शनिवार, ११ जून, २०१६

(खास बालमित्रासाठी बालकविता )

वारा आला पाऊस आला
सर्व घाम गळून गेला.!
पाऊस आला जो-याने
नदी भरली पुराने .!
पाऊस पडला रपरप
मुले धावली सपसप.!
पाऊस मला आवडतो
पाऊस खुप काकडतो.!
सुर्य मामा डुबुन गेले
पाऊस मामा पटकन आले.!
पाऊस गेला थांबून
आली मुले मैदानी धावून.!
पांढरे ढग लवकर आले
काळे ढग पटकन गेले.!
पावसाने भिजले माझे अंग
आई झाली फारच दंग.!
--'गगजानन पवार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा