रविवार, ८ मे, २०१६


🌹मातृदिन विषेश चारोळी स्पर्धा 🌹

विषय :- 🌺माझी माय🌺

परीक्षक :- सुलभाताई कुलकर्णी 
संकल्पना :- अरविंदजी कुलकर्णी 
ग्राफिक्स :- क्रांती बुद्धेवर,उत्कर्षजी देवणीकर

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

रात्री 9 ते 11 

🌹आरोग्यमंथन 🌹

सत्र 2 रे रात्री 9 ते 11

सदस्यांच्या प्रश्नांना डाॅ जोत्सनाताई कुलकर्णी उत्तर देतील

कार्यक्रमाची सांगता
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 🍁🌺आई🌺🍁
देवा, जन्म असू दे कितीही
पर्वा नाही असतील जरी एकशे आठ
एकच विनंती करतो तव चरणी
आई हीच असावी एवढी माञ अट
@७७ सुनिल बेंडे परभणी
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 *साहित्य मंथन*

चारोळी स्पर्धा

विषय-माझी माय

माय माझी भागीरथी ,
तुळशीला पाणी घाली ...
पुण्य पावसाची सर ,
माझ्या अंगावर आली ...

*प्रा.सौ.संगिता भालसिंग*25
अहमदनगर
दि.०८में२०१६
स्पर्धेत सहभागी रचना

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
"मला थोडसं खरचटलं तरी
 विव्हळते तिकडे माझी माय
 कातडाचे जोडे केले तरी
 तिचे पांग फिटू शकत नाय"
.........जयश्री पाटील
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 🍁🌹माझी माय 🌹🍁 
माझी गुरू सखी मार्गदर्शक
माझी मायच माझे सर्वकाही एकमेव अद्वितीय देवच जणू सर्व प्रसंगात पाठीशी राही
       ०५ @ डॉ .शरयू शहा.

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 माझी माय !चारोळी स्पर्धा ! एक माय जन्म देते ,
ती मेल्यावर दुसरी माय वाढवते !
जरी ती सावत्र माय असते,
तरी दोघींची माया सारखीच असते !
सौ.निलाक्षी विद्वांस ६८

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
देवा तुझ्या नामा ची
माय ठेवून गेली ठेव
जिथे असेल माय माझी
तिला तिथें सुखी ठेव
डॉ शिल्पा जोशी
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
मी देव पाहिलाय
वर्णू त्यास मी काय?
जेथे दया,माया,छाया,
ती माझी माय🙏🌹🙏🌹🙏🌹
.................................................
नयना कुलकर्णी......15....स्पर्धे साठी

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 माझ्या मायेला ध्यास 
सदा लेकरांचा सुखाचा
 राहून ऊपाशी देते घास
वसा जन्मभराच्या कष्टाचा!

********************
स्पर्धेसाठी चारोळी

माझ्यावर सावली धरण्यासाठी
 माय माझी जन्मभर ऊन्हात
बोल आर्शीवादांचे लेकरांसाठी
पाहतो मी देवबाप्पाला तिच्यात।

अंजना कर्णिक(9)
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 🔴 माझी माय 🔴

देवाला प्रत्येक घरी जन्म 
घ्यायलाछान सापडला उपाय म्हणून त्याने निर्माण केली 
प्रत्येक घरात एक माय ।
@ अरविंद कुलकर्णी 
(स्पर्धेसाठी नाही )

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 देवाला अवतार घ्यायला 
छान सापडला उपाय ।
म्हणून त्याने निर्माण केली 
प्रत्येक घरी एक माय ।
@ अरविंद कुलकर्णी 
(सुधारीत ,स्पर्धेसाठी नाही )

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 माझी माय 

"दिला आकार माझ्या स्त्रीत्वाला 
 संसाराच्या खस्ता खाऊन
बाळकडू पाजले माझ्या मायने
संस्काराचं कोंदण लेऊन"
   संगीता देशमुख वसमत @59 साहित्यमंथन 
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
-'चारोळी स्पर्धा
विषय --- माझी माय 
प्रेषक-- कुंदा पित्रे (46)
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
1) माय अंतरंग क्षितिजापल्याड
     विदग्ध रक्त वाहे उभ्या जन्मात
     माझी माय पाठी उंब-याआड
     स्निग्ध समई ,तेवे देव्हा-यात
  🍁
2) लेकीला,माय शोधे आपल्यात
     लेकीचा पाय नव्या वाटेवर
     जोड गं नातीगोती संसारात
     माय सांगे, जा संचिताबरोबर
कुंदा पित्रे (46)
शिवाजी पार्क
मुंबई

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 🌹🌹 रत्नहार 🌹🌹

     @ आई व स्त्री @

आई म्हणून जगात
उत्तुंग किर्ती मिळवली.
स्त्री म्हणून नशिबी मात्र
कायम उपेक्षाच लाभली.

आई प्रथम स्त्री आहे
हे सत्य स्वीकारले पाहिजे.
स्त्रीची होणारी उपेक्षा
आतातरी थांबवली पाहिजे.

      © रत्नाकर जोशी ©
                  जिंतूर
           ८२७५२३१६४१

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 स्पर्धेसाठी

मायेची पांखर घालणारी पिलांवर
तिलाच खरोखर म्हणतात माय
माया करते जीव तोडून पिलांवर
मग ती आई असो वा असो गाय

सुनीता महाबळ

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
देवा तुझ्या नामा ची
माय ठेवून गेली ठेव
जिथे असेल माय माझी
तिला तिथें सुखी ठेव
डॉ शिल्पा जोशी
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 मुखी नाम घेता मीरेचे
होते भक्तीची जाणीव
माय माझी आहे जीवनी
नाही भासत कसली उणीव 
सौ, अनुजा देशमुख @ 65

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 स्वत:च्या पोटाला चिमटा काढून
लेकराला भरवणारी असते माय
आईच्या प्रेमाला खरोखर जगात
कोणतीच उपमा लागू पडत नाय

सुनीता महाबळ
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
जिथे जिथे व्रुक्ष आहे
तिथे आहे छाया
तिथे तिथे आहेस तू आई
जिथे आहे माया
🙏💝🙏💝🙏💝🙏💝
नयना कुलकर्णी

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 स्पर्धेसाठी..

आई तर आहे ज्योत अंतरंगातली,
माया तिची जणू कोमल फुलांतली,
महिमा तिचा काय वर्णावा मी आता,
अथांगता कुशीत तिच्या सागरातली..

निर्मला सोनी.

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 स्पर्धेसाठी:
१)माझी माय द्यानी भारी
प्रत्येक बाबीत हरहुन्नरी
मायाममता, नाती खरी
द्यानगंगा वाही घरोघरी
***********
२)
मन द्यानाचा सागर
माया ममतेचा झरा
माणुसकीची माझी माय
मानी अध्यात्म अन् ईश्वरा
***********
३)
 माझी माय सत्यवचनी
कडक शिस्त,कणखर वाणी
समाजात तिचा दरारा भारी
कॉन्हेंट शिक्षित इंग्लिशभाषिणी
***********
३)
 रूपसुंदरी, केशकलापिणी
गिजरे डोळे, महिरप कपाळी
माझी माय मायेची साऊली
काळजीने आम्हा सांभाळी
***********
३१,© जागृती निखारे.
८/५/२०१६
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 स्पर्धेसाठी:
१)माझी माय द्यानी भारी
प्रत्येक बाबीत हरहुन्नरी
मायाममता, नाती खरी
द्यानगंगा वाही घरोघरी
***********
२)
मन द्यानाचा सागर
माया ममतेचा झरा
माणुसकीची माझी माय
मानी अध्यात्म अन् ईश्वरा
***********
३)
 माझी माय सत्यवचनी
कडक शिस्त,कणखर वाणी
समाजात तिचा दरारा भारी
कॉन्हेंट शिक्षित इंग्लिशभाषिणी
***********
३)
 रूपसुंदरी, केशकलापिणी
गिजरे डोळे, महिरप कपाळी
माझी माय मायेची साऊली
काळजीने आम्हा सांभाळी
***********
३१,© जागृती निखारे.
८/५/२०१६

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
91 99216 19277‬:
 आई म्हणजे वेदनेतल्या
पहील्या हाकेचा आधार
आई म्हणजे लेकराच्या
कायाकल्पाचा विस्तार
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 🌺🌺🌺🌺🌺🌺
किती गोडवा गाऊ माय
माय जीवनाचा विसावा..!
तुझे मंगल नाम ओठांवरती,
रोजच दरवळतो रहावा..!!
____ गजानन पवार @81

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 मायसारखं तीर्थ
जगात कोणतंच नाय
चरण धुवून तिचे ,तीर्थ
प्राशन करायचं हाय

♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
 स्पर्धेसाठी चारोळी



      आई

आईसारखे पवित्र तीर्थ
पृथ्वीतलावर सापडणार नाही.
मनसोक्त चाखावी गोडी त्याची
ते संपणार नाही वा उरणार नाही.

     रत्नाकर जोशी
           जिंतूर
    8275231641
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧
♧♧♧ संकलन समाप्त ♧♧♧

कॅप्शन जोडा




1 टिप्पणी:

  1. गजानन पवार सर चारोळी संकलना बद्दल
    साहीत्य-मंथन ग्रुप परिवारा तर्फे विशेष आभार
    warankar g @98

    उत्तर द्याहटवा