शनिवार, ४ जून, २०१६


''सांगायचे आहे तुला''
सांगायचे आहे तुला
ओठांवरती थांबले
लाजरीच भाषा शैली
मन ओलेचिंब झाले

ओठांवरील ही भाषा
हवी गं उमजायला
प्रिती अंधळी प्रेमाची
आळवी सखे जगाला

वळून बघता मागे
आगळे जीवन गीत
गाभाऱ्यात देव कोठे?
हरपले तुझे चित

दैवाचा खेळ चालतो
चालक उभा श्रीहरी
कुणा हाती भाग्यरेखा
 कुणा भेटली तिजोरी
✍🏻___ गजानन पवार
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा