शनिवार, ३० एप्रिल, २०१६
●●●¤¤●●●¤¤●●● शुभ रात्री सर्व मित्र परिवार श्री Dattu Jadhav सरजी। माझे परम स्नेही यांच्या प्रोत्साहनाने जुळून आलेली रचना...!!! || ते स्वप्न बोलते || ते स्वप्न बोलते की तुझा भास होता?..! जिथे बघावे तेथे , तुझा ध्यास होता..!! डोळ्याची भाषा जणू चंद्र सुर्याची शितलता..! होती जी स्वप्नी पाहिली , त्या प्रतिमेला भाव होता..!! भावनेची दुकानदारी बाग मनाची फुलवता..! जगणे कोरडे कठिन झाले , सुकल्या फुलांचा गाव पाहता..!! जेव्हा कर्णकुंडलांचा वा-याशी संवाद येता..! उरले आयुष्य क्षणांचे राहिले जाता जाता..!! _______ गजानन पवार
ॐ नमःशिवाय
महाशिवरात्रीच्या सर्व मित्रांना हार्दिक भक्तीमय शुभेच्छा. ...!!
ॐनमःशिवाय ॐनमःशिवाय
मनात माझ्या येता ध्यान
घेतो दर्शन देवा घेतो दर्शन॥धृ॥
औंढा ग्रामी द्वारूकावन
नागनाथ तुझे ते नाम॥१॥
किर्तनी फिरले राऊळ
होते नामदेव भक्ति तल्लीन॥२॥
भक्तां मुखी जयजयकार
महाशिवरात्री सोहळा अपार॥३॥
गजाआनंद लाभले दर्शन
परमोच्च सुखे लागले ध्यान॥५॥
__________ गजानन पवार
7066779265
शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६
संत महिमा
सर्वानाच जाण आहे संत म्हणजे ज्याने आपल्या जीवनातील नश्वर गोष्टींचा त्याग करून सत्वगुणाच्याही अवस्थेच्या पलीकडे जाऊन जो ब्रम्हरुपाशी तदाकार झाला व दया क्षमा शांति हे प्रत्यक्षात उतरवून समाजाच्या हितासाठी झटून त्यांना आपल्या प्रमाणेच करतात अशांना तुकोबाराया अदिकरून संतमहात्म्ये त्यांना संत म्हणतात..
पर्क्षिती राजाला जेव्हा शापाने ग्रासले असतांना त्यांना महान असे शुकदेवाच्या उपदेशावरुन सात दिवसांत शुकाचार्यांनी त्यांना भगवंताच्या लीलांचे वर्णन सांगुन त्यांना मोक्षप्राप्ती करवून तर दिलीच परंतु गुह्यतम ज्ञान सुद्धा सांगितले असे संत उदार असतात आपली पवित्र अशी भारतभूमि या भूमीत अनेक इश्वरीय अवतार तसेच इश्वरीय अंशावतार, संत महात्म्ये जन्मास आले त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्यात अनेक थोर संत महात्म्ये जन्मास येऊन त्यांच्या चरणकमलांनी ही भूमी पवित्र झाली आहे. असे संत म्हणजेच ज्ञानेश्वरा पासून तुकारामादि संता पर्यंत होऊन गेलेले व आताही थोर संत महात्म्ये या भूमीत आहे..संत कळण्या करिता एक मीटर असते ते कळणे फार कठीण असते संत हे आपल्यातच, सामान्य माणसासारखेच असतात. चालता बोलताच ते सहज बोलून मोलाचे मार्गदर्शन ते करीत असतात परंतु आपल्यावर असलेल्या अनेक जन्माच्या पापामुळे ते आपल्या लक्षात येत नाही त्यांचा जन्म हा विशिष्ट कारणांसाठी असतो. त्यांचे इष्ट कार्य संपले की ते त्यांचा अवतार संपवित असतात कारण, जन्मास येणे व ब्रम्हस्वरुपात लिन होणे हे त्यांच्याच हातात असते. संतांना अतिशय कष्टातून हलाखीचे जीवन जगावे लागत असते यातुन जो विजयी होतो तेव्हाच इश्वर त्यांचे स्वरूप त्यांना देतो. आपल्याच परिसरातील सर्वांच्या परिचयाचे आपण संत जाणताच ते म्हणजे संत सद्गुरू श्री श्रीराम महाराज कुलकर्णी जांभरुणकर बाबांचा थोडक्यात परिचय द्यायचा झाल्यास तो असा बाबा तसे हिंगोली जिल्हय़ातील इंचा गावचे,तिथे त्यांची स्थावर मालमत्ता भरपूर होती. बाबांच्या डोक्यावरील आईवडीलांचे छत्र बालपणीच हरविले, त्यावेळी बाबांचे एवढे कष्ट झाले की ते शब्दात वर्णन करणे कठीणच. बाबांना तशी बालपणा पासूनच देवाची खुप ओढ होती बाबांना दुसरे काहीही आवडत नसे पुढे चालून. बाबांना वैराग्य उत्पन्न झाले. घरादाराचा संसाराचा त्यांनी त्याग केला व फिरत फिरत नर्सी येथील माळावरच्या हनुमंता जवळ आले व बसले तिथे उतरप्रदेश मधील आग्रा (ताजमहाल) येथील संत रामप्रसाद आगरेकर महाराज यांचे हनुमंताजवळ घोर तपश्चर्या चालू होती. बाबा त्यांच्या जवळ जाऊन उभे राहिले व रामप्रसाद महाराज (काशीकिपडी)यांनी मागे वळून पाहिले तर बाबा उभे असलेले त्यांना दिसले महाराज त्यांच्यावर खूप रागावले कारण त्यांचा स्वभाव फार कडक होता परंतु नंतर ध्यान करून बघीतल्यानंतर बाबा त्यांना सामान्य माणूस न वाटता त्यांचा अधिकार कापडी महाराजांच्या लक्षात आला व त्यांना नंतर प्रेमाने बोलू लागले. बाबांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली व महाराजांना फार मोठा प्रश्न पडला कारण त्यांच्या जीवनात गुरू दुसरे होते,आपण त्यांना कसा काय अनुग्रह द्यावा ह्या विचारात ते पडले. परंतु बाबांच्या आग्रहामुळे त्यांनी त्यांना अनुग्रह न देता फक्त भक्ति कशी करायची ते सांगितले ती भक्ती म्हणजे दररोज दक्षिणमुखी अकरा हनुमंत रायाची पुजा पायी जाऊन करायची व श्रीराम जय राम जय जय राम या तेरा अक्षरी मंत्राचा अकरा कोटी जप करायला सांगितले बाबांनी ती आज्ञा पालन करून त्यांनी खरोखरच त्यांच्या सांगण्या प्रमाणे, त्यांनी कठोर भक्ती केली सारखी नेमाने 38 वर्षे भक्ति केली व जांभरुण (बु)येथील हनुमंताचा साक्षात्कार झाला व त्यांनी या गावात राहून माझीच भक्ति कर दुसरे काही करण्याची गरज नाही, असे सांगितल्यानंतर बाबा मंदिरातच राहून त्यांची भक्ती चालू होती. पुजा,झाडझुड गावात तेल मागून दिवा चालू ठेवणे अशा प्रकारे त्यांची दिनचर्या चालू होती बाबा जांभरुणच्या हनुमंताची भक्ति जरी करीत असले तरी काही गावातील त्याकाळच्या भाविक लोकांनी निधानराव ची शिल्लक असलेली जागा (गोठा )तिची दुरूस्ती करून राहायला दिली नंतर त्यांच्या बायको मुला विषयी चौकशी केली असताना ते सांगत नसत परंतु त्यांचा शोध लावून त्यांनी ज्यावेळी बाबा अतिशय आजारी पडले तेव्हा घेऊन आले. त्यावेळी बाबांनी सांगितले की माझी सासुरवाडी नर्सी आहे म्हणून मग त्यांच्या पत्नीस आणले व तिथून पुढे बाबांचा प्रपंच सुरू झाला. हा काळ होता इ.स. 1946 ते 1976 पर्यंत बाबांचा प्रपंचातील व्यवहारात त्यांनी अजिबात लक्ष घातले नाही. नंतर शेवटच्या 30 ते 40 वर्षांत बाबा लौकीकांमध्ये जास्त आले व त्यांना भगवंतानी एवढे मोठे केले की आज त्यांच्या तपश्चर्येच्या फलस्वरूपावर एवढी मोठी वास्तू मंदिर बाबांच्या भक्तांच्या शिष्यांच्या सहकार्यातून उभी राहीली आहे खरे तर बाबांचा या गोष्टीस विरोध होता परंतु आपल्यालाच कुठेतरी बाबांचे अस्तित्व असावे म्हणून हा फार मोठा प्रकल्प भक्त व शिष्य मंडळींच्या आग्रहास्तव उभा केलेला आहे या सर्वात मोलाचे योगदान म्हणजे त्यागी, निस्वार्थी, अतिशय प्रामाणिक व महाराजांच्या सर्व कुटुंबाच्या विचाराने चालणारे व चारही भावांना सारखे समजणारे त्यांच्याच विचार विनिमयाने खरोखर ह्या कामात अत्यंत कळकळ असणारे ते म्हणजे बद्री भाऊ सारडा मकोडीवाले ह.मु. सेनगाव ह्यांनी व बाबांचे दोन नंबरचे चिरंजीव किसन महाराज यांनी पुढाकार घेऊन हा फार मोठा प्रकल्प ध्यानीमनी नसतांना उभा केला. परंतु त्यांना असे मनात सुद्धा वाटले नव्हते की, एवढे काम होइल म्हणुन! खरोखरच बाबांच्या भक्तगणांनी व शिष्यगणांनी बाबांची सेवा या संस्थानच्या बांधकामास मदत देऊन त्यांनी केली हे फार मोठे पुण्याचे काम त्यांनी केले. खरोखर धन्यवादास पात्र होत संस्थानची वर्गणी सुरुवातीस विश्वनाथ महाराजांच्या मार्गदर्शनानुसार बाबांनी सांगीतल्या प्रमाणे सुरू केली होती त्यावेळी पहिली वर्गणी जोडतळा व हिरडी येथून जगन्नाथ महाराज, पुंजाजी महात्मा, विश्वनाथ पाटील, सुभाष पाटील, कुंडलिकराव चेरमण,मदन माऊली, सारंग गाडे, तानाजी साहेब सुर्यभानजी चेरमन असे बाबांचे थोर भक्त यांनी पुढाकार घेऊन सुरूवात केली होती. खरोखरच बाबांची सेवा करणारे भक्त धन्य होत. बाबांचे तसे भक्तगण पूर्ण मराठवाडय़ात,विदर्भात आहेत. असे असले तरी बाबांचा काही गावावर व शिष्यावर व असंख्य भक्तावर प्रेम होते त्यापैकी, पूर्ण जीवन बाबांनी रिधोरा,वाघजाळी,पहेणी,सेनगाव, वरूड देवी, वरूड साई, भानखेडा,तळणी, वैजापूर, पुसेगाव, आठरवाडी,पार्डी, सुलदली, देवूळगाव,इडोळी,कडती,नांदुरा, जवळ, पळशी,शिवणी,कारेगाव, शिनगी,खुडज,ह्यावर अतिशय प्रेम होते हा काळ होता इ.स. 1952 ते 1982 पर्यंतचा त्यानंतर बाबांचे जास्त प्रिय असलेले बासंबा,जोडतळा,काळकोंडी ,आमला, घोटा, जांभरुण, सवड, वरूड गवळी, केसापुर,पिंपळखुटा, खानापूर, कलगाव,इत्यादी बरीच गावे आवडती होती. पुढे जसेजसे बाबांचे वय होत गेले तस तसे बाबांनी विश्वनाथ महाराज यांना त्यांच्या जवळील ज्ञान देत गेले....क्रमश......
------------------------
साहित्यमंथन आयोजित
"काव्यमंथन " चारोळी स्पर्धा क्र 34
विषय :- ॥ महाराष्ट्र माझा ॥
परीक्षक :- नयनाताई कुलकर्णी
संकलन :- गजानन पवार
संकल्पना :- अरविंद कुलकर्णी
ग्राफिक्स :- उत्कर्ष देवणीकर
ग्रूप बाहेरील स्पर्धकांसाठी व्हाटसप क्र .9689077239
अरविंद कुलकर्णी, अहमदनगर
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
सामना दुष्काळाचा,
करु या जीद्दीने...
महाराष्ट्र हा माझा,
बहरेल पुन: हीमतीने...
@ उत्कर्ष देवणीकर (03)
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
दुष्काळ जरी पाचविला पुजलेला,
तरी शेतींत राबतो महाराष्ट्र माझा!
संकटाला भिडता सर्व एकोप्याने,
सुख पाहीन पुन्हा महाराष्ट्र माझा!!
----------☆रामराव जाधव. 04
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
महाराष्र्ट माझा
कष्टकर्यांचा अन संतांचा
सुधारकांचा महाराष्र्ट माझा
वारकर्यांचा अन शिवबाचा
मायमराठीचा हा देश साचा
अंजना कर्णिक
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🌿 चारोळीस्पर्धा 🌿
माझा महाराष्ट्रहोता कधीतरी
सुजलाम् सुफलाम् बहरलेला
राजेंद्रसिंह प्रणाली आचरून
मिळवूया तिचा बहर पहिला
डॉ.शरयू शहा.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
सुलभा कुलकणीॅ
चारोळी स्पधाॅ
छत्रपतींचा,संतांचा,देवदेवतांचा रे जेवढा,
डोंगरद-या,समुद्रकिना-याचा गराडा तेवढा.
जरी पडला भूकंप,दहशत,दुष्काळांचा वेढा,
ताठ मानेने ऊभा राहिला माझा महाराष्ट्र ऐवढा.
जय महाराष्ट्र
सुलभा कुलकणीॅ.
****************************************
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
महाराष्ट्र माझा संगम भक्तीशक्तीचा
संतमहंत नि देवादिकांचा
राजे शिवराय नि शूर मावळ्यांचा
राष्ट्रप्रेमी क्रांतिकारकांचा
प्राची देशपांडे
प्राची देशपांडे
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
चारोळी स्पर्धेसाठी न शा सोवनी देश मा झा महाराष्ट्र नेते येथे बहु खाश्ट नाग वुनी जनतेला झालेत पुष्ट नका लावु महाराष्ट्रास दृष्ट्
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांन नडुन गेला,निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला.महाराष्ट्र माझा म्हणूनच जिकूंन गेला। कविता शिंदे .....(२६)
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
चारोळी स्पर्धा
"महाराष्ट्र माझा "
"संपन्नतेचा इतिहास असलेला महाराष्ट्र,
आज दुष्काळाने होरपळतो आहे,
भ्रष्टाचार,महागाई,बलात्काराने हतबल
माझा महाराष्ट्र टिपं गाळतो आहे"
संगीता देशमुख,वसमत@५९
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
महाराष्ट्र माझा ....मनासज्जनांचा
असा प्रांत नाही......महामानवांचा.
___ राजेंद्र कामुलकर
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🌺महाराष्ट्र महान🌺
मातीत या जन्म झाला
पवित्र तीर्थाची ती खान..!
संत विचारी शिकवण येथे ,
जगतात श्रेष्ठ महाराष्ट्र महान..!!
--✍🏻__ गजानन पवार @81
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
मी महाराष्ट्रीय, महाराष्ट्र माझा
याचा सार्थ मला अभिमान
इथल्या मातीत जन्मले सारे
टिळक सावरकर देशभक्त महान
सुनीता महाबळ
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
अरविंदकाका .
चारोळी स्पर्धा!
महाराष्ट्र माझा!
गर्जा महाराष्ट्र देशा,सह्याद्रीच्या कणखर देशा !
शत्रुचा पुरा नायनाट करायला,
महाराष्ट्र धाऊन जाईल हिमालया साथ द्यायला !शिवराया सारख्या दुरद्रुष्टी असणार्या राजाच्या देशा !
सौ.निलाक्षी विद्वांस.६८
9969071390
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🚩महाराष्ट्र माझा🚩
"मुजरा करतो रायगडाला महाराष्ट्र माझा
प्रणाम करते विद्यापिठ सावित्रीमाईला
कळसूबाईची शान गगनाला भिडते
उन्हाळीसंत्री विराजमान उपराजधानीला"....
.......जयश्री पाटील☝🏻स्पर्धेसाठी
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🍀🌹स्पर्धेसाठी🌹🍀
नरविर,विरबाला निधड्या छातीच्या
लोकाचा महाराष्ट्र असे रत्नांची खाण
लढाईत मराठे घाबरत नाहीत
मर्द मावळयांची नसे येथे वाण
@77सुनिल बेंडे परभणी
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
सहिष्णुता नी एकता ही महाराष्ट्रची खुबी, घनघोर दुष्काळात माणुसकी जपेल आमची ऐकी, हौतात्याम्याचे मांगल्य जपण्या सदैव आहोत सज्ज, मराठी माणुस जपेल अक्षय अखंडतेचे तत्व. स्पर्धेसाठी ----------------- शंतनु विजय भालेराव ७१
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
स्पर्धेसाठी
"मातीतून मोती पिकवतो येथे
अभंगाच्या तालावर बळीराजा
थोर कर्मयोग्यांची ही भूमी
पावन महाराष्ट्र माझा "
-आत्तम गेंदे (११)
परभणी
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
महाराष्ट्र माझा नटला किती वैविध्याने
शिवाजी, लोकमान्य सावरकरांच्या संस्काराने
आपलेपण,कला कौशल्य जोपासलेला हा प्रदेश
द्रष्ट लागली हे प्रभु, 🙏देना वरुणराजाला बरसण्याआदेश
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
स्पर्धेसाठी नाही🙏🙏🙏🙏🙏
नयना कुलकर्णी
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
---चारोळी स्पर्धेसाठी___महाराष्ट्र माझा 📢📢⛳⛳
संतसाहित्याचा वसा लाभला माझ्या महाराष्ट्राला छान
साक्ष ऐतिहासिक किल्ल्यांची ही महाराष्ट्राची शान
वरणभात झुणकाभाकर हे इथले खानपान
खंत मात्र दुष्काळाची कधी भागणार शेतांची तहान ?
डॉ.ज्योत्स्ना सु. कुळकर्णी, जुहु , मुंबई
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
महाराष्ट्र माझा !!! म्हणण्यात शान आहे,
त्याची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर आहे.
सुशिक्षीत होऊन मनाला एक पटवले आहे,
सजीवनिर्जीव दोघांचेहि मंगल करणे आहे.
डॉ.सुधीर अनंत काटे...६४
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
काव्यमंथन चारोळी स्पर्धा क्र 34
🍀🍀🍀 समाप्त 🍀🍀🍀
गुरुवार, २८ एप्रिल, २०१६
पाणी वाचवा
॥ पाणी जीवन ॥
पेटलं र पाणी पेटलं र
कोरड्या बोराच धुराळा उठला र !॥धृ॥
तोडुन झाडे बांधली घरे
वनराईचा विचार खुंटला र॥१॥
नाही केले पुनर्भरण
नदी,नाले जाती वाहून ॥
कसा कणखर उन्हाळा पडला
तेव्हा दुष्काळ पाण्याचा वाढला र॥२॥
नका तोडू झाडे हो कोणी
म्हणून सृष्टीची होते की हानी ॥
लावा एकतरी झाड जीवनी
विनवत गजआनंद कर जोडूनी॥३॥
✍🏻----गजानन पवार
दोन भाऊ जरी असतिल तरी संपत्तीसाठी धना साठी भांडणे करतील वेळप्रसंगी 'सुई दोरा' सुद्धा वाटून घेतील परंतु शिक्षणासारखी महानसंपत्ती हिरावून घेतली जात नाही .म्हणून खुप शिका शिकवा संघटीत व्हा. आपल्याला जरी काही कारणाने शिकता नाही आले तरी पण आपल्या मुलांना शिकवा त्यात आपले समाधान बघा आज ज्ञानाच्याच बळावर भारत देश सर्व देशांशी स्पर्धा करू शकतो
थोरांचे विचार अंगीकारा शिक्षणासारखे दुसरे कुठलेच साधन नाही म्हणून शिक्षण हेच सर्व श्रेष्ठ आहे...
एका निरक्षर गावाची लोकसंख्या जवळपास दहा हजारावर होती पण गाव शिक्षण पासुन वंचित राहिलेले आणि तेथील एक परम्परागत संस्कृति चालत आलेली रुढी परंपरा की, गावातील जो कोणी राज्यकारभार सांभाळेल त्यांनी पाच वर्षे सांभाळावा आणि शेवटी पाच वर्षे संपल्या नंतर सर्व गावकरी त्या राजाची मिरवणूक काढून गावाजवळील सरोवरातील बेटावर राजाला सोडून दिले जायचे पण जंगलातून ती व्यक्ती परत गावात येत नव्हती कारण त्या सरोवरातील बेटावर सर्व प्रकारचे हिंस्त्रप्राणी त्या राजाला मारून खात होते.
पुढे गावातील कोणतीच व्यक्ती राज्यकारभार सांभाळायला तयार होत नव्हती पण एक त्याच गावातील तरुण युवक थोडा फार बाहेर गावातून शिक्षण शिकून आला होता त्याने राज्यकारभार स्विकारण्याची जवाबदारी घेतली हा तरुण होता त्यामुळे लोकांना याचे आश्चर्य वाटत होते की हा बालवयातच आपले आयुष्य पणाला लावत आहे सर्व दुःख व्यक्त करीत होते!सोबत आनंद ही होता.
आता या युवकांनी आपले पाच वर्षांत पुर्ण सरोवरातील बेटावरील झाडे ,वेली तेथील हिंस्त्रप्राण्यांना त्यांच्या निवा-यासाठी दुसर्या जंगलात नेऊन सोडले आणि सुंदर आशा प्रकारचा बेटावर राजमहल उभारून काढला.
आता पाच वर्षे पुर्ण होत आले होते सर्व लोक रडत दुःखी अंतःकरणाने निरोप देत होते पण हा युवक येथे हस्त हस्त सरोवराकडे चालला होता कारण त्याच्या शिक्षणाने ज्ञानाच्या बळावर आपला मार्ग मोकळा केला होता...
सांगायचं तात्पर्य :- येवढेच आहे की शिक्षण हेच जगात तारणारे आहे ,शिक्षणानेच जीवन घडते म्हणून सर्वांनी शिकले पाहिजे....
........साहित्य दर्पण आयोजित दरबार...
________ गजानन पवार पाटील
जीवनाचा नाश दारू
या दारूच्या घोटा पायी
लावली जिंदगी पणाला.....!
दे सोडून दे दारू वेड्या
पोरगं मारते बापाला....!!धृ!!
रोजच उपाशी राही
चकना फुटाणेचं खाई.....!
बायको गाते शिव्या अंगाई
झाली मरणाची घाई....!!
हाल हाल झाले किती
आतडे पोटाचे पिळले.....!
घटका शेवटची मोजतो
तेव्हा लिव्हर फुटले.....!!
✍🏻_____ गजानन पवार
🍻🍻🍻🍻🍻🍻🍻
नमस्कार मित्रमंडळी ,
शुभ दुपार.
27,एप्रिल २०१६ रोजी...माझ्या नवीन ब्लॉग वेबसाईंड ची ग्रैंड ओपनिंग.
"शब्द शिल्प" मित्रांनो, यात आपल्याला माझे मराठी तसेच हिंदी साहित्य लेखन, चारोळी, कथा, लेख, कविता, काव्यगीत, नाटक सवांद यासारखे साहित्य वाचायला मिळेल. त्याचबरोबर, माझे येणारे प्रोजेक्ट्स म्हणजे पुस्तके, नवरंग चारोळी संग्रह, अक्षरशिल्प कविता समावेश, वर्तमानपत्रात छापून येणारे माझे साहित्य पहायला मिळेल. माझे फोटोज, विडिओज, छायाचित्रे, माझा अनुभव असे सुंदर-सुंदर, अनेक विषयांवरील लेखन या माझ्या ब्लॉगवर आपल्याला वाचायला मिळेल. तेव्हा येतोय लवकरच..."शब्द शिल्प" या माझ्या ब्लॉग बरोबर.
वेब ब्लॉग पत्ता:- E-mail ID: pawargp81@gmail.com
Mo:- 7066779265/
http://gppawar.blogspot.in
"""""""""""""""""""""""""""""""""""""
नको नको दारू
उध्वस्त केल
घर या दारुन॥
कसा पडला
गटारी जाऊन॥धृ॥
प्रभात समयी
दुकानी जाऊण॥
येतो बघा हा
फुकटाची लावूण॥१॥
ग्लास वर ग्लास
अंगा भारी वास॥
मळकट मळकट
खरमु-याचा ध्यास॥२॥
हात भट्टीवर
मारतोय ताव॥
नाले मोरी ही
त्याचेच गाव॥३॥
रोजचं आता हा
झिंगूण येई ॥
बायको मुलाशी
लाखोळी वाही॥४॥
कमायी दमडी
गमायीच सारी॥
बेवडा वदतो
मी लय भारी॥५॥
गल्ली बोळात
मदिरा पीतो ॥
दहा पाच रुपये
लोकांना मागतो॥६॥
कटकट भारी
आपलीच हुशारी॥
पिता पिता हा
लोळतो दारी॥७॥
✍🏻गजानन पवार
हायकू एक प्रयास
माझा हायकु पहिला प्रयास..!!
मातेच्या उरी
घेतला जन्म जरी
भार ओझेच..!
सोसल्या तिने
गर्भाचीया यातना..
याच्याही साठी..!!
वडीलांसी तो
लावत लाडीगोडी
लुबाडी धन..!!
विश्वास गेला
उडाला भरवसा..
याचे वरील...!!
बालिश पणा
तारुण्य थोडे सोपे
वार्धक्यी गाठ..!!
✏ _______ जी.पी
बुधवार, २७ एप्रिल, २०१६
॥ पाण्याची बचत ॥ करावी तुम्ही पाण्याची बचत ॥ थेंब थेंब पाणी जणू अमृताची ज्योत॥१॥ पाणी हेच जीवन पाणी मोठं धन ॥ करू नका त्याची व्यर्थ उधळण ॥२॥ पावसाचं पाणी अडवून ठेवा ॥ बंधारे,वनराई जागोजागी अडवा॥३॥ करू नका पाण्यासाठी भांडण ॥ महत्त्व पाण्याचे करा नियोजन॥४॥ आळवणी तुमच्या चरणांवर ॥ पाण्याचा सोन्यापरी वापर कर॥५॥ ✍🏻------ गजानन पवार
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🌺🌺जय श्रीराम 🌺🌺 श्रीरामा मुखी वदा निशिदिनी भवःदुःख लाटा जातील पळूनी..! गोड वाणी होई घेता नाम श्रीराम अज्ञान दगड तरती सागरातुनी..!! हा श्रीराम नामाचा महिमा जो जपेल आनंदाने अंतर्मुख..! भरली मोठी पापाची घागर रामनाम उच्चारता होई राख..!! हृदयी निश्चय शुद्धभाव धरी हसत येईल रघुनाथ घराशी..! होऊ सान अभिमान विसरा लीन होऊ प्रभूच्या चरणाशी..!! _✍🏻____ गजानन पवार @81 🙏🏻🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🙏🏻
कवितेची दुनिया
♧♧♧♧♧♧♧
गेले ते क्षण बालवयाचे
विहिरी माजी गार पाणी
दिनक्रम मौज पोहण्याचे



