शुक्रवार, २७ मे, २०१६

॥कविता॥
वेदनेच्या निखा-या मधुन
जन्म घेते माझी कविता ॥
कधी लक्ष्मीपुष्पाच्या सुगंधी
पाकळ्या मध्ये जन्मते कविता॥१॥

दुःख पार घालते कविता
शब्दांच्या एका लाटे सरशी ॥
फुटती शब्द वेडे सुखाचे
एका हुंदक्या सरशी ॥२॥

कधी शब्दांच्या माळा बनती
कधीच काही कळत नाही ॥
गुंतून गेलो शब्द नगरीत
दिवस की रात्र कळत नाही ॥३॥

जाऊद्या सवयच जडली
शब्दाविना नाही करमत ॥
झोप हरवली व्यैरीन व्यर्थ,
नाही तहान भूक लागत ॥४॥

स्वप्न उरी बाळगून कविता
नविन असतो रोजच ध्यास ॥
चंदनाचे ही मिटते आयुष्य
घासल्याविना नसे सुवास ॥५॥

  • ✍🏻 ----- गजानन पवार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा