शुक्रवार, ३ जून, २०१६

🌸कामामध्ये दंग🌸

उन्हात उभा ठाकला
सर्जा राजा जोडीदार॥
तापलेली लाल धरा
काम मशागतीचे फार॥१॥

तहान पोटात आकारली
भुका जीव व्याकुळ होई॥
बांधा काठाच्या झाडावरी
पक्षी गाती 'वरुणा' अंगाई॥२॥

दगड धोंडा घामावला
सखी बांधावरून पाही॥
ताटी भाकरी शिरावरी
हिंडते दशदिशा दाही॥३॥

धनी कामामध्ये दंग
गात विठोबाचे अभंग॥
चाबूक हातात गर्जला
शेतशिवारी भरला रंग॥४॥

धारा घामाची पडता
चीज कष्टाचे होईल ॥
दाणे कणीस मोत्यांची
आनंद नाचत घराशी येईल॥५॥
✍🏻______ गजानन पवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा