बुधवार, २७ एप्रिल, २०१६

कवितेची दुनिया

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
||गेले ते दिन गेले||
♧♧♧♧♧♧♧

काय वर्णन करू आता 
गेले ते क्षण बालवयाचे
विहिरी माजी गार पाणी
दिनक्रम मौज पोहण्याचे
गर्दी दाटून होती झाडांची
भरजरी बुंधा पसार फांद्या
डावा वरी डाव रममाण
पांड्या हरला कधी हरे पेंद्या
कुर कुई वाजे कुरकुंजी
फेर घेऊन फिरे गरर्रगर्
झाला गड्यानो डाव भारी
आईची हाक ऐकता दिसे घर
आता सर्व बदल घडला
मोबाईल चा वेढा पडला
विसर पडला मानवाला
युगा सोबती माणूस धावला 


______ गजानन पवार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा