शिक्षण :- ''जीवन प्रवाहातील तरुण जाण्यासाठीचा मार्ग म्हणजे शिक्षण'' शिक्षण ज्ञानरुपी तिसरा डोळा ज्यामुळे आपल्याला या जगातील घडणाऱ्या गोष्टीचा आभ्यास करायला मिळतो काळाणुसार शिक्षणातील बरेच काही बदल झाले त्याला एक व्यवहारीक , व्यावसायिक स्वरुप निर्माण झाले या स्पर्धेच्या युगात जो तो पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण कसे देता येईल याचाच विचार करत असतो चांगली गोष्ट आहे की प्रत्येक जनानी शिकायलाच पाहिजे गाडगेबाबा एकेठिकाणी सांगतात ''बापाहो खायला भाकर नसेल तर अर्ध्या पोटाने उपाशी रहा पण लेकराले शिकवा,बायकोला साडी हलकी घ्या पण लेकरायले शिक्षण द्या'' या शांतीदुताचा संदेश खुप काही सांगुन जातो म्हणून शिक्षण हे जगातील सर्वात श्रेष्ठ धनसंपत्ती आहे ही आपल्या पासुन कोणीच हिरावून घेऊ शकत नाही
दोन भाऊ जरी असतिल तरी संपत्तीसाठी धना साठी भांडणे करतील वेळप्रसंगी 'सुई दोरा' सुद्धा वाटून घेतील परंतु शिक्षणासारखी महानसंपत्ती हिरावून घेतली जात नाही .म्हणून खुप शिका शिकवा संघटीत व्हा. आपल्याला जरी काही कारणाने शिकता नाही आले तरी पण आपल्या मुलांना शिकवा त्यात आपले समाधान बघा आज ज्ञानाच्याच बळावर भारत देश सर्व देशांशी स्पर्धा करू शकतो
थोरांचे विचार अंगीकारा शिक्षणासारखे दुसरे कुठलेच साधन नाही म्हणून शिक्षण हेच सर्व श्रेष्ठ आहे...
एका निरक्षर गावाची लोकसंख्या जवळपास दहा हजारावर होती पण गाव शिक्षण पासुन वंचित राहिलेले आणि तेथील एक परम्परागत संस्कृति चालत आलेली रुढी परंपरा की, गावातील जो कोणी राज्यकारभार सांभाळेल त्यांनी पाच वर्षे सांभाळावा आणि शेवटी पाच वर्षे संपल्या नंतर सर्व गावकरी त्या राजाची मिरवणूक काढून गावाजवळील सरोवरातील बेटावर राजाला सोडून दिले जायचे पण जंगलातून ती व्यक्ती परत गावात येत नव्हती कारण त्या सरोवरातील बेटावर सर्व प्रकारचे हिंस्त्रप्राणी त्या राजाला मारून खात होते.
पुढे गावातील कोणतीच व्यक्ती राज्यकारभार सांभाळायला तयार होत नव्हती पण एक त्याच गावातील तरुण युवक थोडा फार बाहेर गावातून शिक्षण शिकून आला होता त्याने राज्यकारभार स्विकारण्याची जवाबदारी घेतली हा तरुण होता त्यामुळे लोकांना याचे आश्चर्य वाटत होते की हा बालवयातच आपले आयुष्य पणाला लावत आहे सर्व दुःख व्यक्त करीत होते!सोबत आनंद ही होता.
आता या युवकांनी आपले पाच वर्षांत पुर्ण सरोवरातील बेटावरील झाडे ,वेली तेथील हिंस्त्रप्राण्यांना त्यांच्या निवा-यासाठी दुसर्या जंगलात नेऊन सोडले आणि सुंदर आशा प्रकारचा बेटावर राजमहल उभारून काढला.
आता पाच वर्षे पुर्ण होत आले होते सर्व लोक रडत दुःखी अंतःकरणाने निरोप देत होते पण हा युवक येथे हस्त हस्त सरोवराकडे चालला होता कारण त्याच्या शिक्षणाने ज्ञानाच्या बळावर आपला मार्ग मोकळा केला होता...
सांगायचं तात्पर्य :- येवढेच आहे की शिक्षण हेच जगात तारणारे आहे ,शिक्षणानेच जीवन घडते म्हणून सर्वांनी शिकले पाहिजे....
........साहित्य दर्पण आयोजित दरबार...
________ गजानन पवार पाटील

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा