गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

एक प्रयास हायकू

'झळा उन्हाच्या'

झळा उन्हाच्या
अंगा अंगाची लाही
ऋतू वसंत

कोवळी पर्ण
पालवीची वर्दळ
फुले सुगंधी

नभीचा सुर्य
तापला माथ्यावरी 
रित्या घागरी

तप्त धरणी
धरणे ही कोरडी
पाण्या वाचूनी

कष्ठाच जीन
शेतकरी दंगला
रंग कामाचा

मराठवाडा
पाण्याविना कोरडा
दुष्काळ माथी
____ गजानन पाटील पवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा