रविवार, १२ जून, २०१६

हरीनामाच्या झुल्यावर
नामचींतनी झुलावे.!
वेड लागू दे हरीनामाचे,
देवा तु दर्शन द्यावे.!!

कुठं जाशील प्रयाग काशी
तीर्थ लोपले पायाशी.!
आईबापाची सेवा घडता ,
जीवनात सोन्याच्या राशी.!!

ओळख माणसातील देव
देही प्रत्येकी भगवान.!
देह आहे रे नश्वर ,
आत्मा जातो रे सोडून.!!

किर्ती ठेव तु जगामधे
संदेह तु ठेवू नको.!
चार दिवसाची जिंदगी ,
वेड्या वाया घालवू नको.!!

गगजानन पवार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा