
विठ्ठलची गोडी
विठ्ठल आवडी
मनाशी रात्रंदिन..!!
बोला नामाचा महिमा
सुखा नसे तेथे सिमा
होता दास पायाचा
लागे सार्थकी जीवन..!!
✍🏻_____ गजानन पवार

रविवार, २२ मे, २०१६

रूप सुंदर

🌹रूप सुंदर 🌹
सावळे रूप तुझे
सावळी प्रतिमा
मुरली मनोहर
घननीळा घनश्यामा......!!||धृ||
मोहक मुरली
मंजुळ ध्वनी
समाधान झाले
माझिया मनी.......!!
यशोदेचा बाळा
गोपिकांचा लडिवाळा
राखतो गोधन
सवंगडी करून गोळा......!!
चोरी हा चित्त
खातो नवनीत
साठवूण ठेवा
तया हृदयात.......!!
----- गजानन पवार

रविवार, १५ मे, २०१६

♢♢♢संकलन प्रारंभ ♢♢♢
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

उद्या रविवार " विचारमंथन " भाग 55

विषय :- * स्कूल चले हम * अर्थात * आई शाळेत जायचय मला *

परीक्षक :- सौ ,संगीता देशमुख ( माई )

संकलन :- श्री ,गजानन पवार

ग्राफिक्स :- उत्कर्ष देवणीकर
ब्लाॅग ऑपरेटर :- संजय पाटील

वेळ :- सकाळी 10 ते सायं , 5

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
🌹🍁चिंतनस्पर्धा 🍁🌹
     🌷चला शाळेला🌷

   आजचा विषय आहे...
       चला शाळेला
   शाळेची आठवण झाली की खरंच अजूनही.. म्हणजे
वयाच्या बहात्तरीत असतानाही वाटत राहतं..
परत लहान व्हावं... शाळेत जावं... लक्ष देऊन बाईंचं
शिकवणं ऐकावं.... मन लावून अभ्यास करावा... उत्तम गुण प्राप्त करावेत..
शाळेतील प्रत्येक स्पर्धेत
हिरिरीने भाग घ्यावा...
पूर्ण प्रयत्नांनी पहिला नंबर
काढावा आणि बाईंची शाबासकी मिळवावी.
   खरोखर ही सारी स्वप्नं
शाळेतच पूर्ण होतात.
शाळा म्हणजे मुलामुलींच्या मनावर उत्तमोत्तम संस्कार
करणारी, त्यांच्या जीवनाला सुयोग्य वळण लावणारी,
मलांची क्षमता, योग्यता,
कुवत वाढविणारी व त्यांना
स्वतःच्या पायावर उभी करणारी.. एक महत्त्वाची संस्थाच असते.
       आपला लहानपणीचा
जास्तीत जास्त काळ हा...
शाळेत.. गुरुजन व मित्र मैत्रिणींसमवेत जात असतो.
घरी पालकांच्या व शाळेत गुरुजनांच्या...... शिस्त, देखभाल व निगराणीत मुलं
मोठी होत असतात. वाढत
असतात.
        त्यांची क्षमता, कुवत
व योग्यतेप्रमाणे ती ग्रहण
करीत असतात...
      व तसेच घडायला हवे.
घरातून शाळेतून उत्तेजन,
प्रोत्साहन मिळत जाते...
मुलांची प्रगती होत जाते...
त्यांच्या पंखात बळ येत
जाते आकाशात स्वतंत्रपणे झेप घ्यायला ते समर्थ होत जाते.. सक्षम बनत जाते.
     .. आपल्या आयुष्यात शाळेचे, गुरुजनांचे अशा
प्रकारचे हे....
    केवढे तरी मोठे, महान योगदान असते. अर्थात मुलेही तेवढीच स्पंदनशील,
टीपकागदाप्रमाणे... शिकवलेले सर्व आत्मसात
करणारी हवीत. आचरणात
आणणारी हवीत. नाहीतर
पालथ्या घड्यावर पाणी !
...... असेच होणार की !
      लग्नानंतर १३ वर्षांनी
( आधी मॅट्रीक होते.) पुढील
 शिक्षण सुरू केलेले.
           बी. ए. पार्ट वन ते
पी एच् डी.. हा २१ वर्षाचा काळ सुवर्णकाळ वाटला होता. पण शालेय जीवनही खूप भर्जरी म्हणावे..
                      असेच गेले.
आज अगदी असेच मनापासून वाटते आहे.
        खच्चून आणि टिच्चून म्हणावा.. असा अभ्यास करत,
 सर्व स्पर्धेत, सर्व उपक्रमात भाग घेत..... कधी पहिला कधी दुसरा नंबर मिळवत.. राज्य पातळीवरही अनेक
पारितोषिके, अनेक बक्षिसे मिळवत सर्व गुरुजनांची लाडकी विद्यार्थिनी तर झालेच होते.
सर्वप्रिय मैत्रिण म्हणूनही निवड होऊन...
     निर्मलाराजे भोसले
... यांचे हस्ते प्रशस्तीपत्र
मिळाले होते.
म्हणूनच या गहिऱ्या दिवसांची आठवण झाली की प्रकर्षाने वाटतं.
           चला परत शाळेला.
      @ 05 डॉ. शरयू शहा.

♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
विचारमंथन
आई शाळेत जायचंय मला

 नमस्कार
आमच्या घरात मीच मोठी.पहिली बेटी धनाची पेटी,वडीलांची लाडकी लेक,
   कर्जत माझे माहेर. आम्ही वाड्यात रहायचो.वाड्यात एकी होती.बरोबरीची मुले मुली खूप .इतरांचे पाहून,मी हट्ट धरला मलाही शाळेत जायचेय.बालवाडीत घातले आईने मला.गणपतीच्या देवळात शाळा भरत असे.आईची मैत्रिण मंजूमावशी शाळा घ्यायच्या.वय चार .वार. महिने ,नक्षत्र तोंपाठ होते घरी धार्मिक वातावरण होते शुभंकरोती परवचा इ.आईने शिकवले होते त्यामुळे बाईंची मी लाडकी. पण मी एका ठिकाणी बसत नाही सारखी जागा बदलते अशी त्या आईकडे लटकु तक्रार करत.नंतर मराठी शाळा ,जीवन शिक्षण मंदिर.१ली ते ४थी पर्यंत तेथेही मी सर्वांची लाडकी होते जोशी बाई वाड्यातच रहात.पाटील गुरुजी म्हाथात्रे गुरुजी अजुनही आठवाण येते सर्वांची.प्रार्थना म्हणायला आम्ही तिघी पुढे असू
नंतर अभिनव ज्ञान मंदिर १२वी पर्यंत मग k m c collage खोपोली .ते मी नोकरी करुन शिकले रेल्वेत नोकरी होती.अजुनही शाळेची आठवण येते
    ही आवडते मज मनापासूनी शाळा
लाविते लळा ही
जसा माऊली बाळा.
आवडती कविता.माझे निबंध बाई वाचुन दाखवायला सांगत मला सर्वांना,चित्रकला मात्र यथातथाच b grade.
पाच वर्षापूर्वी आमच्या शाळेच्या १० वी १२ वी बँचचे स्नेहसंमेलन झाले.
सर्व जुने मित्रमैत्रिणी भेटले.तो काळ जुना ७६ची नवी दहावीची बँच,मुलेमुली फार बोलत नसू आम्ही पण आता दिलखुलास गप्पागोष्टी झाल्या .मजा आली तो अविस्मरणिय दिवस होता आमच्यासाठी.
आता आमची मुले काँलेजात होती .आणि मुले आम्हाला शाळेत सोडायला आली होती माझा मुलगा गाडी चालवत होता .आहे की नाही गंमत .
 स्कूल चले हम चाळीशीत.
 टीव्ही वर सलिल कुलकर्णींची शाळेला भेट देण्याची सिरियल झाली नि वाटले आपणही आता शाळेत असतो तर मजा आली असती
त्यावर मी कविता केलेली.

पुनः वाटते लहान व्हावे
शाळेत पुनश्च फिरुनी जावे
सलिलदाने शाळेत यावे
सोपे सोपे प्रश्न विचारावे.
टीव्हीवरती आम्ही दिसावे
पुनं वाटते लहान व्हावे.
  इति लेखनसीमा
 प्राची देशपांडे







♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
विचारमंथन
आई शाळेत जायचंय मला

 नमस्कार
आमच्या घरात मीच मोठी.पहिली बेटी धनाची पेटी,वडीलांची लाडकी लेक,
   कर्जत माझे माहेर. आम्ही वाड्यात रहायचो.वाड्यात एकी होती.बरोबरीची मुले मुली खूप .इतरांचे पाहून,मी हट्ट धरला मलाही शाळेत जायचेय.बालवाडीत घातले आईने मला.गणपतीच्या देवळात शाळा भरत असे.आईची मैत्रिण मंजूमावशी शाळा घ्यायच्या.वय चार .वार. महिने ,नक्षत्र तोंडपाठ होते घरी धार्मिक वातावरण होते शुभंकरोती ,परवचा इ.आईने शिकवले होते त्यामुळे बाईंची मी लाडकी. पण मी एका ठिकाणी बसत नाही सारखी जागा बदलते अशी त्या आईकडे लटकी तक्रार करत.नंतर मराठी शाळा ,जीवन शिक्षण मंदिर.१ली ते ४थी पर्यंत तेथेही मी सर्वांची लाडकी होते.अभ्यासात पुढे एकपाठी . जोशी बाई वाड्यातच रहात.पाटील गुरुजी ,म्हात्रे गुरुजी पाटणकर बाई अजुनही आठवण येते सर्वांची.प्रार्थना म्हणायला आम्ही तिघी पुढे असू
नंतर अभिनव ज्ञान मंदिर १२वी पर्यंत मग k m c collage खोपोली .ते मी नोकरी करुन शिकले रेल्वेत नोकरी होती.अजुनही शाळेची आठवण येते
    ही आवडते मज मनापासूनी शाळा
लाविते लळा ही
जसा माऊली बाळा.
आवडती कविता.माझे निबंध बाई वाचुन दाखवायला सांगत मला सर्वांना,चित्रकला मात्र यथातथाच b grade.
पाच वर्षापूर्वी आमच्या शाळेच्या १० वी १२ वी बँचचे स्नेहसंमेलन झाले.
सर्व जुने मित्रमैत्रिणी भेटले.तो काळ जुना ७६ची नवी दहावीची बँच,मुलेमुली फार बोलत नसू आम्ही पण आता दिलखुलास गप्पागोष्टी झाल्या .मजा आली तो अविस्मरणिय दिवस होता आमच्यासाठी.
आता आमची मुले काँलेजात होती .आणि मुले आम्हाला शाळेत सोडायला आली होती माझा मुलगा गाडी चालवत होता .आहे की नाही गंमत .
 स्कूल चले हम चाळीशीत.
 टीव्ही वर सलिल कुलकर्णींची शाळेला भेट देण्याची सिरियल झाली नि वाटले आपणही आता शाळेत असतो तर मजा आली असती
त्यावर मी कविता केलेली.

पुनः वाटते लहान व्हावे
शाळेत पुनश्च फिरुनी जावे
सलिलदाने शाळेत यावे
सोपे सोपे प्रश्न विचारावे.
टीव्हीवरती आम्ही दिसावे
पुनं वाटते लहान व्हावे.
  इति लेखनसीमा
 प्राची देशपांडे

♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
🌹🍁चिंतनस्पर्धा 🍁🌹
     🌷चला शाळेला🌷

   आजचा विषय आहे...
       चला शाळेला
   शाळेची आठवण झाली की खरंच अजूनही.. म्हणजे
वयाच्या बहात्तरीत असतानाही वाटत राहतं..
परत लहान व्हावं... शाळेत जावं... लक्ष देऊन बाईंचं
शिकवणं ऐकावं.... मन लावून अभ्यास करावा... उत्तम गुण प्राप्त करावेत..
शाळेतील प्रत्येक स्पर्धेत
हिरिरीने भाग घ्यावा...
पूर्ण प्रयत्नांनी पहिला नंबर
काढावा आणि बाईंची शाबासकी मिळवावी.
   खरोखर ही सारी स्वप्नं
शाळेतच पूर्ण होतात.
शाळा म्हणजे मुलामुलींच्या मनावर उत्तमोत्तम संस्कार
करणारी, त्यांच्या जीवनाला सुयोग्य वळण लावणारी,
मलांची क्षमता, योग्यता,
कुवत वाढविणारी व त्यांना
स्वतःच्या पायावर उभी करणारी.. एक महत्त्वाची संस्थाच असते.
       आपला लहानपणीचा
जास्तीत जास्त काळ हा...
शाळेत.. गुरुजन व मित्र मैत्रिणींसमवेत जात असतो.
घरी पालकांच्या व शाळेत गुरुजनांच्या...... शिस्त, देखभाल व निगराणीत मुलं
मोठी होत असतात. वाढत
असतात.
        त्यांची क्षमता, कुवत
व योग्यतेप्रमाणे ती ग्रहण
करीत असतात...
      व तसेच घडायला हवे.
घरातून शाळेतून उत्तेजन,
प्रोत्साहन मिळत जाते...
मुलांची प्रगती होत जाते...
त्यांच्या पंखात बळ येत
जाते आकाशात स्वतंत्रपणे झेप घ्यायला ते समर्थ होत जाते.. सक्षम बनत जाते.
     .. आपल्या आयुष्यात शाळेचे, गुरुजनांचे अशा
प्रकारचे हे....
    केवढे तरी मोठे, महान योगदान असते. अर्थात मुलेही तेवढीच स्पंदनशील,
टीपकागदाप्रमाणे... शिकवलेले सर्व आत्मसात
करणारी हवीत. आचरणात
आणणारी हवीत. नाहीतर
पालथ्या घड्यावर पाणी !
...... असेच होणार की !
      लग्नानंतर १३ वर्षांनी
( आधी मॅट्रीक होते.) पुढील
 शिक्षण सुरू केलेले.
           बी. ए. पार्ट वन ते
पी एच् डी.. हा २१ वर्षाचा काळ सुवर्णकाळ वाटला होता. पण शालेय जीवनही खूप भर्जरी म्हणावे..
                      असेच गेले.
आज अगदी असेच मनापासून वाटते आहे.
        खच्चून आणि टिच्चून म्हणावा.. असा अभ्यास करत,
 सर्व स्पर्धेत, सर्व उपक्रमात भाग घेत..... कधी पहिला कधी दुसरा नंबर मिळवत.. राज्य पातळीवरही अनेक
पारितोषिके, अनेक बक्षिसे मिळवत सर्व गुरुजनांची लाडकी विद्यार्थिनी तर झालेच होते.
सर्वप्रिय मैत्रिण म्हणूनही निवड होऊन...
     निर्मलाराजे भोसले
... यांचे हस्ते प्रशस्तीपत्र
मिळाले होते.
म्हणूनच या गहिऱ्या दिवसांची आठवण झाली की प्रकर्षाने वाटतं.
           चला परत शाळेला.
      @ 05 डॉ. शरयू शहा.

♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
 मी सुलभा कुलकणीॅ
विचार मंथन
आई!मला शाळेत जायचे!
माझे वय सागायला वाटते लाज. तरी मला आजही शाळेत जावेसे वाटते. पिशवीचे दप्तर,दगडी पाटी पेन्सील पट्टी, पाटी पुसायचे फडके व स्पंजाची डबी आठवते सारे!
   माझे शिक्षक, माझ्याबाई आणि माझ्या शाळेची ईमारत नळबाजार म्यु म. शाळा 4था कुभारवाडा.अशी पाटी लिहीलेली शाळा आठवते.
    याच शाळेत आयुष्याची सुरूवात करतो आहे हे न कळणारे वय! पण पाटीवर गमभन आणि12345 हे अंक काढल्यावर पाठीवरची शाबासकी आठवते. पण अक्षर खराब म्हणून ग 25वेळा गिरवावा लागला हे ही आठवते.
      हळूहळू अभ्यासची लागलेली गोडी चालीवर म्हटल्या जाणा-या कविता गाणी. हावभावयुक्त गोष्टी सगळे आठवते फूलपाखरू छान किती दिसते. नाच रे मोरा लहान माझी बाहुली नाचून म्हणून दमल्यावर वाटीतील गूळशेगदाणे चवीचे आठवतात
      हळूहळू सवाॅची लाडकी
     सोनू 4थी पास झाली आणि नळबाजार शाळा सुटली खेतवाडी शाळा 7वी पयॅत नंतर पुढे कन्याशाळा मॅट्रीकची परिक्षा.3वेळा शाळेचा निरोप समारंभ अनुभवावा लागला.शाळा सोडताना खूपच वाईट वाटले पण अजूनही आवडते मज मनापासूनी शाळा असेच म्हणावेसे वाटते.
    नातवाबरोबर शाळेत जाण्याचा हट्ट धरावासा वाटतो. बसायला आसन,
पहिला बाक मित्रमैत्रीणी शाळेत मिळणारा खाऊ मुख्य शिक्षणाची आवड म्हणून आता म्हणावेसे वाटते.
    प्रतिक बाळा तुझ्या आजीला तुझ्याबरोबर मला पण शाळेत जायचे आहे.
 आज विचारमंथनाने संधी मिळवून दिली त्याबद्दल साहित्यमंथनचे आभार
  चला आता गझलशाळेत जाऊ या. ती पण शाळाच ना!
चला आई दादा मला शाळेत जायचे! नाव घाला माझे.
      नमस्ते गुरूजी आणि बाई.
 धन्यवाद दप्तर भरते आहे.

♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
 काही दिवसापुर्वी मी एक सत्त्य लघुकथा लीहीली होती..ही कथा माझा अनुभव आहे व या कथेतील पात्र " सुकेशना " ही आपल्या आई वडीलांना न बोलता ही अबोलपणे हेच सांगतेय की
" आई,शाळेत जायचय मला "
👇👇👇👇👇👇👇👇

 मी मूलगी म्हणून का ?

          "सर, माझ्या वडीलांनी क्लासला जायच नाही असं सांगितलय,"आठवीत असणाऱ्या सुकेशनाचा थरथरता आवाज माझ्या अंतरमनाचा ठाव घेत होता...मी म्हटलं,"का गं?" ती म्हणाली," सर माझा लहान भाऊ चौथीत शिकतोय,इंग्लीश मेडीयमला..वडील म्हणतायत की त्याची शाळेची फीस व ट्युशनची फीस भरायचीय,तुझी ट्युशन बंद कर...त्याची फीस भरेन तुझी भरणार नाही.."मला सर्व काही कळालं होतं..
            तीनं सांगीतलेलही अन् न सांगीतलेल ही..आजही मुलगा आणी मुलगी हा फरक
होतोय..सरकारी शाळेत शिकणारी सुकेशना...अतिशय हुशार मुलगी..सतत काही तरी नवीन शिकण्यासाठी धडपडणारी..इतक्या लहान वयातही आपलं मन मारुन जगतेय तिच्या वाट्याचं भावाला देतेय..माझं मन आतुन झुरत होतं..का असा फरक...?
           न राहवून मी शेवटी तिच्या घरी फोन केला..योगायोगाने फोन तिच्या आईने उचलला...मी विचारलं," सुकेशनाला ट्युशनसाठी नको का म्हणताय..हुशार आहे ती..येऊ द्या तिला..पलीकडुन आवाज आला," सर नको म्हटलेत हो हेनी,पैसे नाही म्हणत्यात". मी म्हटल,"मुलाला महागड शिक्षण देताय अन् मुलीला असं का करताय हो" माझा बोलण्याचा अधिकार नव्हता तरीही न राहवून हेे शब्द गेले..या शब्दाने जणु त्या माऊलीच्या मनाचा बांधच तुटला..
          "असच करत्यत सर हेनी, पोरीला साधी वही बी घेऊन देत न्हाईत,पोरगी बी लई घाबरत्याय त्यांना...काय सुद्दीक बोलत नाय त्यांच्या म्होरं" आवाजातील कंप वाढत गेला..त्या आवाजातील द्रावकता हृदयाला जाऊन भिडली....मातेचा आपल्या मुलीसाठी तुटणारा जीव व स्त्री असल्याकारणाने स्त्री जातीबद्दल तीला वाटणारी अनामीक ओढ जाणवली..
          माझा त्या वर्गावरील तास संपला होता..पुढील तास घेण्यासाठी संपत गायकवाड सर येऊन थांबले होते..त्यांनी माझ्या चेहऱ्यावरील भाव जाणले असावे कदाचीत..ते म्हणाले..
" Any problem sir..? "
           मी सर्व हकिकत सांगितली...त्यांनी लगेच उत्तर दीलं," सुकेशनाला १०वी पर्यंत कोणतीही फीस घ्यायची नाही..गरज पडल्यास वह्या पुस्तकाचा खर्च ही आपण करु" माझ्या मनावरचा फार मोठा भार कमी झाल्यासारख वाटल..
वाटलं की दोन समविचारी व्यक्ती एकत्रीत आल्यानंतर कामं सोपी होतात...आणि होतातच..सुकेशनाच्या वडीलांना भेटण्याची अतीदाट इच्छा मनात होती...क्लास सुटल्या नंतर भेटीसाठी गेलो..गळ्यात वारकरी संप्रदायी लोकांची माळ,कपाळावर गंधाचा टीळा आता या माणसाला काय बोलावं..?
           संपत सरांनी व मी एकमेकांकडे पाहुन स्मीत हास्य केलं..सुकेशनाच्या आईने चहा घेऊन जाण्याचा आग्रह केला..चहा घेत घेत सुकेशनांच्या पालकांना आमचा निर्णय सांगितला..सुकेशना व तीच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव ही आमची अमुल्य कमाई घेऊन आम्ही तेथुन नीघालो...आज मनाला खुप मोठी शांती लाभली होती..
     
@ उत्कर्ष देवणीकर
उमरगा

♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
"आई,शाळेत जायचं मला"
      सध्या शाळाना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. पण आज मध्यमवर्गीय पालक आपल्या पाल्याना शाळेत प्रवेश देण्यासाठी आपल्या शहरातीलच नाही तर आजूबाजूच्या मोठ्या शहरातील शाळानशाळा पिंजून काढत आहेत कारण त्याना आपल्या पाल्याला उत्तमात उत्तम शाळेत प्रवेश मिळवून द्यायचा आहे. आपल्या पाल्याने आत्तापासूनच म्हणजे वयाची अडीच वर्षे पूर्ण केले तेव्हापासूनच तो उत्कृष्ट हवा आहे. आज त्याचा पाया पक्का होऊन त्याच्या वयोगटातील मुलांसोबत तो स्पर्धेत अव्वल राहिला पाहिजे,ही मध्यमवर्गीय पालकांचे स्वप्न आहे आणि त्यासाठी हा उन्हाळा सुध्दा त्याना स्वस्थ बसू देत नाही. प्रत्येक शाळेला भेट देऊन इमारत,तेथील भौतिक सुविधा,तेथील विषय,शिकविणारे शिक्षक या सर्व बाबींची कसून पाहणी सुरु आहे. एवढेच नाही तर, घरी येऊन पुन्हा पती-पत्नी,शेजारीपाजारी,यांच्यात चर्चा करुन भरमसाठ देणगी सह शाळेची फीस भरून मुलाचा प्रवेश निश्चित केला जातो. एकदा प्रवेश केला की,मग सुरु होते शालेय साहित्याची उच्चदर्जाची खरेदी! आठवड्यातील कमीत कमी तीन गणवेश,तीन शूज,स्कूलबॅग,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाजवतील अशा वह्या,वेगवेगळ्या प्रकल्पाची पुस्तके अन् अजून बरेच काही!हे सगळे करताना पालकाना फक्त एक समाधान असते की,आपण आपल्या मुलाला प्रतिष्ठीत शाळेत टाकून आपण आपली प्रतिष्ठा जपली.हे आहे मध्यमवर्गीय मुलांचे शाळेत जाणे.
        हे आहे आपल्याभोवतीचे वलय! हे मर्यादित वलय सोडून आपण थोडे दोन पावले पुढे गेल्यावर लक्षात येईल की,"आई,मला शाळेत जायचंय!" ही आर्त हाक हवेतच विरुन जाते. आपल्या देशात दारिद्र्य आणि श्रीमंती ही विषमता कमालीची आहे. एकीकडे शाळेत प्रवेश द्यायचा म्हणून पायपीट तर दुसरीकडे पोटासाठी हिंडणाऱ्या लोकाना मुलांच्या शिक्षणाबाबत कमालीची उदासिनता आहे. उदासिनता म्हणण्यापेक्षा शिक्षणापेक्षा पोट भरण्याचा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा असतो. त्या मुलाना ना पोटभर अन्न मिळतं ना अंगभर कपडा! आपला मुलगा शाळेत जाऊन शिकण्यापेक्षा आज त्याने काम करुन कुटुंबाला हातभार लावणे,आणि आईवडील कामावर गेल्यावर मुलीने घरकाम करुन लहान भावंडाना सांभाळणे,ही त्यांची गरज असते.
       
         अशा कुटुंबातील मुलामुलींनाही आपल्या आजूबाजूची मित्रमैत्रिणी शाळेत जातात,छान गणवेश घालतात,पाठीवर दप्तर टाकून गाडीत बसून जातात,तो/ती पाठीवर दप्तर टाकतो तेव्हा ह्याच्या डोक्यावर भारा तर हिच्या कडेवर लहान भावंड किंवा पाण्याची घागर असते. तेव्हा याचेही मन आतून साद घालते,"आई,मला शाळेत जायचंय!" पण ही हाक ऐकायला त्याच्या आईला वेळच कुठे असतो?? त्या लेकरांच्या डोळ्यांत स्वप्न पेरायला किंवा किंवा त्याच्या डोळ्यातील स्वप्न वाचायला वेळ नसतो.
      ही दरी मिटविणे शक्य नसले तरी यातील अंतर आपण बरेचसे कमी करु शकतो.
  "जाणवाया दुर्बलांचे दु:ख आणि वेदना,
तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना"
  या काव्यपंक्तीप्रमाणे आपल्या संवेदना जागृत असल्या तर आपण हे विषमतेचे अंतर निश्चितच कमी करु शकतो. आपण आपल्या पाल्याच्या शिक्षणावर जेवढा खर्च करतो,त्याच्या २०% जरी खर्च आपण अशा गरजवंताच्या शिक्षणावर केला तरी त्या वंचिताचे "आई,मला शाळेत जायचय!" हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तोही भावी आयुष्यात स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो व माणूस म्हणून स्वाभिमानाने जीवन जगू शकतो.
      संगीता देशमुख,वसमत @59

♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
 साहित्य मंथन – विचार मंथन द्वारा –आयोजित स्पर्धा – भाग –५५वा.
विषय – आई शाळेत जायचय मला प्रेषक—कुंदा पित्रे (४६)
खरं म्हणजे वरील शब्दच माझ्या वाट्याला आले नाहीत.कारण एकत्र कुटुंबात आई हा शब्दच हरवला होता.शिवाय माझे वडिल गावातील मोठी थोर व्यक्ती होती. शाळा त्यांनीच स्थापन केलेली होती. मी भावंडातील शेंडेफळ मग काय मोठी भावंडे ज्या शाळेत गेली तिथेच मी जाऊ लागले. खर तर माझे शिक्षण त्रिस्थळी,त्रिवेणी संगमावर उभे आहे.पण ममाझे पहिली ते सातवी गावाच्या शाळेचे शिक्षण परत येईल कां ? जशी पहिली नेसलेली साढी,पहिलं प्रेम,पहिला पाऊस याला जसं ह्रदयाच्या कोप-यात घट्ट स्थान असते ना ! तसं हा विषय मिळाला व साठ वर्षापूर्वीचा काळ जिवंत झाला.नव्या पुस्तकांचा नाकात शिरलेला वास अजूनही रेंगाळतोय आता जरी मोठाली पुस्तके पालथी घातली तरी.,पावसात कागदी होड्या करुन सोडण्यापासून ते आंब्याच्या दिवसात कै-या पाडून फ्रॉकच्या खिशात मीठ तिखट आणून मैत्रीणीबरोबर घेतलेला आस्वाद, शाळेत साजरा होणारा शारदोत्सव त्यात घेतलेला सहभाग,आवाज बरा असल्याने रोज म्हटलेली प्रार्थना,झेंडावंदनाच्या वेळी म्हटलेली स्वातंत्र्यगीते.वरं अभ्यासात वा शाळेत कधी स्पर्धा नसत,दोन हजार वस्तीच गांव तेथे कुठे स्पर्धा वगैरे पण माझा वर्गात नेहमी दुसरा तिसरा नंबर असे कारण गणित हे यमदुतासारखे भासे.असो.फ्रॉकातून, परकरातून,साडीत आले कळलेच नाही कारण सातवी झाल्यावर पुढिल शिक्षणाचे दरवाजे बंद झाले.पण घरातील स्त्री,मनोहर,किर्लोस्कर ४५० जुने अंकाची पारायणे केली. शाळेत जायचेच हा अंकुर मात्र कायम जागृत राहिला. तब्बल सहा वर्षानी मुंबईत येणे होऊन आठवीत प्रवेश व विवाहाची वेदी देखील पार झाली. परंतु शाळेत जायचयं हे ब्रीद कायम गिरगांवातल्या मुलींच्या शाळेत प्रवेश तिथे सुध्दा दुसरा नंबर कधी सोडला नाही. इथेही वर्गातील मुली पांचवीपासुन इंग्रजी घेतलेल्या मी तेव्हा एबीसीडी शिकत होते – म्हणून इंग्रजी – परकी ती परकीच राहीली.तिच्याशी नाळ जुळलीच नाही. एसएसी(अकरावी)साठाला थोडे कमी मार्कस् मिळवून गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले परत सासुरवाशीण ! कौतुक कोण करणार ! कारण वयाने मोठी म्हणून शाळेत अनफिट,घरात शिक्षण कमी म्हणून अनफिट हे कळले तरी मनातला पुढील कॉलेज शिक्षणाचा वसा सोडणार नव्हतेच पण मला नवागताची चाहुल लागली. जुळे जन्माला आले मग पुढे परत चार वर्षे शिक्षण डोक्यातून बाजूला पडले,चार वर्षानंतर मला मिस्टरांचे गुरुजी भेटले त्यांचा एस एन डी चा क्लास होता म्हटले चला कॉलेज नाही तरी बाहेरुन तरी शिकून पुढे जायला काय हरकत आहे. कारण मुले अगदीच छोटी होती आणी शिकायची तहान मी तडक एम एम मराठी घेऊन पुर्ण केली तिथेसुध्दा हायर सेकंड क्लास सोडला नाही. या शिक्षणाच्या त्रिस्थळी यात्रेत मला चांगले मार्गदर्शक ,गुरुजन भेटले. मनाची मशागत नितळ,साजरी गोजीरी झाली. बाहेरच जग कसे असते त्याचा अनुभव मिळाला. आयुष्याची जडण घडण मजबूत झाली. विचाराना दिशा मिळाली.मुलं लहान शिवण शिकले पण पुढे उपयोग केला नाही मग गायन शिकत होते पण वयाच्या ५५ वला भवगीत शिकू लागले पण काही अडचणीमुळे सोडले. रेकी दोन भाग शिकले.एक्युप्रेशर शिकले. पण उपयोगात आणले नाही. पण अरोमा थिअरपी शिकले ती इतकी भावली की, आजही मी गुडघ्यावरची तेले बनवून देते. मालीश ,फेसियल करते.१९७६ ते १९९२ पर्यत माझे वाचन थांबले होते. पण १९९२ ला लोकसत्तात सहज म्हणून दिलेला लेख प्रकाशित झाला व मी हातात लेखणी घेतली. ब-याच मोठमोठ्याच्या मुलाखती घेतल्या व कथा लिहल्या. साहित्य मंथन परिवारात दाखल होऊन लिखाणकाम व साहित्याचे पदर शिकतेच आहे. आता संध्याकाळ हळूङळू सरकत येत आहे. पण गांवाची छोटी शाळा विसरु शकत नाही. आतासारखी चढाओढ नव्हती,शिक्षण महाग नव्हते,आम्हा मुलांच्या मनात अतिरेकी विचार नव्हते. सुंदर बालबोध वातावरण होते. फुलपाखरां रंगीवेरंगी मन होतं.मैत्रीणीचं गीत होतं,मला शिकायचयं हा ध्यास मात्र मी माझा पुरविला कोणाच्याही प्रोत्साहनाशिवाय,प्रेमाशिवाय! अजूनही नवं शिकण्याचा उत्साह आहे. त्याचे पडघम माझ्या मनांत वाजत असतात. साहित्यमंथनला धन्यवाद माझ्या मनातले लिहण्याची संधी दिल्याबद्दल!!
प्रेषक – कुंदा पित्रे- दादर,मुंबई ९३२४७४२७०६

♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
आई मला शाळेत जायचय .....
           काहीवर्षांपूर्वी म्हणजे २०१३ ला ...माझी बँकेतून सेवानिवृत्ती झाल्यावर मला महाराष्ट्रातील धुळे झील्ल्यात शहादा येथे एक खेडेगावातल्या शाळेला भेट देण्याचा योग आला .मझी नणंद तिथे गेली ३५ वर्ष सातत्याने काम क रते आहे .पुरवी तिचे पती व ती एक शाळा चालवत आणि त्यांचा स्वतःचा मुलगा पrimary पर्यंत त्याच शळेत शिकला..नंतर मुंबईला येवून उच्च शिक्षण घेवून सध्या सिंगापोर इथे phd करत आहे .असो
              ती शाळा पाहून मी थक्क झाले मुलांचे १० च्या संखेत गट पाडले होते व प्रतयेक गटाला एक
  शिक्षक! सर्व शिक्षक मुंबई अथवा कुठल्यातरी शहरातला ....त्यामुळे शिकवण्याला पण चांगला दर्जा !शिस्त तर एवढी की मुलांना कामं नेमून दिलेली असतात ....काहीजण झाडलोट तर काहीजण सुशोभीकरण ...म्हणजे दारापुढे अंगणातल्या फुलांची रांगोळी...पानांनी सजावट वगैरे....त्यामुळे मुलांची creativity दिसते...
                वर्ग सुरु झाल्यावर शिस्तीत नेमलेला monitor त्याचं काम करू लागे कांही मुल शळेत अनवाणी येत
आई मला शाळेत जायचं आहे एवढच पुष्कळ असतं त्यांच्यासाठी ...शिकवताना distraction अजिबात नाही कारण तयांना दुसरं काही distraction नसतच .शिक्षकांचं मात्र प्रचंड कौतुक वाटलं.अश्या मुलांना घडवणं हे अत्यंत चाल्लेन्गिंग काम वाटलं.
               आपण पहातो कि ह्यातलाच एखादा मुलगा पुढे जाऊन नांव काढतो.....जस माझ्या नणंदेचा मुलगा स्वतःला सिद्ध करतो आहे ....एवढंच नाही तर सिंगापोर हून आल्यावर तोही त्याच गावी योगदान देणार आहे
               आपल्यला सर्व सुलभ मिळूशत असतांना अशाप्रकारे त्याग करणार्यांना माझा salaam
🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
नयना कुलकर्णी.....१५
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
 आई मला शाळेत जायच आहे!
हा विषय वाचला आणि माझ बालपण डोळ्यापुढे आल.
माझा जन्म मुंबईचा.लहान कुटुंब. दोन भाऊ ,मी एकटी आई ,वडिलांची लाडाची लेक. माझ्यांत आणि माझ्यांत अवघ दिड वर्षांचे अंतर. दोघांनाही एका वर्गांत बसविले. मी बडबडी, धिटुकलीम्हणुन सर्वांची लाडकी. वर्गांत सर्वांनपेक्षा लहान,म्हणुन शाळा सुटल्यावर ,सर मला खांद्यावर बसवुन घरी सोडायचे. अशी १,२ री घराजवळ शाळा होती ती संपली . मग किंगजाॅर्ज सारख्या मोठ्या शाळेत जायला लागलो. बाई कडक होत्या. शिक्षा म्हणुन डस्टर फेकुन मारायच्या. पण त्या पण माझ्या हुषारीवर, धीटाईवर खुष होऊन ,मला माॅनेटर केले .नाचांत, नाटकांत घ्यायच्या. भाऊ माझा पाठीराखा होता.दिड वर्षांनीच मोठा पण काळजी घ्यायचा. घरी भांडायचा,दादागिरी करायचा पण वर्गांत पाठराखण करायचा. सगळ्या बाईंची लाडकी होते.
पाचवी पासुन मुला-मुलींची शाळा वेगळी झाली तेव्हां भाऊची ऊणिव जाणवायची. शाळेत शिस्त ,पद्धत,पाढे मराठीच्या कविता खुप सुंदर शिकवायच्या . त्या चालीवर अख्खा वर्ग म्हणायचा. त्यामुळे कवितांची गोडी लागली. शाळेला मोठ्ठे पटांगण. त्यात लंगडी, हुतुतु,डाॅजबाॅल,लेझीम सर्व खेळ शिकलो. गॅदरिंगला नाच, नाटुकली केली त्यामुळे धीटपणा आला. वक्रुत्व स्पर्धेत भाग घेतल्यांने कसे बोलावे हे बाईंनी शिकविले. तिसरी ते अकरावी एका बाकावर कांचन होती त्यामुळे अजुनही घट्ट मैत्री राहिली आहे.फक्त गाण्याचा गळाभेट नसल्याने गाण््याच्या तासाला बाई बडबड केली कि ,शिक्षा करायच्या. पण तितकेच प्रेमही करायच्या.
अशी माझी शाळा सुंदर, बाई, मैत्रिणी खुप शिकवुन गेल्या. तीला कधीच विसरणार नाही. पुढला जन्म असलाच तर परत ह्याच शाळेत मला जायचंय !
सौ. निलाक्षी विद्वांस ६८
स्पर्धेसाठी .
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
  ♢♢♢♢संकलन समाप्त ♢♢♢♢


शुक्रवार, १३ मे, २०१६

शेजारी फुलांची

वेदनेच्या पोटात माझी
कविता जेव्हा जन्म घेत.!
फुटले पंख जेव्हा उराशी
चांदण रात्र स्वार होते.!!

कोवळे काळीज चिंब वेडे
शब्दांच्या गर्तेत गुंफून झाले.!
हळूच फुंकर पडली जेव्हा
अंकुरित शब्द वेली चढले.!!

भोपळा देहाचा पोघर
मनोवृत्ति मनात खुळखुळे.!
भार सोसवेना बियांचा
कशे विणून झाले जाळे.!!

सुगंधी सेज फुलांची
अंथरून वा-याने ओढले.!
नशीबवान झाले दिशा
हीन
नवीनच जीवनमान घडले.!!












♧♧♧ संकलन प्रारंभ ♧♧♧

 🌾🌾🌾🌾🌺🌺🌾🌾🌾

साहित्यमंथन आयोजित "काव्यमंथन " -भाग -36

सुधाकरी काव्यरचना (अभंग )

विषय :- 🙏 भक्ती 🙏

परीक्षक :- प्रा .सौ .संगीताताई भालसिंग

संकलन :-श्री .गजानन पवार
ग्राफिक्स :- क्रांती बुद्धेवार
               उत्कर्ष देवणीकर
🌾🌾🌾🌾🌾🌾🌺🌺🌾🌾🌾🌾

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 भक्तीचा मळा फुलला !
माझ्या अंगणी भक्तीचा मळा फुलला !
तुका म्हणे, चराचरांत विठ्ठल सापडला ,
माणसांत ,पशुपक्ष्यांत, झाडाझुडपांत,विठ्ठल दिसला,विठ्ठल सापडला!
रामदास म्हणे,आधी प्रपंच करावा नेटका ,मग तुम्हां सापडेल देव एकटा !
नाठाळाच्या माथी हाणावी काठी,
तर भुकेल्यास द्यावी पोळी !
ज्ञानोबा म्हणे , मी मागतो पसायदान ,
सर्व विश्वची माझे घर , सर्वांसी लाभो,जो जे मागिल ,
अन् मग मिळेल शांती मानवास !
अश्या तीन योगाने,मिळते शांती ,
कर्मयोग,भक्तियोग आणि ज्ञानयोग ,
जो मार्ग ज्यास जमेल तो त्यांनी स्विकारावा ,
अन् प्रुथ्वीवर गवसेल स्वर्ग ,प्रत्येकाला !
सौ. निलाक्षी विद्वांस .६८

विठ्ठल

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
स्पर्धेसाठी

*माय* *माऊली*

तूच माझा देव
तूच *भक्ती* माय
मोठी शक्ती काय
तुझहूनी

शोधू मी कशाला
देव मंदिरात
माय तू घरात
देवरुप

भरवला घास
मज तो प्रसाद
चाखी जीभ स्वाद
अमृताचा

तुझा हात डोई
माझी साऊली तू
विठू माऊली तू
मजसाठी

नको मोक्ष माय
घे पुन्हा ऊदरी
तुझा वारकरी
सदैव मी

- *आत्तम* *गेंदे* (परभणी)
९९२१०५८४१४

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
चारोळी स्पर्धा
🌹 भक्ती 🌹

या जगतामध्ये
काही न शाश्वत
म्हणून हो नत
           प्रभूपायी ॥
चतुर्गतीमध्ये
जन्म नि मरण
कर्माने भ्रमण
            होत असे ॥
म्यान तलवार
तसा देह भिन्न
कर्मच कारण
           बंधास या ॥
तारीतसे भक्ता
भगवंत भक्ती
हीच सोपी युक्ती
            जीवनात ॥
म्हणून हे जीवा
अपुले जीवन
धर्मकामी आण
            हेचि सुख ॥
त्याकरता हवी
देवावर भक्ती
तयानेच मुक्ती
           मिळतसे ॥
             डॉ.शरयू शहा.
👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 🎯 काव्यमंथन 🎯

भाग -36

विषय - 🙏 भक्ती 🙏

( स्पर्धेसाठी नाही )

गुरू माझा ज्ञानी
भक्ती भाव मनी
ठेवितो चरणी
मस्तक हे ॥1॥

मज नाही दुजे
दैवत हो देखा
माय बाप सखा
गुरू एक ॥ 2॥

मार्गशिर्ष मासी
शुद्ध एकादशी
पावन दिवशी
दिला मंत्र ॥ 3॥

यशवंत मंत्री
जरी अधिकारी
परमार्थी भारी
गोडी असे ॥4॥

औदुंबर क्षेत्र
दत्ताचे ते धाम
गुरूंचे ते नाम
मुखी सदा ॥5॥

जिल्हाधिकारी हे
पद भूषविले
सदा आचरीले
साधे फार ॥6॥

रूग्ण हाच देव
करा त्यांची सेवा
कर्मावर ठेवा
विश्वास हो ॥7॥

सदा सत्य बोला
बोला तैसे चाला
ओळखा देवाला
माणसात ॥8 ॥

साधीच राहाणी
विचार सरणी
कथनी करनी
एकच हो ॥9 ॥

गुरू यशवंत
माझे हो सासरे
माय बाप खरे
भाग्य माझे ॥10॥

अर्पितो दयाळा
काव्य एकादशी
गुरू चरणाशी
सुधाकरी ॥1॥

@ अरविंद कुलकर्णी

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
जोड सुधाकरी

स्पर्धेसाठी

देवा तुझ्यावर
भक्ति रे अपार
नेई भवपार
मजसि तू

पूजन अर्चन
मंत्रपाठ ध्यान
जप अनुष्ठान
सर्वकाही

दानधर्म सारे
नाही उणे काही
येई लवलाही
दे दर्शन

अथांग मन हे
मुळी ना आकळे
दाबता त्या बळे
उसळे ते

संकल्प विकल्प
स्वभाव मनाचे
ध्यान हेच त्याचे
औषध हो


सुनीता सुरेश महाबळ

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
सुधारित
👇


काव्य स्पर्धा अभंग सुधाकरी
🌹🍀(भक्ती)🍀🌹
नाथाचिया द्वारी
स्वागत भक्तांचे
तेथे इतरांचे    
काम काय,? //१//
साधकांना येथे
सापडेल मार्ग
अवघड दुर्ग
चढावया .//२//
गोरक्षनाथाने
सिध्द केले मंञ
सोपे केले तंत्र
उपासका .//३//
नाथ पंथा मध्ये
गुरू असे सिध्द
साधका प्रबुध्द
करावया //४//
जोडीने ते नाथ
हालविती जग
कोणताही मग
प्रश्न असो //५//
भक्ती आणि शक्ती
बांधोनिया मेळ
करीती सकळ
कल्याणही //६//
सर्वा साठी योग्य
असे नाथ पंथ
जशी नदी संथ
जनांसाठी //७//


@७७ सुनिल बेंडे

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
सुधाकरी स्पर्धा
     भक्ती

श्रध्दा भाव भक्ती
असावा मनात
सारे अशाश्वत
जगती या

सत्य हेची जाण
एक तो ईश्वर
बाकी सारे नश्वर
जगती या

माता पिता गुरु
दैवते ही तीन
 ठेवा त्यांचा मान
जगती या

मातृपितृ देवो
घराचे संस्कार
 करावा तयांना
नमस्कार

घरात असावे
गुरु अधिष्ठान
तयांना वंदन
सदा असो

अतिथींचा मान
 नित्य तो करावा
कधी न करावा
अपमान

परमेश्वराला
नित्य आठवावे
दृढ भक्तीभावे
नामजप
प्राची देशपांडे
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 दाखवूनी लोका
होत नसे भक्ती
त्यास नसे सक्ती
देवळाची

मानतो मी देव
तोची एक आहे
नाही जात पाहे
आणी धर्म

सारे असे एक
नाही जाती भेद
घाली जोही साद
जाणा भक्ती

होतात बलाढ्या
पैसा कमवूनी
भक्ती तोलवूनी
पैशामध्ये

कशाला हवेत
संस्था अन् शाळा
नावाने देवळा
भक्ती नव्हे

आहे जर भक्ती
शीकवा गरीबा
कशासाठी बाबा
डोनेशन

अन्नदान करा
गरजवंतास
घासातला घास
देवूनीया

हीच खरी भक्ती
जाणावी सर्वानी
देव आहे मनी
भुकेल्यांच्या

   @ उत्कर्ष देवणीकर

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
काव्यस्पधा
जोड सुधाकरी
विषय :भक्ती
ऊभा विटेवरी
विठू सख्याहरी
अमृत वल्हरी
वारकरी //
     भक्तीचा ग मळा
      आळवीती गळा
       आनंदी सावळा
        पायी वाळा//
 
करावे कीतॅन
आनंदी राहून
साथॅकी जीवन
भक्तजन//
     आषाढी कातिॅकी
     भक्त एकवटी
      दिंडीचा ग थाट
      वाळवंटी//
फेकूनिया वीट
चंद्रभागे तटी
पुंडलिका भेटी
मायेपोटी//
        रोज भेटतोस
        प्रेमाने भक्तास
        कटेवरी हस्त
          ठेवतोस//
देई आशिॅवाॅद
होई भक्ता मोद
नसे मनी भेद
दे आनंद//
सुलभा कुलकणी30

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
सुधाकरी स्पर्धा
     भक्ती

श्रध्दा भाव भक्ती
असावी मनात
सारे अशाश्वत
जगती या

सत्य हेची जाण
एक तो ईश्वर
बाकी सारे नश्वर
जगती या

माता पिता गुरु
दैवते ही तीन
 ठेवा त्यांचा मान
जगती या

मातृपितृ देवो
घराचे संस्कार
 करा नमस्कार
दोघांनाही


घरात असावे
गुरु अधिष्ठान
तयांना वंदन
सदा असो

अतिथींचा मान
 नित्य तो करावा
कधी न करावा
अपमान

परमेश्वराला
नित्य आठवावे
दृढ भक्तीभावे
नामजप
प्राची देशपांडे

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
जोड सुधाकरी

भक्तीचा सुगंध
चहुकडे जाई
सावळी विठाई
पंढरीत

चंद्रभागातीरी
विठाई माऊली
भक्तांची सावली
पांडुरंग

पुंडलीकासाठी
परब्रह्म आले
उभेची राहिले
पांडुरंग

वैजयंती माळा
रुळतात गळा
विठ्ठल सावळा
वैष्णवांचा
 प्राची देशपांडे
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
जोड सुधाकरी

भक्तीचा सुगंध
चहुकडे जाई
सावळी विठाई
पंढरीत

चंद्रभागातीरी
विठाई माऊली
भक्तांची सावली
पांडुरंग

पुंडलीकासाठी
परब्रह्म आले
उभेची राहिले
पांडुरंग

वैजयंती माळा
रुळतात गळा
विठ्ठल सावळा
वैष्णवांचा

विठ्ठल विठ्ठल
नामजप चाले
चालती पाऊले
वारकरी

जाता पंढरीस
दर्शन करावे
 डोळा साठवावे
विठूराय
प्राची देशपांडे

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
सुधाकरी स्पर्धा
     भक्ती

श्रध्दा भाव भक्ती
असावी मनात
सारे अशाश्वत
जगती या

सत्य हेची जाण
एक तो ईश्वर
जग हे नश्वर
जाण जीवा

माता पिता गुरु
दैवते ही तीन
 ठेवा त्यांचा मान
जगती या

मातृपितृ देवो
घराचे संस्कार
 करा नमस्कार
दोघांनाही


घरात असावे
गुरु अधिष्ठान
तयांना वंदन
सदा असो

अतिथींचा मान
 नित्य तो करावा
कधी न करावा
अपमान

परमेश्वराला
नित्य आठवावे
दृढ भक्तीभावे
नामजप
प्राची देशपांडे

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
स्पर्धेसाठी

जोड सुधाकरी

विषय: भक्ति



जगी नाही नाते
सारखे आईच्या
कल्याणा बाळाच्या
झटतसे...१...

आई खरे नाते
बाकी सारी नाती
स्वार्थाच्यापुरती
जाणा तुम्ही ...२..,

आई असे पहा
आकाशाचे तत्व
ईशाचे ईशत्व
तिच्याठायी....३...

आईबालकाचे
नाते वात्सल्याचे
नाव हो स्वार्थाचे
त्यात नाही ....४..


अशा या मातेला
गुरुच मानूया
वंदन करुया
भक्तिभावे ......५...


सुनीता सुरेश महाबळ

सदर जोडसुधाकरी स्पर्धेसाठी
ग्राह्य धरावी, ही विनंती

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
: ¤¤सुधाकरी¤¤
भक्तिने फुलावा
जीवनात मळा
झिजवावा गळा
        नामामध्ये॥१॥
भक्तीने देवाचे
चिंतन करावे
व्यर्थ न वदावे
        नारायण॥२॥
भक्तिचा हा मार्ग
सुलभ सुखर
पर्वता प्रखर
       पाप जाळी॥३॥
भक्तीचा आनंद
वाढवेल सुख
दुर जाई दुःख
      क्षणमात्रे॥४॥
भक्तीचे सागरी
उणे नसे काही
श्रीहरी तो पाही
         कृपादृष्टी॥५॥
भक्तीचे ते वर्म
कळो येई जेव्हा
गोड लागे तेव्हा
        नाममुखा॥६॥
भक्तीचे सुंदर
करावे वर्णन
शब्दी शब्द लिन
         दिसू लागे॥७॥
भक्तिचा भुकेला
सखा पांडुरंग
गायन अभंग
       अंतरंगी॥८॥
भक्ती मार्ग सोपा
नाम घेता मुखी
पायापासी राखी
          अर्जुनाला॥९॥
भक्तीमय जीव
भगवंत पाही
वावगे न काही
        तिळमात्र॥१०॥
भक्ती भाव शुद्ध
करतो विनंती
गुरूचे सांगाती
     लाभ झाला॥११॥
भक्तीने आकळे
रख्खुमाई पति
शुद्ध भावे चिति
         स्मरणात॥१२॥
भक्ती भगवंत
भाग्ये वीना नाही
डोळा लव लाही
         पहा सुख॥१३॥
भक्तीचे प्रकार
मनोमनी पडे
भोळीच आवडे
      देवाजीला॥१४॥
भक्ती मुक्ती दोन
देवाजीचे अंग
नको व्यर्थ संग
        घडो मज॥१५॥
भक्ती लोटांगण
पुजा मनोभावे
प्रेमाने वदावे
       जीवलगा॥१६॥
भक्तीचा डांगोरा
पिटताती जण
कोरडे पाषाण
        देवापाशी॥१७॥
भक्तीने पुजावा
माझा श्री विठोबा
नका मारू बोंबा
            मुर्खापरी॥१८॥
भक्तीचा सागर
ज्ञानाचे भांडार
उघडते द्वार
        देवाघरी॥१९॥
भक्ती मध्ये राजा
मनोबा प्रधान
नामाने बांधून
         ठेवा तया॥२०॥
भक्तीने इंद्रिय
एक रुप होई
राग दोष जाई
         दुर देशी॥२१॥
भक्तीची आवड
लागताची गोडी
नाम नाम होडी
          पैलतीरी॥२२॥
भक्ती करताना
संसाराचा गाडा
राजे राजवाडा
          भगवंती॥२३॥
भक्तीचा विचार
पांडवांनी केला
कौरवांचा झाला
          नायनाट॥२४॥
भक्तीने गुरूशी
जाईन शरण
करती हरण
          पापमुक्त॥२५॥
✍🏻__ गजानन पवार @81
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
स्पर्धेसाठी


देव माझा कसा
भक्तिस भुलला
आनंदात रंगला
विठुराया
विसरला देव
कालचक्र गती
स्थिरावली मती
भक्तिमधे
दिंड्या पताकांचा
चालला सोहळा
मनाचा मोहळा
अर्पियेला
चित्त तुझ्या पाई
विसरलो धरा
चैतन्याचा वारा
नामघोषी
पंचप्राण माझे
व्याकुळ ते झाले
डोळे ओथंबले
भक्तिरसे.
.
.
शब्द भ्रमर

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
+91 99216 19277‬:
आनंदात रंगला
ऐवजी
आनंदे रंगला
असे वाचावे
😂😂😂

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
+91 82759 48708‬:
🌺 संसार 🌺

    सुखी संसाराचे
     चित्र रेखिते
    झोळीमध्ये पदराच्या
     बाळा निजविते
🌿🌿🌿🌿🌿🌿

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
बळीराजा तुझे
दैवत विठ्ठल
प्राक्तना बद्दल
चिंता नसे
वारकरी भक्ती
पंढरीच धाम
मुखी हरीनाम
सदोदीत
माथी तुळसाई
चाल अनवाणी
मुखी गोड गाणी
अभंगाची
आषाढी कार्तिकी
देवाची वाटुली
गर्दीत दाटली
अहोरात्र
चरणी माथा
टेकवूनी तृप्त
संकटेच लुप्त
क्षणार्धात..............जयश्री पाटील.

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
पंढरपुरी ग
जाते मी माहेरी
चन्द्रभागा तीरी
भेटीगाठी।

विठ्ठलाची मूर्ति
साठवीण डोळा
अजोड़ सोहळा
आषाढीचा।

भक्तगण येती
वाळवंटी फार
भक्ति गहीवर
आवरे ना।

संसारी दुःखा ने
गेले बा मोडून
हात मी जोडून
विनविते।

   प्रा सौ शांता ठुबे
(अभंग ---स्पर्धेतील सहभागा साठी)

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
साहीत्य मंथन
खासा घडविला
आदर्श काकाला
दंडवत
एकजूट आणि
तडजोड दिसे
सदस्यच भासे
कुटूंबाचे
नाताळाचे दिनी
भरतसे मेळा
जणू गोतावळा
जिवलग
साहित्याचे लोणी
नवरंग दारी
घेवून भरारी
रेडिओची
सुविचारी भक्ती
कर्तव्य पालन
पुण्याचे दालन
शोभतसे.....आपल्यासाठी🍁

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 🙏 भक्ती 🙏

साहित्यमंथन
आळंदी पंढरी
आम्ही वारकरी
साहित्याचे ॥ 1॥

हीच खरी भक्ती
जपतो अंतरी
साहित्याचे रंगी
रंगलो हो ॥2॥

साहित्यमंथनी
ठेवा प्रेम भाव
एकमेका जीव
प्रेम ठेवा ॥3॥

प्रेम भाव भक्ती
एकीचे हे बळ
कौतूक सकळ
पाहतील ॥4॥
@ अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
🔸सुधाकरी🔸

भक्तीचा महिमा
काय त्याचा थाट
पंढरीची वाट
पांडूरंगा ॥1॥
सारे संत जन
जमूनी एकत्र
जागर सर्वत्र
भक्तीरसा ॥2॥
देवाचिये दारी
नाही भेदा भेद
कसलाही खेद
सकलांचा ॥3॥
हरी नाम गोडी
वाटते अविट
व्हावी तुझी भेट
जगदीशा ॥4॥
संत समागम
मिळूनी करावे
जगा उध्दारावे
उपदेशा॥5॥
सौ. अनुजा देशमुख @65

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
वाळवंटी उभा
सावळा विठ्ठल
वाट पाहतसे
रखुमाई.

तुळशिच्या माळा
गळा घालुनिया
कर कमरेला
तो ठेवोनी.

राजा पंढरीचा
उभा राहोनिया
लाडक्या भक्तांची
वाट पाही.

भीमा इंद्रायणी
भावनांची नदी
आली मिळोनिया
संगमाशी.

आसावली सारी
सारी विसावली
वाटे मिळाली ही
विठुमाई.

डोळे भरुनिया
पाहे भिमेवरी
दर्शनाची आता
झाली घाई.

ध्वज गगनाशी
डौलाने डोलती
टाळ हातामधे
निनादती.

डॉ.सुधीर अनंत काटे.निगडी,पुणे
१३/५/२०१६

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
अभंग स्पर्धा

       @ सुधाकरी @

देवाच्या दारात
भक्तीचा सुगंध
गातो मी अभंग
          विठ्ठलाचे ।। 1।।

चंद्रभागे तीरी
भक्तांची पंढरी
जगाशी उध्दरी
          पांडुरंग ।। 2।।

भक्तीचा महिमा
वर्णू आता किती
टाळ वीणा हाती
        घेऊनीया ।। 3।।

दर्शनाची ओढ
मनाला लागली
चंद्रभागा आली
       पायापाशी ।।4।।

कृपा पांडुरंगे
उध्दरी जीवन
सांगतो रतन
         पदोपदी ।।5।।

    रत्नाकर जोशी@007
             जिंतूर

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
सुधाकरी

भक्तीचा हा मळा
फुले वाळवंटी
होत असे दाटी
भाविकांची


भक्तीरसाचा हा
पूर दाटतसे
मन हे विसावे
तीरावरी


चंद्रभागा वाहे
घेऊनी भक्तीची
घागर श्रध्देची
खांद्यावरी


अंतरंगी विठू
मनी लागे साठू
देह लागे वाटू
दुरावला


लाचावले मन
विठ्ठल दर्शनी
विरह हा झणी
संपवावा


देखिले वदन
मी विठूरायाचे
ऋण जीवनाचे
फिटतसे

 फिटले हे पांग
विठ्ठल दर्शनी
आनंद जीवनी
मावेनासे

भक्ती असे सार
मानव जीवनी
मुक्ती पापातूनी
करुनिया

-संगीता देशमुख,वसमत @59

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
विषय भक्ती
जोड सुधाकरी

महालक्ष्मे नम:
भक्ती हीच शक्ती
करा फक्त भक्ती
देव तोच ।।

जो शिकवी काही
आई आद्य गुरू
माना सर्व गुरू
देव तोच ।।

करा ज्याची भक्ती
सर्वस्व अर्पुनी
सर्व विसरुनी
देव तोच ।।

सेवा असे भक्ती
गरीब हि असो
वा गरजू असो
देव तेथे ।।

मनातुन करा
कर्म पूजा जाणा
भक्ती तीच माना
दैव तेच ।।


शिकवली मज
सुधाकरी आज
लेविला हा साज
सुपर्वाचा।।


SP@24
स्पर्धेसाठी

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 🌺साहित्य मंथन 🌺
सुधाकरी
🌹🌹🌹🌹🌹
साहित्य मंथन
जीवन घडले
भाग्य उजळले
          नवरंगी॥१॥
साहित्य मंथन
नित्याचाच ध्यास
साहित्यिक खास
            जीवलग॥२॥
साहित्य मंथन
सोडतो शिदोरी
शब्दाचे पदरी
            धरोहर॥३॥
साहित्य मंथन
आमचे माहेर
ते पंढरपूर
      आम्हा लागी॥४॥
साहित्य मंथन
शिदोरी अवीट
दिवस पहाट
           शब्दरत्न॥५॥
साहित्य मंथन
दुजाभाव नाही
एकमेका पाही
           समरूप॥६॥
साहित्य मंथन
एक इतिहास
पडला प्रकाश
         जगामाजी॥७॥
साहित्य मंथन
नावा मध्ये गोडी
सर्वांना आवडी
        म्हणोनिया॥८॥
साहित्य मंथन
एक अवलिया
गुरुमाऊली या
            अरविंद॥९॥
साहित्य मंथन
प्रेमाचा आरसा
जैसा घ्यावा तैसा
               मनावरी॥१०॥
साहित्य मंथन
अलौकिक नाव
नगर ते गाव
          सखे वाटे॥११॥
साहित्य मंथन
जपे माणवता
शेतकऱ्या त्राता
          दुष्काळात॥१२॥
साहित्य मंथन
स्नेह वाढेल
अनाथा पुजेल
             प्रेमभाव॥१३॥
साहित्य मंथन
एक परिवार
दुसरा विचार
           नाही येथे॥१४॥
साहित्य मंथन
गोडवा मायेचा
ओलावा दुधाचा
            बालकासी॥१५॥
साहित्य मंथन
विशाल सागर
शब्द नौका पार
              यत्नपुर्ण॥१६॥
साहित्य मंथन
नवोदित काया
शब्दांमधे माया
                दृष्टीपडे॥१७॥
साहित्य मंथन
रेडियो गाजले
रंग ते भरले
              एफ एम॥१८॥
साहित्य मंथन
आगळीक वाटे
प्रेमभाव दाटे
              नयनात॥१९॥
साहित्य मंथनी
थोर महा थोर
दिग्गज अपार
             भेटी लागे॥२०॥
साहित्य मंथन
आम्हास आसरा
देवजी कैवारा
           जीवापाड॥२१॥
✍गजानन पवार @81
(स्पर्धेसाठी नाही )
☯☯☯☯☯☯☯

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 सुधाकरी अभंग ६,६,६,४शब्द

भक्तित दंगले
नामात रंगले
डोळे पाणावले
नकळत!

काया आसुसली,
एकरूप झाली,
मूर्त मी पाहिली,
दिव्यतेची!

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 प्रेषक स्वाती केळकर ,दादर मुंबई १४ ९८७०२५२९५१

भक्तित दंगले ,
नामात रंगले,
डोळे पाणावले,
   नकळत!
काया आसुसली,
एकरूप झाली,
मूर्त मी पाहिली,
   दिव्यतेची!
काय मी वर्णावा,
अपूर्व सोहळा,
श्रीरंग सावळा,
   विटेवरी!
काही नको आता,
तुजसी मागणे
सन्निध राहणे,
   तुझ्यापाशी!
धन्य आज दिन,
जिवा शिवातले,
मिलन पाहिले,
  देवतांनी!

********************"*****""

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
साहित्यमंथन
देतसे प्रेरणा
करीते शहाणा
अडाण्याशी

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 साहित्य मंथन--स्पर्धा--
     सुधाकरी -- अभंग
           भक्ति

भक्ति स्वामी प्रेम
समर्थ नेटका
आहे मी फाटका
गरीबच !
भक्तिचा उमाळा
येतसे तरंग
मानसी आभंग
बोलतसे!
भक्तांना दाखवी
पाठीशी राहून
वात्सल्य देऊन
मार्ग दावी!
भक्तिला किनार
सुखाची चाहुल
प्रत्यया येईल
नियमित!
भक्ति माळितसे
माझ्या ह्रदयात
तल्लीन जपात
होऊनिया!
भक्तित स्वामीत
दंगले गुंगले
श्रेयची निमाले
निर्हेतुक!
भक्तित स्वामींच्या
दाविला सोहळा
स्वामी लागी गळा
प्रचितिने!
भक्ति भाव ठायी
देही वसे स्वामी
मनी निजधामी
पुज्य स्वामी !!🌹
🙏🙏🙏🙏
प्रेषक=
कुंदा पित्रे (17)
मुंबई
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
देवूनी प्रेरणा
अलभ्यासी लभ्य
करीतसे साध्य
अरविंद 🙏🏻(मा. अरविंद काका )
♧♧♧♢♧♧♧♧♧♧♧♧♧
विठ्ठलचरणी
 ठेवियला माथा
तुम्ही कृपावंता
 पांडुरंगा

तुम्ही मायबाप
मी तुमची लेक
मारते मी हाक
 निशिदिन

कामना मनाची
 करावी ती पुरी
पंढरीची वारी
घडवावी

लागली मनासी
आस दर्शनाची
सावळ्या विठूची
भक्तीप्रेमे

निघाले माहेरी
माहेर पंढरी
वाट दावा हरी
चालताना

धन्य झाले मन
जाहले दर्शन
हरपले भान
विठ्ठला रे !
 प्राची देशपांडे
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
♧♧♧ संकलन समाप्त ♧♧♧





बुधवार, ११ मे, २०१६

👁 👁 👃🏻 👄 निघता नाव माहेरचे मज आठवण पंढरपूरची होते..! माती तापलेल्या ढेकळामंधी माय विठ्ठल रख्खुमाई दिसते..!! ✍🏻___ गजानन पवार @81 🚜🚜🚜🚜🚜🚜🚜 🌺🌺 शुभ सकाळ🌺🌺


॥ योग विठ्ठल ॥
विठू तुझ्या भेटीचा
योग मला लाभू दे॥धृ॥
जन्मोजन्मीचे कर्ज तुझे
व्याज मुक्त होऊ दे ॥१॥
दर्शनाने तुझ्या देवा
पापे सर्व जळती ॥
विश्वाचे वहातो ओझे
दुःख नष्ट होऊ दे॥२॥
नामाचा महिम महान
मुखी हरीनाम घडू दे॥
रुप सावळे सगुण
स्वप्नी रोज दिसू दे॥३॥
कीती कीती गोड रुप
डोळ्या समोर राहु दे॥
चिंतने भरू दे आत्मा
स्वरूपी रूपा न्हाऊ दे॥४॥











मंगळवार, १० मे, २०१६

 साहित्य दर्पण आणि sps @fun यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
-----------+--+-+++++++++
चित्र शलाका
भाग 2
==================
संकल्पना :--
सौ सुरेखा जाधव
आप्पासाहेब सुरवसे
**********************
संयोजक :--
प्रा .संगीता भालसिंग
श्री .ना सा येवतीकर
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आणि
परीक्षक
सौ .पूजा विलास दंडगव्हाळ
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||
ग्राफिक्स
मारुती खुडे सर ,माहुर
~~~~~~~~~~~~~~~

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🌞साहित्य दर्पण आणि SPS @Fun यांच्या संयुक्त विद्यमाने 🌞

                    द्वारा आयोजित
💥चित्रशलाका 💥

🎲🎲 भाग -2 रा 🎲🎲
===================

खुर्चीवर बसली माझी
लाडाची एकुलती एक लेक
मोडू-टोचु नये दगड काटाकुटा
म्हणून तिला घालते बूट एक एक
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री .आप्पासाहेब सुरवसे
         लाखणगांवकर
AMKSLWOMIAW
🌹🖊 AK 47 🖋🌹
👉🏾👉🏾स्पर्धेसाठी👈🏾👈🏾
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🌞साहित्य दर्पण आणि SPS @Fun यांच्या संयुक्त विद्यमाने 🌞

                    द्वारा आयोजित
💥चित्रशलाका 💥

🎲🎲 भाग -2 रा 🎲🎲
===================

खुर्चीवर बसली माझी
लाडाची एकुलती एक लेक
टोचू-मोडू नये दगड काटाकुटा
म्हणून तिला घालते बूट एक एक
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री .आप्पासाहेब सुरवसे
         लाखणगांवकर
AMKSLWOMIAW
🌹🖊 AK 47 🖋🌹
👉🏾👉🏾स्पर्धेसाठी👈🏾👈🏾
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🌞साहित्य दर्पण आणि SPS @Fun यांच्या संयुक्त विद्यमाने 🌞

                    द्वारा आयोजित
💥चित्रशलाका 💥

🎲🎲 भाग -2 रा 🎲🎲
===================

खुर्चीवर बसली माझी
लाडाची एकुलती एक लेक
टोचू-मोडू नये खडा काटाकुटा
म्हणून तिला घालते बूट एक एक
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री .आप्पासाहेब सुरवसे
         लाखणगांवकर
AMKSLWOMIAW
🌹🖊 AK 47 🖋🌹
👉🏾👉🏾स्पर्धेसाठी👈🏾👈🏾
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
वाचविण्या काट्यांपासुन दुःखाच्या
करते तुज तयार ।
भविष्याच्या या वाटेवर चालण्या
तुझाच मज आधार ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
चारोळी...
साहित्य दर्पण आयोजित...
चित्रशलाका स्पर्धेसाठी...
बाळासाठी प्रेमाचा,
सागर असते आई।।
तयारीसाठी लेकीच्या,
भान हरपून जाई।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050/9021261820

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
 चारोळी स्पर्धा.....

काटा पदकमली माझ्या रुतता
वेदनेचे दाह तव काळजात उटती
स्पर्ष दुखःचा मला होताच अाई
नयनी अश्रू का ग तुझ्या दाटती

           ........मारुती खुडे,माहुर

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
 🌹🍁स्पर्धेसाठी🍁🌹
आहे सुकोमल पावलांची
बहिण माझी छोटी
पादञाणे घालते प्रेमाने
असेन जरी मी मोठी
@२१ सुनिल बेंडे परभणी

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
काळजाचा टुकड़ा माझा
कोडकौतुके वाढविण
पण दुष्ट दुराचारी सोबत
लढण्या कणखरही बनविण!

प्रा सौ शांता ठुबे, अहमदनगर
         (स्पर्धेसाठी)19

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
 ☯☯☯☯☯☯
बाळा पायी रुतत्ता काटा
काळीज पिळले आईचं
इवली इवली कोमल काया
पायी वाहन घालते चांदिचं
_____ गजानन पवार @81
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🌞साहित्य दर्पणआणिSPS @Fun यांच्या संयुक्तविद्यमाने 🌞

   द्वारा आयोजित
💥चित्रशलाका 💥
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🎲🎲 भाग -2 रा 🎲🎲
==================
वेध भविष्याचे गं
तुझ्या पायी लागले....
बळ लढण्याचे गं
तुझ्या ठायी मी बांधले...
**********************************************कल्पना जगदाळे★@8बीड
====================================
👉🏾👉🏾स्पर्धेसाठी👈🏾👈🏾
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🌞साहित्य दर्पणआणिSPS @Fun यांच्या संयुक्तविद्यमाने 🌞

   द्वारा आयोजित
💥चित्रशलाका 💥
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🎲🎲 भाग -2 रा 🎲🎲
==================
वेध भविष्याचे गं
तुझ्या पायी लागले....
बळ लढण्याचे गं
तुझ्या ठायी मी बांधले...
********************************************** कल्पना जगदाळे@8बीड
====================================
👉🏾👉🏾स्पर्धेसाठी👈🏾👈🏾
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🌞साहित्य दर्पणआणिSPS @Fun यांच्या संयुक्तविद्यमाने 🌞

   द्वारा आयोजित
💥चित्रशलाका 💥
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🎲🎲 भाग -2 रा 🎲🎲
==================
वेध भविष्याचे गं
तुझ्या पायी लागले....
बळ लढण्याचे गं
तुझ्या ठायी मी बांधले...
*********************** कल्पना जगदाळे@8बीड
====================================
👉🏾👉🏾स्पर्धेसाठी👈🏾👈🏾
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
 *आई तू ऊन्हातली सावली* *आई तू पावसातली छत्रीरूपी* *माऊली*
*आई* *तू* *थंडीतली* *शाल*
*मग* *काय* *भिती* *यावे* *दुःख* *खुशाल*

*श्याम* *स्वामी*
*@* *13* *हिंगोली*

 ( *स्पर्धेसाठी*

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
नको होऊस ऊदास,अन् चेहरा हिरमुसलेला,आण पाय इकडे बूट देते घालुनी तुजला.
जाईल मग राणी माझी ऐटीत फिरायाला,सलाम करतील सारे माझ्या एलिझाबेथला!

 चित्रशलाका स्पर्धा २
स्वाती केळकर

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🌞साहित्य दर्पणआणिSPS @Fun यांच्या संयुक्तविद्यमाने 🌞

   द्वारा आयोजित
💥चित्रशलाका 💥
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🎲🎲 भाग -2 रा 🎲🎲
==================
लेक माझी गं लाडाची घेते काळजी पायाची माझ्या लाडक्या राणीला घाई खेळाया जायची                    
********************************************** ********* खेडकर सुभद्रा @बीड
======================

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
चित्रशलाका स्पर्धा भाग 2 रा होती कष्ट तव पाऊली अंतरी वेदना मजला लाडके घेण्या गगन भरारी तयार करिते तुजला सौ. मीना सानप बीड नं--7 मो.9423715865

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
असू दे मनात बंध
आकाश गवसण्याचा
तुझ्या पदकमलास सदा
असावा गंध मातीचा

*✍🏻 गणेश @5*

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
स्पर्धेसाठी चारोळी

जीवनाच्या वाटेवर काटे
लेकी पदोपदी रोज भेटे
आईचे काळीज आज तुटे
घाल पायात बुट बळ भेटे

© सौ.शशिकला बनकर

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
 स्पर्धेसाठी चारोळी

जीवनाच्या वाटेवर काटे
लेकी पदोपदी रोज भेटे
आईचे काळीज आज तुटे
घाल पायात बुट बळ भेटे

© सौ.शशिकला बनकर
@35

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
|| चित्रशलाका स्पर्धा ||  
***********************
   भाग 2 रा
 ********************** ==================
होती कष्ट तव पाऊली अंतरी वेदना मजला लाडके घेण्या गगन भरारी तयार करिते तुजला 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सौ. मीना सानप बीड
 नं--7  
मो.9423715865
====================================

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🌷चित्र शालका***स्पर्धा🌷
हाक मारीत कन्या आली,
बसली आसनावरी,
बूटसूट घालू लागली
नजर आईची तिच्या गालावरी

खेडकर मिरा****20

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
 || चित्रशलाका स्पर्धा ||  
***********************
   भाग 2 रा
 ********************** =================
होती कष्ट तव पाऊली
अंतरी वेदना मजला
लाडके घेण्या गगन भरारी
तयार करिते तुजला 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सौ. मीना सानप बीड
 नं--7  
मो.9423715865
====================================

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
 💐💐💐💐💐
तुझ्या कोमल पायांनी दुरवरचा टप्पा गाठायचा. वाटेत फुल असो वा काटे धीरानं पाउल टाकायचा.... शिरीष गिरी धारुर जि बीड.@58🌷🌷

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
 साहित्य दर्पण व sps@fun यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
    🍁 चित्रशलाका स्पर्धा 🍁
         भाग ---- 2 रा
 प्रेषक== कुंदा पित्रे (46)
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बैस गं सानुले या इथे क्षणभर!
चिमुकले जाऊ नको अनवाणी
ना माता छाया कळ दाटे उरभर
आहे गं ताई ढाळत डोळा पाणी!
कुंदा पित्रे
शिवाजी पार्क
मुंबई 28
9324742706
===
ता.क.- माझ्यापेक्षा दहा वर्षानी मोठी असलेल्या ,आता जगात नसलेल्या ताईसाठी ही चारोळी
अर्पण.💐🙏

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
 बाळाच्या जखमी पायाला पाहून
आई होते दुःखी कष्टी
प्रार्थना करीत असते
देवा मिळो पायाला पुष्टी
- नासा येवतीकर
       @26

👉🏾स्पर्धेसाठी👈🏾
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
स्पर्धेसाठी चारोळी

उमलत्या तुझ्या पंखांना
झेपावण्यासाठी उत्तुंग आभाळ देताना
माझ्या छकुलीला समजुन घेते नीट
घालुनी तिच्या पायात संरक्षणाचे बुट !

     ...संगीता भांडवले (१६)
      वाशी,उस्मानाबाद

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
 चित्रशलाका

"स्त्रीत्वाची वाट मोठी वळणाची,
पावलाना गरज कणखरतेची,
तरण्या वाट ही भवसागराची,
कर परिधान कवचे रक्षणाची."

-संगीता देशमुख,वसमत @१४
स्पर्धेसाठी

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
 ~~~~~~~~~~~~~~~~~
🍁साहित्य दर्पण आणि sps @Fun यांच्या संयुक्त विद्यमाने 🍁  
           🍁आयोजित🍁
   
       📝चित्रशलाका📝
               भाग___2
======================
          🙍 स्पर्धेसाठी🙎
======================
भेटतिल ग, राणी हजार धोंडे
जीवनाच्या वाटेवर चालतांना
  शिकवण माझी दिशा देईल तुझ्या या नाजुक पदकमलांना

====================== 😊सौ* मंजुषा देशमुख😊
             @40
            अमरावती
         ९४२२८८४१४०

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
स्पर्धेसाठी चारोळी
तुझ्या उमलत्या ओजस्वी पंखांना
समजुन घेऊन बळकटी देते नीट
झेपावण्यासाठी उत्तुंग आभाळ देताना
घालुनी तिच्या पायात संरक्षणाचे बुट !
     ...संगीता भांडवले (१६)
      वाशी, उस्मानाबाद

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
घेण्यास उंच भरारी
बळ मिळो तुजला
स्वप्न तुझे साकारण्या
जपून ठेव पदाला

*✍🏻गणेश @5*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
☆☆☆☆संकलन समाप्त☆☆☆☆

रविवार, ८ मे, २०१६


🌹मातृदिन विषेश चारोळी स्पर्धा 🌹

विषय :- 🌺माझी माय🌺

परीक्षक :- सुलभाताई कुलकर्णी 
संकल्पना :- अरविंदजी कुलकर्णी 
ग्राफिक्स :- क्रांती बुद्धेवर,उत्कर्षजी देवणीकर

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

रात्री 9 ते 11 

🌹आरोग्यमंथन 🌹

सत्र 2 रे रात्री 9 ते 11

सदस्यांच्या प्रश्नांना डाॅ जोत्सनाताई कुलकर्णी उत्तर देतील

कार्यक्रमाची सांगता
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 🍁🌺आई🌺🍁
देवा, जन्म असू दे कितीही
पर्वा नाही असतील जरी एकशे आठ
एकच विनंती करतो तव चरणी
आई हीच असावी एवढी माञ अट
@७७ सुनिल बेंडे परभणी
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 *साहित्य मंथन*

चारोळी स्पर्धा

विषय-माझी माय

माय माझी भागीरथी ,
तुळशीला पाणी घाली ...
पुण्य पावसाची सर ,
माझ्या अंगावर आली ...

*प्रा.सौ.संगिता भालसिंग*25
अहमदनगर
दि.०८में२०१६
स्पर्धेत सहभागी रचना

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
"मला थोडसं खरचटलं तरी
 विव्हळते तिकडे माझी माय
 कातडाचे जोडे केले तरी
 तिचे पांग फिटू शकत नाय"
.........जयश्री पाटील
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 🍁🌹माझी माय 🌹🍁 
माझी गुरू सखी मार्गदर्शक
माझी मायच माझे सर्वकाही एकमेव अद्वितीय देवच जणू सर्व प्रसंगात पाठीशी राही
       ०५ @ डॉ .शरयू शहा.

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 माझी माय !चारोळी स्पर्धा ! एक माय जन्म देते ,
ती मेल्यावर दुसरी माय वाढवते !
जरी ती सावत्र माय असते,
तरी दोघींची माया सारखीच असते !
सौ.निलाक्षी विद्वांस ६८

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
देवा तुझ्या नामा ची
माय ठेवून गेली ठेव
जिथे असेल माय माझी
तिला तिथें सुखी ठेव
डॉ शिल्पा जोशी
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
मी देव पाहिलाय
वर्णू त्यास मी काय?
जेथे दया,माया,छाया,
ती माझी माय🙏🌹🙏🌹🙏🌹
.................................................
नयना कुलकर्णी......15....स्पर्धे साठी

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 माझ्या मायेला ध्यास 
सदा लेकरांचा सुखाचा
 राहून ऊपाशी देते घास
वसा जन्मभराच्या कष्टाचा!

********************
स्पर्धेसाठी चारोळी

माझ्यावर सावली धरण्यासाठी
 माय माझी जन्मभर ऊन्हात
बोल आर्शीवादांचे लेकरांसाठी
पाहतो मी देवबाप्पाला तिच्यात।

अंजना कर्णिक(9)
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 🔴 माझी माय 🔴

देवाला प्रत्येक घरी जन्म 
घ्यायलाछान सापडला उपाय म्हणून त्याने निर्माण केली 
प्रत्येक घरात एक माय ।
@ अरविंद कुलकर्णी 
(स्पर्धेसाठी नाही )

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 देवाला अवतार घ्यायला 
छान सापडला उपाय ।
म्हणून त्याने निर्माण केली 
प्रत्येक घरी एक माय ।
@ अरविंद कुलकर्णी 
(सुधारीत ,स्पर्धेसाठी नाही )

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 माझी माय 

"दिला आकार माझ्या स्त्रीत्वाला 
 संसाराच्या खस्ता खाऊन
बाळकडू पाजले माझ्या मायने
संस्काराचं कोंदण लेऊन"
   संगीता देशमुख वसमत @59 साहित्यमंथन 
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
-'चारोळी स्पर्धा
विषय --- माझी माय 
प्रेषक-- कुंदा पित्रे (46)
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
1) माय अंतरंग क्षितिजापल्याड
     विदग्ध रक्त वाहे उभ्या जन्मात
     माझी माय पाठी उंब-याआड
     स्निग्ध समई ,तेवे देव्हा-यात
  🍁
2) लेकीला,माय शोधे आपल्यात
     लेकीचा पाय नव्या वाटेवर
     जोड गं नातीगोती संसारात
     माय सांगे, जा संचिताबरोबर
कुंदा पित्रे (46)
शिवाजी पार्क
मुंबई

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 🌹🌹 रत्नहार 🌹🌹

     @ आई व स्त्री @

आई म्हणून जगात
उत्तुंग किर्ती मिळवली.
स्त्री म्हणून नशिबी मात्र
कायम उपेक्षाच लाभली.

आई प्रथम स्त्री आहे
हे सत्य स्वीकारले पाहिजे.
स्त्रीची होणारी उपेक्षा
आतातरी थांबवली पाहिजे.

      © रत्नाकर जोशी ©
                  जिंतूर
           ८२७५२३१६४१

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 स्पर्धेसाठी

मायेची पांखर घालणारी पिलांवर
तिलाच खरोखर म्हणतात माय
माया करते जीव तोडून पिलांवर
मग ती आई असो वा असो गाय

सुनीता महाबळ

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
देवा तुझ्या नामा ची
माय ठेवून गेली ठेव
जिथे असेल माय माझी
तिला तिथें सुखी ठेव
डॉ शिल्पा जोशी
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 मुखी नाम घेता मीरेचे
होते भक्तीची जाणीव
माय माझी आहे जीवनी
नाही भासत कसली उणीव 
सौ, अनुजा देशमुख @ 65

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 स्वत:च्या पोटाला चिमटा काढून
लेकराला भरवणारी असते माय
आईच्या प्रेमाला खरोखर जगात
कोणतीच उपमा लागू पडत नाय

सुनीता महाबळ
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
जिथे जिथे व्रुक्ष आहे
तिथे आहे छाया
तिथे तिथे आहेस तू आई
जिथे आहे माया
🙏💝🙏💝🙏💝🙏💝
नयना कुलकर्णी

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 स्पर्धेसाठी..

आई तर आहे ज्योत अंतरंगातली,
माया तिची जणू कोमल फुलांतली,
महिमा तिचा काय वर्णावा मी आता,
अथांगता कुशीत तिच्या सागरातली..

निर्मला सोनी.

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 स्पर्धेसाठी:
१)माझी माय द्यानी भारी
प्रत्येक बाबीत हरहुन्नरी
मायाममता, नाती खरी
द्यानगंगा वाही घरोघरी
***********
२)
मन द्यानाचा सागर
माया ममतेचा झरा
माणुसकीची माझी माय
मानी अध्यात्म अन् ईश्वरा
***********
३)
 माझी माय सत्यवचनी
कडक शिस्त,कणखर वाणी
समाजात तिचा दरारा भारी
कॉन्हेंट शिक्षित इंग्लिशभाषिणी
***********
३)
 रूपसुंदरी, केशकलापिणी
गिजरे डोळे, महिरप कपाळी
माझी माय मायेची साऊली
काळजीने आम्हा सांभाळी
***********
३१,© जागृती निखारे.
८/५/२०१६
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 स्पर्धेसाठी:
१)माझी माय द्यानी भारी
प्रत्येक बाबीत हरहुन्नरी
मायाममता, नाती खरी
द्यानगंगा वाही घरोघरी
***********
२)
मन द्यानाचा सागर
माया ममतेचा झरा
माणुसकीची माझी माय
मानी अध्यात्म अन् ईश्वरा
***********
३)
 माझी माय सत्यवचनी
कडक शिस्त,कणखर वाणी
समाजात तिचा दरारा भारी
कॉन्हेंट शिक्षित इंग्लिशभाषिणी
***********
३)
 रूपसुंदरी, केशकलापिणी
गिजरे डोळे, महिरप कपाळी
माझी माय मायेची साऊली
काळजीने आम्हा सांभाळी
***********
३१,© जागृती निखारे.
८/५/२०१६

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
91 99216 19277‬:
 आई म्हणजे वेदनेतल्या
पहील्या हाकेचा आधार
आई म्हणजे लेकराच्या
कायाकल्पाचा विस्तार
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 🌺🌺🌺🌺🌺🌺
किती गोडवा गाऊ माय
माय जीवनाचा विसावा..!
तुझे मंगल नाम ओठांवरती,
रोजच दरवळतो रहावा..!!
____ गजानन पवार @81

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 मायसारखं तीर्थ
जगात कोणतंच नाय
चरण धुवून तिचे ,तीर्थ
प्राशन करायचं हाय

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 स्पर्धेसाठी चारोळी



      आई

आईसारखे पवित्र तीर्थ
पृथ्वीतलावर सापडणार नाही.
मनसोक्त चाखावी गोडी त्याची
ते संपणार नाही वा उरणार नाही.

     रत्नाकर जोशी
           जिंतूर
    8275231641
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
♧♧♧ संकलन समाप्त ♧♧♧

कॅप्शन जोडा




शनिवार, ७ मे, २०१६


""""""" दैवत """"""
माझी आई दैवत माझे
जीवनाची भाग्यरेखा..!
मायेचा हात पाठीवर
अथांग सागरा सारखा..!!

आई साखरेचा पेव
जणू नारळाचे पानी..!
वरून कठिण भासते
अंतरी अमृताची धनी..!!

शब्द शब्द भिजून ओला
मायेच्या पवित्र मंदिरात..!
कौतुक वाटते लेकाचं
मोठ्या अभिमानाने सांगत..!!

आई तुझी किमयागिरी
उपमा मी देऊ कैसी..!
फुलांच्या गुंफून माळा
रोज अर्पावे चरणाशी..!!
----गजानन पवार













शुक्रवार, ६ मे, २०१६

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

साहित्यमंथन आयोजित काव्यमंथन चारोळी स्पर्धा -भाग -35

विषय - हे जीवन सुंदर आहे

परीक्षक :- कविता शिंदे -26 (मुंबई )

संकलन :- गजानन पवार सर
ग्राफिक्स :- क्रांती सर / देवणीकर सर

संकल्पना - अरविंद कुलकर्णी

--------------:--------

🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 रोजच बघतो सूर्य मला अन्
मी ही बघतो त्याला.
हे जीवन सुंदर आहे म्हणतो
मी त्याला तो मजला.

डॉ.सुधीर अनंत काटे,६४.

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
हे जीवन किती सुंदर आहे!
प्रत्येकाला झुकते माप आहे!!
स्वार्थ आपलाच नडतो आहे!
निसर्गाचे संगतीतच सुख आहे!!

रामराव जाधव 04

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
पक्षांची किलबील,झ-यांची खळखळ
नि:शब्द शांतता, झुळूकहि क्षणभर.
मैत्र जिवांचे,वनचरे सोयरे,
हे जीवन सुंदर आहे खरंतर.

डॉ.सुधीर अनंत काटे.६४

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 स्पर्धेसाठी

कस्तुरीमृग नको होऊ रे
     आनंद तुजजवळी आहे
नको राहू रे हिरमुसलेला
      हे  जीवन  सुंदर  आहे

सुनीता सुरेश महाबळ

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 हे जीवन सुंदर आहे
     आस्वाद तयाचा घेई
आनंदी रहा तूही अन्
     जगतालाही आनंद देई

सुनीता सुरेश महाब@२१
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 हे जीवन सुंदर आहे
     पहाण्याची दृष्टि हवी
सकारात्मकता स्विकारुनी
      जीवनाची गोडी चाखावी

सुनीता महाबळ@२१

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 हे जीवन सुंदर आहे
     विचार हा मनी कोरुनी ठेव
तक्रारीचा स्वभाव सोडूनी
     जतन करी ही अमुल्य ठेव

सुनीता महाबळ @२१

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 साधुसंतही गेले सांगुनी
     तुझे तुझ्याजवळी आहे
वृथा नको राहू रे उदास
     हे जीवन सुंदर आहे

सुनीता महाबळ

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 स्पधॅसाठी
सुलभा कुलकणीॅ
चारोळी स्पधाॅ भाग 35
जन्म हा परमेश्वराचा प्रसाद आहे,
सुखदुःखाचे फेरे अनुभवते आहे,
हे जगणे अडथळ्यांची  शयॅत आहे,
तरीही  माझे  हे  जीवन सुंदर आहे.
***************************

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 चारोळी स्परधेसाठी

हे जीवन सुंदर आहे !
देवांनी फक्त माणसाला पंचेंद्रिय देऊन , फुलांचा सुगंध ,मधुर चव ,सुंदर निसर्ग दाखवुन !
आईचा प्रेमळ स्पर्श ,पक्ष्यांची गोड किलबिल ऐकवुन !
हे जीवन सुंदर आहे ,हे दिल दाखवुन !
सौ .निलाक्षी विद्वांस .
६८

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
अनमोल क्षणाचा योग
आनंद म्हणजे जीवन आहे..!
कधी गोड हसू तर कधी रडू ,
अनुभवता जीवन सुंदर आहे..!!
_✍;____ ____ गजानन पवार @81
  (स्पर्धेसाठी नाही)

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 नको करु तु उगाच चींता,
सुख दु:ख हे नश्वर आहेे...
नको आत्महत्तेचा विचार राजा...
हे जीवन सुंदर आहे...

    @ उत्कर्ष देवणीकर..

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 स्पर्धेसाठी चारोळी

सूर्य ऊगवता सांगे
हे जीवन सुंदर आहे
नात्याचे रेशीम धागे
विणण्यात आनंद आहे

अंजना कर्णिक

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
अंजना ताई कर्णिक:
 अन्य चारोळ्या
का ऊगाच खंताविसी
रात्री नंतर प्रकाश आहे
का अस्वस्थ मनी राहसी
मनुजा हे जीवन सुंदर आहे

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 नकोस होउ उदास वेड्या
नकोस आवळू फास ।
सरता निशा ,होईल उषा
हे जीवन आहे सुंदर खास ।

@ अरविंद कुलकर्णी
(स्पर्धेसाठी नाही )
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 हे जीवन सुंदर आहे
रंग गधांतुन ऊमजते
जलधारांत नर्तन आहे
खळ्यामळ्यात गीत आहे
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
अंजना ताई कर्णिक:
श्वास हे दान विधात्याचे
नको विराम त्यास अकाली
जाण, हे जीवन सुंदर आहे
शोध आनंद  या जीवनी

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
चारोळी

दोन घडीचे जीवन आपुले
धकाधकीतच सरते आहे.
कधी जगावे स्वतःसाठीही
जीवन आपुले सुंदर आहे.

    रत्नाकर जोशी. जिंतूर
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
स्पर्धेसाठी चारोळी

जन्म, मृत्यू, जय, पराजय
नियम सृष्टीचा चालत आहे.
आयुष्य जगूया दोन घडीचे
जीवन आपुले सुंदर आहे.

      रत्नाकर जोशी
             जिंतूर
     8275231641

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 सुख दु:खाची भरती येणे
हा नियतीचा खेळ आहे
सदा आनंद गीत गाणे
कारण जीवन सुंदर आहे

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
जीव अन वन सामावलेलं हे जीवन सुंदर आहे

जीवाला सुखावुया अन वनाला फुलवूया !

विनासायास  हे  सहज प्राप्त आहे

दिलखुलास जगुया अन प्रेम आनंद  वाटुया !!
-चारोळी स्पर्धेसाठी
डॉ.ज्योत्स्ना सु. कुळकर्णी, जुहु , मुंबई__@16

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
दोन घडीचा डाव मांडला
दुःखाच्या मागे सुख धागा..!
दुष्काळाची संपणार व्यथा ,
सोडा चिंता,नका करू त्रागा..!!
___✍ __ गजानन पवार @81

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 आयुष्याच्या वळणावर मागे वळून पाहताना
जाणीव होते सुख दु:खाच्या ठेव्याची
हे जीवन सुंदर आहे पण---
आहे गरज सर्वांच्या एकोप्याची
सौ, अनुजा देशमुख @ 65

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 " हापूसचा नी बासमतीचा जसा
  दरवळतोय घराघरात घमघमाट
  जीवन अगदी सुंदर आहे राव
  वाहू द्या तसेच स्नेहाचे पाट "
.............जयश्री पाटील
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
" हापूसचा नी बासमतीचा जसा
  दरवळतोय सर्वदूर घमघमाट
  जीवन अगदी सुंदर आहे राव
  वाहू द्या तसेच स्नेहाचे पाट "
.............जयश्री पाटील

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 जिवन खरंच खुप सुदंर आहे   कधी यश तर कधी अपयश हा जणू सापशिडीचाच खेळ आहे  त्याला झुजं देणे आपले काम आहे....कविता शिंदे........26

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 जीवन खरेच सुंदर आहे
यशापयशाचा खेळ आहे
झुंज द्यावी त्याला मग
यश आपलेच आहे
....कविता शिंदे ....26

असे जमेल का कविता ताई ?

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
सुंदर निसर्गाच्या सानिध्यात
प्रेम ,सत्याची धरूया कास
सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर
हे सुंदर जीवन जगूया खास
*नयना कुलकर्णी  :15
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 स्पर्धेसाठी

"देवपण लाभते माणसाला
अहं ईर्षा द्वेश मत्सर त्यागले जर
हे जीवन सुंदर आहे
माणसाने माणूसकीने वागले तर"

-आत्तम गेंदे (११)
९९२१०५८४१४
परभणी

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
"हे जीवन सुंदर आहे"

"काळी आई जगवेल तुला
स्वप्न तुझं फुलणार आहे,
गळफास घेण्याआधी धीर धर
बा कृषका,हे जीवन सुंदर आहे"

-संगीता देशमुख,वसमत @५९
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
कवी राजेंद्र कामुलकर:
जेथे असते ...'साहित्यमंथन....
तेथे नित्यची ऊत्तम चिंतन,
ललित ,वाग्मयीन ,काव्य जीवनी...
नित्य असे सुविचार संजीवनी.

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
चारोळी स्पर्धा
१ )
मन जीवन असता निर्मळ
जीवन आहे अतीव सुंदर ।
स्वार्थ लोभ लालसेपायी
मानव बनवी तया असुंदर॥
२ )
हे  जीवन तर सुंदरच आहे
मग दु:ख का सतावते आहे।
शुध्द चारित्र्य मन निर्मलता
यातच सुखाचे गुपित आहे॥
३ )
हे जीवन अतीव सुंदर आहे
साध्यासरळ जगण्यामध्ये
पण झाकोळते जीवनअंबर
स्वार्थ शिरता जगण्यामध्ये
४ )
संसाराचे रहाटगाडगे..
            रिते.. तोवरी भरते
एक संकट पार तोवर..
             दूजे.. हजर होते ।
त्याग तडजोड स्नेह सख्य
               ..  असता मात्र
हे  जीवन सुंदर आहे..
               .. असे भासते॥
५ )
प्रेम  करुणा  दया क्षमाभाव
यामुळे भासते जीवन सुंदर। स्वार्थ सूडाचे होता आगमन
जीवन बनत..  जाते जर्जर॥
                 डॉ. शरयू शहा.

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
9869643268
जन्म घेता सुरू होते जीवन
बालपण यौवन नि म्हातारपण
आपण जगतो हेच जीवन
तेव्हाच उमगते हे जीवन सुंदर.

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
टिपकागद होउन टिपत टिपत सूंदर चित्र मला काढायच आहे
हे जग किती सुंदर आहे
मला तुम्हाला दाखवायचं आहे
डॉ शिल्पा जोशी

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
स्पर्धेसाठी नाही
-------------
दुःखाच्या सागर किनारी
सुखाचे इथे एक बंदर आहे...
वादळांशी सामना करत रहा,
तरच जीवन खूप सुंदर आहे...
-डॉ.सखाराम भगत

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
स्पर्धेसाठी नाही
-------------
दुःखाच्या सागर किनारी
सुखाचे इथे एक बंदर आहे...
वादळांशी सामना करत रहा,
तरच जीवन खूप सुंदर आहे...
-डॉ.सखाराम भगत (13)
9527557069

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
फुल काढतांना
जरी टोचतो काटा
तरी सुगंध लाभता
जाती आनंदाचे वाटा

रामराव जाधव.
04 स्पर्धेत नाही

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
चारोळी स्पर्धा

हे जीवन खूपच सुंदर आहे
चहुअंगाने ते जगायचं आहे।
स्नेह ममता निर्मलता जपत अति सुंदर बनवायचं आहे॥
      स्पर्धेसाठी
                 डॉ.शरयू शहा.
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
ग्रूप बाहेरील चारोळी
----------------

बोला शब्द दोन गोड
अन जगा आनंदाने ।
हे जीवन सुंदर आहे
जिंका जग प्रेमाने ।

@ दिलिप परदेशी ,औरंगाबाद
9860363817

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
जीवन खूप सुंदर आहे
त्यात थोडा 'विनोद' भरा
दुःखी-कष्टी मनांच्या
आयुष्यात थोडा 'मोद' भरा
-डॉ सखाराम भगत (13)
9527557069

  ।।स्पर्धेसाठी चारोळी।।

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
पहाट ताबड्या प्राचीवरती..
तिमिरास छेदतो नित्य भानु आहे..
नवचैतन्याची लाभते सुवर्ण आभा...
हे जिवन सुंदर आहे.

.
संजय गोसावी कोपरगाव.

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
ज्याला जीवनाचं रहस्य कळलं
त्याला जगणं सोपं आहे
अवघड गोष्टी सुलभ केल्यास
हे जीवन नक्किच सुंदर आहे
नयना कुलकर्णी 15

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
स्पर्धेसाठी...

जीवन म्हणजे जन्म- मृत्यू एवढेच अंतर आहे,
रे मानवा, रात्रं दिवस तरी कुठे समांतर आहे,
सुख- दुःख, आशा- निराशा लपंडाव आयुष्याचे रे,
असे असले तरी जीवन खरंच सुंदर आहे ..

निर्मला सोनी.

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
: चारोळी स्पर्धा
विषय - आयुष्य सुंदर आहे

आल्या कितीही अडचणी
तरी घाबरून नको जाऊया
अड्चणीनंतर मिळे फळ मधुर
आयुष्य सुंदर आहे ते जगूया //१//

आयुष्यातील मैत्रीची घेऊनि मजा
सर्व अडचणींना दूर साराया
मनोमणीचे ते नाते अनुभवा
आयुष्य सुंदर आहे ते जगूया //२//

रोज नवं सकाळीचे स्वागत करूया
नवं नवीन क्षणांसी सोबती माळूया
त्या क्षणांनि आठवणी बनवूया
आयुष्य सुंदर आहे ते जगूया //३//

आयुष्याला नाव चैतन्य लेवूया
आयुष्या उदात्तता देऊया
इतरांच्या ओठी थोडे हसू लेवूया
आयुष्य सुंदर आहे ते जगूया //४//

रोज अडचणींना लढू झगडु
हार कधीही ना मानुया
मुंगीचे उदाहरनातुनी शिकूनी
आयुष्य सुंदर आहे ते जगूया //५//
© KUSANP ® (संजय पाटील)
@24

क्रमांक //४// ची चारोळी स्पर्धेसाठी घ्यावी
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
,
शाळेचे अंगण माझ्या ,मित्रांसव सवंग झाले..........
आनंदा उधाण आले,मनी स्पुरण कसे ते आले ..
सुंदर जीवनी या अपुल्या..सदैव भेटत राहू.....
स्वानंदे जीवन अपुल्या,एकमेका खुलवित राहू.
......राजेंद्र कामुलकर.मुंबई.
........9930696178.
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
¤¤¤¤¤¤ संकलन समाप्त ¤¤¤¤¤¤¤¤¤¤